‘दिल चाहता है’ मधील या ६ प्रसंगांकडे दुर्लक्ष केलं असेल, पण सिनेमाचा मूळ अर्थ त्यातच दडलाय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘दिल चाहता है’ प्रदर्शित होऊन वीस वर्षं झाली. एक पिढी जुना हा चित्रपट आजही तितकाच आवडण्याचं कारण आहे यातली पात्रं. त्यातही सिडचं पात्र जमान्याच्या खूप पुढचं होतं. आजही सिड तितकाच आवडतो याचं कारण त्याचं खूप प्रगल्भ असणं. फरहान अख्तरचा पदार्पणाचा चित्रपट असणारा ‘दिल चाहता है’ आज कल्ट बनला आहे
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
वीस वर्षं हा काही कमी कालावधी नाही. एका पिढीचा फरक असणारा असा हा काळ आहे. वीस वर्षांत अनेक गोष्टी बदलल्या. एक नवी पिढी आणि नवा विचार आला. चित्रपट बनविण्याचं तंत्र बदललं आणि चित्रपट बघण्याचा “नजरिया”ही बदलला. मात्र वीस वर्षांपूर्वी फरहान दिग्दर्शित ‘दिल चाहता है’नं केलेलं गारूड अजून कायम आहे.
२००१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट कथा, अभिनय, पात्रं, दिग्दर्शन, संकलन, संगीत अशा सर्वच आघाड्यांवर खर्या अर्थानं तरूणांचा चित्रपट होता. काळाच्या थोडं पुढे घेऊन जाणारा चित्रपट होता.
तीन तरूणांच्या प्रवासाचा हा चित्रपट. तारूण्यातून प्रौढत्वाकडे प्रवास होणार्या तीन तरूणांच्या भावनिक प्रवासाचा आलेख मांडणारा. आकाश आणि समीर हे तारूण्यानं खळाळते, खरंतर अल्लडपणा न गेलेले तरूण आहेत मात्र सिडचं तसं नाही. तो गंभीर आहे. तरूण असला तरी तरुणाईचा उथळपणा नाही. त्याच्या पेंटिग्जमधूनही ही विचारांची खोली जाणवत रहाते. संपूर्ण चित्रपटभर जी एक गहन गंभीर निळाई आहे ती सिडनं व्यापलेली आहे.
अक्षय कुमारच्या करियरमधील एक महत्वाची भूमिका त्याने सिडच्या पात्राद्वारे साकारली आहे. अंडरप्ले करणं हे भल्याभल्यांना न जमणारं काम अक्षयने लिलया केलेलं आहे. आजही पुन्हा पुन्हा सिडच्या प्रेमात पडण्याला अक्षयचा अभिनय हे एक कारण आहे.
—
- नावावरून वादच नको; १० वादग्रस्त चित्रपट ज्यांची नावंच बदलण्यात आली!
- एका वेगळ्याच कारणासाठी सुरु झालेली इंटर्व्हलची पद्धत, आजही सुरु आहे कारण…
—
कागदावर अप्रतिम लिहिलेलं सिडचं पात्र अक्षयनं पडद्यावर कमालीचा न्याय देत जीवंत केलेलं आहे. सिडच्या अशा अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत, ज्यामुळे आजही हा चित्रपट बघताना त्याच्या प्रेमात पडायला होतं.
१- समीर आणि आकाश यांच्या धिंगाण्यात सहभागी असणारा मात्र तरीही वेगळेपण जपणारा सिड. स्वत:ला फोमो (fomo) वाटून न देणारा. अपनी दुनिया मस्त अशा सिड प्रत्येक पिढीत असतो.
२- आकाशची अखंड निरर्थक बडबड आपल्याला जितकी वैतागवाणी वाटते तितकीच ती सिडला वाटते आणि ती थांबविण्यासाठी तो आकाशला हातातला रूबिक क्युब फेकून मारतो तेव्हा प्रेक्षक म्हणून आपल्याला अक्षरश: बरं वाटतं.
३- स्त्रियांना सन्मानानं वागविणारा तो खराखुरा Man आहे. मग ती तारा असो अथवा दीपा. दीपा हॉटेलमधे भेटते तेव्हा आकाश तिची टर उडवत असतो तर समीर खवचटपणे हसत असतो मात्र सिड तिच्याशी व्यवस्थित बोलतो. म्हणूनच मुलीबाळींना इतर दोघांपेक्षा सिड जास्त आवडतो.
४- आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अतरंगी मित्र मैत्रीणी असतात. जे भलते सल्ले देण्यात पटाईत असतात. अशा सल्ल्यांमुळे आपण गोत्यात येतो. असा भलता सल्ला देणारा मित्र आहे आकाश. समीरला भलता सल्ल देऊन तो त्याचं प्रेम प्रकरण संपवून टाकण्यास सांगतो. सिड मात्र परिस्थितीचं आकलन करून घेऊन जो खरंच आवश्यक आहे असाच सल्ला समीरला देतो.
५- त्याचा सर्वात चांगला गुण म्हणजे तो लोकांना जज करत नाही. कोणाविषयी पूर्वग्रह बाळगत नाही. तारा त्याला तिची मुलगी आणि घटस्फ़ोटाबाबत सांगते तेव्हाही तो तिची बाजू घेतो. तिला समजून घेतो. तिचं दारू पिणं कोणत्या परिस्थितीतून वाढत गेलं आहे याची त्याला जाणीव असल्यानं इतर समाजाने तिच्यावर दारूडी म्हणून मारलेला शिक्का तो लक्षातही घेत नाही.
६- ताराच्या प्रेमात पडलेल्या सिडला या नात्यातल्या सर्व मर्यादांचंही पुरेपूर भान असतं. म्हणूनच तो तिच्यावर हे नातं स्विकारण्याची जबरदस्ती करत नाही. या दोघांच्या प्रेमाचा, नात्याचा एक सुंदर प्रवास सिदच्या समंजसपणामुळे प्रेक्षकांना बघायला मिळतो.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.