' जगभर लोकप्रिय “मनी हाईस्ट”, स्पेनमध्ये मात्र सपशेल फ्लॉप झाली होती! – InMarathi

जगभर लोकप्रिय “मनी हाईस्ट”, स्पेनमध्ये मात्र सपशेल फ्लॉप झाली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी अनेकजण अचानक आजारी पडले, कोणाच्या घरी इमर्जन्सी आली तर कोणाला अचानक काही काम लागलं. यामुळे या सगळ्यांनी कामावरून रजा घेतली आणि योगायोग म्हणजे हे सगळेजण मनी हाईस्ट या सिरीजचे कट्टर चाहते होते.

विनोदाचा भाग सोडला तर हे चित्र अगदी खरं आहे. मनी हाईस्ट या सिरीजच्या पाचव्या सीझनचा दूसरा भाग शुक्रवारी प्रसारित झाला आणि डोळ्यात पंचप्राण आणून या सिझनची वाट पहाणार्‍यांनी अक्षरश: थापा मारून रजा काढून हा भाग बघितला.

 

money heist inmarathi poster

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऐकायला वेडेपणा वाटत असला तरिही मनी हाईस्ट या नेटफ्लिक्स सिरीजच्या बाबतीतलं हे वास्तव आहे. लोक वेड्यासारखे या सिरीजवर प्रेम करतात.

अशी ही वेड्यासारखी लोकप्रिय असणारी सिरीज मुळात एक इटालियन सिरियल होती जी चक्क फ्लॉप म्हणून गणली गेली होती. मूळ सिरियलचं नाव होतं,”ला कासा डे पैपेल” अर्थात कागदाची इमारत.

२०१५ साली स्पॅनिश वाहिनी चॅनल एंटेना ३ वर ही प्रसारीत करण्यात आली होती. पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती लाभली मात्र नंतर प्रेक्षकांनी या सिरियलकडे पाठ फिरवली. ही सिरियल इतकी फ्लॉप होती की ती अर्ध्यातच गुंडाळली गेली.

 

money heist inmarathi 3

सिरियल झाल्यावर कलाकार आणि क्रु मेंबर्सनी आणखिन एक प्रोजेक्ट संपला म्हणत निरोप घेतले आणि इतरत्र कामं शोधली. ही सिरियल फ्लॉप झाल्याने पुढे याचं काहीच होणार नाही याची खात्री सगळ्यांना असतानाच पुढे आठ पंधरा दिवसातच एक जादू घडली.

नेटफ्लिक्सला या सिरियलमधलं मनोरंजन जाणवलं आणि त्यांनी ही सिरियल वेबसेरीज स्वरूपात आणण्याचं ठरवलं. मूळ सिरियल ही आठवड्यातून एकदाच मात्र शंभर मिनिटं अशा लांबलचक स्वरूपात प्रसारीत केली जात असे.

नेटफ्लिक्सने त्याचे तुकडे करून १५ एपिसोडना २२ एपिसोडमधे रुपांतरीत करून दोन सिझनमधे त्याची विभागणी केली.

 

netflix inmarathi

 

अत्यंत अल्प दरात नेटफ्लिक्सने या सिरियलचे हक्क विकत घेतले होते. मात्र प्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन एपिसोडची लांबी कमी करून सिझन वाढवत नेटफ्लिक्सने या सेरीजची उत्कंठा अशी ठेवली की जगभरातले प्रेक्षक यात गुंतून राहिले.

आज ही सेरीज अव्वल स्थानावर आहे आणि भरभरून फायदा करून देणारी ठरली आहे. मनी हाईस्ट ही आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली गैरइंग्रजी सिरीज आहे.

काय आहे मनी हाईस्ट?

मनी हाईस्ट ही एका सशस्त्र दरोड्याची कथा आहे. “रॉयल मिंट ऑफ़ स्पेन” म्हणजेच स्पेनमधील चलनी नोटा छापण्याच्या कारखान्यावर दरोडा घातला जातो. दरोडेखोर शस्त्रांच्या धाकावर कारखान्याचा ताबा घेतात.

कर्मचार्‍यांना ओलिस ठेवून पोलिसांवर नियंत्रण ठेवतात आणि तब्बल ९८४ मिलियन योरोजची छपाई करून ते घेऊन दरोडेखोर फरार होतात. या दरोड्यामागचा मास्टर माईंड प्रोफेसर जो भ्रष्ट व्यवस्थेविरूध्द प्रतिकार करण्यासाठी या दरोड्याची योजना आखतो.

 

professor inmarathi

 

ही योजना, त्यातलं बारकाईनं केलेलं प्लॅनिंग थक्क करून सोडणारं आहे. कोणत्याही चोरी दरम्यान मनुष्य हानी होता कामा नये हा प्रोफेसरचा कडक नियम आहे.

प्रेक्षक प्रोफेसरच्या प्लॅनिंगमधे इतके गुंतून जातात की ते पोलिसांच्या बाजूने नव्हे तर चक्क दरोडेखोरांच्या बाजूने उभे राहतात. कथेतल्या अनिश्चिततेतच्या थरारानं तब्बल पाच सिझन या सिरीजने प्रेक्शकांना गुंगवून ठेवलेल्या या सिरीजचा फायनल सीझन रिलीज झाला आणि कित्येक चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

काहींना हा सीझन आवडला तर काहींनी या सिरीजचे आणखीन सीझन यावेत अशी अपेक्षा प्रकट केली. अर्थात लोकांची एवढी मागणी असेल तर या सिरीजचे मेकर्स आणि नेटफ्लिक्स मिळून यावर नक्कीच विचार करतील.

 

money heist 2 inmarathi

 

तोवर तुम्ही जर ही सिरीज बघितली नसेल तर अवश्य बघा, आणि आमचा हा लेख कसा वाटला ते आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका, धन्यवाद!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?