Site icon InMarathi

बिपीन रावत यांच्यानंतर कोण होणार देशाचा दुसरा CDS?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच प्रचंड धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरणे आपल्याला जड जात आहे.

जनरल बिपीन रावत यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती तर भरून काढणे अशक्य आहे पण तरीही लाईफ गोज ऑन म्हणत त्यांचे पद तर रिक्त राहू शकत नाही.

 

 

त्यांच्या जागी एका योग्य व्यक्तीची नियुक्ती तर व्हायलाच हवी आहे. त्यांच्यानंतर पुढील CDS कोण असेल याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यासाठी जनरल नरवणेंपासून ते एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरियापर्यंत ही नावे पुढे आली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

देशातील सर्वात मोठे लष्कराचे पद फार काळ रिकामे ठेवता येत नाही. जनरल बिपीन रावतनंतर सीडीएस पदासाठी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हे सेवाज्येष्ठतेच्या क्रमवारीत अव्वल आहेत आणि त्यामुळेच ते या पदाचे सर्वात मोठे दावेदार मानले जात आहेत.

असे असले तरी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार हेदेखील सीडीएस पदासाठी दावेदार आहेत. सीडीएस पदासाठी ज्येष्ठता हा एकमेव निकष असू शकत नाही.

 

जनरल नरवणे यांची सीडीएस पदी नियुक्ती झाल्यास लष्करप्रमुख हे पद रिक्त होईल. लष्करप्रमुख पदासाठी देखील दोन प्रमुख दावेदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती तर दुसरे उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वायके जोशी हे आहेत.

या पदासाठी नियुक्ती ही एक संपूर्ण प्रक्रिया आहे. काय आहे ही प्रक्रिया? जाणून घ्या.

प्रथम संरक्षण मंत्रालय या पदासाठी योग्य असणाऱ्या आणि त्या निकषात बसणाऱ्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठवेल. या नियुक्ती समितीमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री असतात. सध्या सरकार एक कार्यकारी CDS देखील निवडू शकते.

सीडीएस पदाच्या नियुक्तीसाठी सध्या कुठलेही रुलबुक नाही. पण भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल या तीन सेवांपैकी कोणताही कमांडिंग अधिकारी सीडीएस म्हणून नियुक्त होण्यास पात्र आहे.

 

 

त्या व्यतिरिक्त अधिकाऱ्याची गुणवत्ता व सेवाज्येष्ठता देखील सरकार गृहीत धरते आणि योग्य अधिकाऱ्याची निवड केली जाते. एक नियम मात्र पाळला जातो की CDS पदावर असणारी व्यक्ती ६५ पेक्षा जास्त वयाची नसावी.

सीडीएस यांची मुख्य जबाबदारी म्हणजे लष्कर, नौदल व हवाईदल यांच्या कामांत समन्वय निर्माण करणे व देशाचे लष्करी सामर्थ्य अधिक बलवान करणे ही आहे.

याबद्दल केंद्र सरकारने २०१९ साली माहिती दिली होती. २० डिसेम्बर २०१९ साली केंद्र सरकारने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती दिली होती की जनरल बिपीन रावत हे भारताचे प्रथम सीडीएस असतील.

सीडीएस संरक्षणमंत्र्यांचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून देखील जबाबदारी पार पाडतील. तिन्ही सैन्यदलांबद्दलची प्रकरणे त्यांच्या अंतर्गत येतील. त्यांना डिफेन्स ऍक्विझिशन कौन्सिल व डिफेन्स प्लॅनिंग कमिशन या महत्वपूर्ण संरक्षण मंत्रालयाच्या गटात स्थान असेल असेही केंद्र सरकारने जाहीर केले होते.

जनरल रावत यांच्या कार्यकाळापैकी एक वर्ष अजूनही शिल्लक होते. त्यामुळे नवीन नियुक्तीबद्दल काही ठोस नियमांची माहिती सरकारने रावत यांच्या निवृत्तीच्या वेळेला जाहीर केली असती. पण जनरल रावत यांच्या अकाली निधनामुळे हे पद अचानक रिक्त झाले आहे.

 

 

म्हणूनच सीडीएस पदाच्या निवृत्तीची प्रक्रिया व पदाच्या योग्यतेबाबत अजूनही नियम किंवा निर्देश जाहीर करण्यात आलेले नाहीत असे तज्ज्ञांचे मत आहे.

आता पुढचे सीडीएस कोण असतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जनरल बिपीन रावत यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आणि त्या भयंकर अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version