' फोन चार्ज करताना नेहमी स्वतःचा चार्जरच का वापरावा? ५ महत्वाच्या चार्जिंग टिप्स – InMarathi

फोन चार्ज करताना नेहमी स्वतःचा चार्जरच का वापरावा? ५ महत्वाच्या चार्जिंग टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्मार्टफोन उत्साहाने वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला फोनची बॅटरी जेवढी जास्त वेळ टिकेल तेवढं बरच वाटेल. नवीन येणाऱ्या आयफोनमध्ये जेव्हा त्यांनी चार्जरच काढून टाकला तेव्हा केवढा गहजब झाला होता ते आपण पाहिलं असेलच!

दीड लाखाचा फोन घेऊन त्यात चार्जर नाही ही तशी बुचकळ्यात टाकणारी गोष्ट होती पण e-wastage बद्दल जेव्हा स्पष्टीकरण दिलं गेलं तेव्हाच आयफोनच्या या कृतीचं सगळ्यांनीच कौतुक केलं.

 

apple charger inmararthi

 

बहुतेक स्मार्टफोन मध्ये लिथियमची बॅटरी असते ज्यांची क्षमता ३०० ते ५०० चार्ज/डिस्चार्ज सायकल एवढी असते म्हणजेच ते दिड ते दोन वर्षांसाठी पुरेसे असतात.

एकदा का तुम्ही ती मर्यादा ओलांडली की बॅटरी खराब होऊ लागते, याचा अर्थ तिची क्षमता कमी होऊ लागते. साधारणपणे ३०० चक्रे म्हणजे चार्ज/ डिस्चार्ज सायकल पूर्ण झाली की बॅटरीची क्षमता तिच्या मूळ क्षमतेच्या ८०% पर्यंत घसरते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यामुळे तुम्ही दोन वर्षांपेक्षा जास्त सेम फोन वापरत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्याची बॅटरी लाईफ पूर्वी इतकी राहिली नाहीये. म्हणजेच बॅटरी खराब झाली आहे.

 

mobile battery 2 inmarathi

 

आजकाल बहुतेक स्मार्ट फोनची बॅटरी सील केलेली असते त्यामुळे जर खराब झालेली बॅटरी बदलून तुम्हाला नवीन टाकायची असेल तर सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागेल.

म्हणूनच आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी लाईफ वाढवू शकता.

१. अनधिकृत किंवा कमी दर्जाचा चार्जर वापरू नका –

 

charger with phone inmarathi

 

स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर सोबत मिळालेला चार्जर हा अधिकृत चार्जर असतो. त्याहून वेगळा कमी अधिक गुणवत्तेचा किंवा ब्रँड माहीत नसलेला अनधिकृत चार्जर वापरल्याने मोबाईलचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.

त्यामुळे प्रवास करताना आपला अधिकृत चार्जर सोबत ठेवा ते शक्य नसल्यास समान गुणवत्तेचा चार्जर खरेदी करून सोबत ठेवल्याने अडचण येणार नाही.

२. रात्रभर चार्जिंग करू नका –

 

overcharging inmarathi

 

दिवसभर मोबाईल वापरल्यानंतर झोपायला जाताना आपण मोबाईल चार्जिंगला लावतो आणि सकाळी उठल्यानंतर तो बंद करतो. त्यामुळे रात्रभर तासंतास चार्जिंग होत राहते त्यालाच ‘ओव्हर चार्जिंग’ म्हणतात.

प्रमाणापेक्षा जास्त वेळ चार्जिंग केल्याने बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे तुमचा फोन दोन तासांपेक्षा अधिक वेळ चार्ज होणार नाही याची काळजी घ्या.

३. चार्जिंगचे नियम पाळा –

 

charging phone inmarathi

एकदा फोन नीट चार्ज केला की तो दिवसभर चालत असला तरी काही लोकांना दर थोड्या वेळाने चार्जिंग करायची सवय असते. पण ही सवय तुमच्या बॅटरीचं आयुष्य कमी करू शकते.

ज्या वेळी आपण फोन प्लग करून अनप्लग करतो तेंव्हा एकदा बॅटरीचं एक चार्ज/ डिस्चार्ज सायकल खर्च होतं. म्हणजेच वारंवार चार्जिंग केल्याने सायकल लवकर संपू शकतात.

त्यामुळे जेव्हा तुमच्या फोनचं चार्जिंग १०% पेक्षा कमी उतरेल त्यावेळी तो प्लग करा आणि ८०% किंवा १००% चार्जिंग झाल्यावर अनप्लग करा.

४. मोबाईल चार्जिंग सुरू असताना वापर करू नका –

 

gaming while charging inmararthi

 

काही लोकांना मोबाईल फोन चार्ज होत असताना गेम्स खेळायची, गाणी ऐकायची किंवा व्हिडिओज बघायची सवय असते जे की खूपच चुकीचं आहे. गेम खेळताना, कॅमेरा वापरताना किंवा कोणतेही हेवी ॲप्स वापरल्याने मोबाईल खूप तापतो.

तसेच फोन चार्ज होतानासुद्धा एक प्रकारची उष्णता निर्माण होत असते. या दोन प्रकारच्या उष्णतेमुळे बॅटरीच्या आरोग्याला खूप मोठा धोका होतो. त्यामुळे मोबाईल चार्ज होत असताना त्याचा वापर टाळा.

५. चार्जिंग सुरू असताना उशी खाली ठेवू नका –

 

phone charging under pillow inmarathi

 

मोबाईल लगेच सापडावा म्हणून खूप लोक तो चार्जिंगला लावून उशी खाली ठेवून देतात. आपल्याला माहीतच आहे की चार्जिंग सुरू असताना उष्णता निर्माण होते अशात जर फोन उशीखाली ठेवला तर त्या उष्णतेचा विसर्ग होण्यास अडथळा होतो. त्यामुळे शक्यतो मोबाईल चार्जिंग करताना तो टेबलावर ठेवावा.

सध्या तर बऱ्याच स्मार्टफोनसोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल असाच चार्जर दिला जातो, पण तुम्हाला एक गंमत माहितीये का की तज्ञांच्या मते या फास्ट चार्जिंगमुळेसुद्धा आपल्या मोबाइलच्या बॅटरीची लाईफ कमी होते.

या काही टिप्स तुम्ही वापरल्यात तर नक्कीच तुमच्या बॅटरीचं आयुष्य कमी होणार नाही आणि बॅटरीवर होणारा खर्च तुम्हाला टाळता येईल!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?