Site icon InMarathi

जपानी लोक, विशेषतः स्त्रिया, चवळीच्या शेंगेसारख्या सडपातळ असण्यामागचं गुपित…

japanese girls inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लठ्ठपणा! हा एक असा शब्द आहे ज्याच्यापासून आपल्याला कायमची सुटका हवी असते. पण असं असलं तरी आपल्या मनोनिग्रहाने खूप वाढलेलं वजन कमी केलंय अशी कमी उदाहरणं आपल्याला आढळतात. पूर्वीच्या मानाने आपल्यातले बरेच जण आता बऱ्यापैकी डाएट कॉन्शिअस झालेत. तरी आपल्या रोजच्या जीवनशैलीत वर्षानुवर्षे ज्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी रुजल्या आहेत त्या आपण सहज सोडून देऊ शकत नाही.

या अशा अनेक छोट्या छोट्या चुकीच्या सवयींचा मोठा परिणाम आपण आपल्यावर करून घेत राहतो. गोड खाणं हा भारतीयांचा वीक पॉईंट आहे. जेवण म्हटलं की ते भुकेपेक्षा जास्त जेवलं जात आपल्याकडे. जेवणावळीत ‘आग्रह करणं’ ही तर आपल्याकडे पद्धतच असते. त्यामुळे प्रयत्न केला तरी कुठली ना कुठली गोष्ट ही लठ्ठपणाची टांगती तलवार कायम आपल्या मानेवर ठेवत राहते.

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

जपानी लोक मात्र याला अपवाद आहेत. विकसित देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमधले लोक हे निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगणारे लोक म्हणून ओळखले जातात. तिथले लोक दीर्घायुषी असतात. त्याचबरोबर जपानी लोक, विशेषतः जपानी स्त्रिया हेवा वाटावा इतक्या हे सडपातळही असतात. ते सडपातळ असण्याला अनेक कारणं आहेत. सडपातळ रहायला जपानी लोक या ७ गोष्टी करतात.

 

 

१. भरपूर चालणं आणि सायकल चालवणं :

 

 

जपानी लोक कामावर जायला ट्रेनने प्रवास करतात. स्टेशनवर चालत जाणे, जिन्यांची चढ-उतर, ट्रेनमधली प्रचंड गर्दी यामुळे सहाजिकच त्यांचं खूप चालणं आणि उभं राहणं होतं. जपानमधले बरेचसे लोक जवळपास रोज सायकल चालवतात. शरीराला व्यायाम व्हावा म्हणून काही ते सायकल चालवतात असं नाही तर तो त्यांच्या रोजच्याच जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सायकल चालवताना आपण काहीतरी वेगळं करतोय असं त्यांना अजिबात वाटत नाही. किराणामालाचं साहित्यही ते सायकवरून जाऊन आणतात. जपानमधली लहान लहान मुलंही चालत शाळेत जातात त्यामुळे त्यांचंही चालणं होतं.

२. आहारात माश्यांचं आणि भाज्यांचं प्रमाण जास्त :

 

 

जपानी लोक क्वचितच मटण खातात. त्यांचा भर प्रामुख्याने मासे, सीफूड खाण्यावर असतो. शिवाय त्यांच्या आहारात भाज्यांचं प्रमाणही जास्त असतं. त्यांच्या आहारात किमान ४ ते ५ भाज्यांचा समावेश असतो. ब्रेड खाण्याऐवजी भात खाण्यावर ते भर देतात.

३. जेवणानंतर ‘स्वीट डिश’ नाही :

 

 

आपल्याला जेवण झालं की काहीतरी गोड तोंडात टाकावंसं वाटतं. ‘स्वीट डीश’ चंही आपल्याकडे फार कौतुक आहे. पण जपानी लोक साखर खाणं कटाक्षाने टाळतात. त्यांचा भर हा ताजी, स्वच्छ फळं खाण्यावर असतो त्यामुळे जेवणानंतर त्यांच्याकडे फळं हमखास खाल्ली जातात .

४. भुकेपेक्षा कमी खाणं :

 

 

आपल्याकडे ‘पोटभर जेवणे’ फार रुजलेले आहे. पण ‘पोटभर’ जेवण्याच्या नावाखाली आपण कित्येकदा आपल्याला जितकी भूक असते त्याहूनही जास्त खातो. ‘आवडला पदार्थ की ताव मारा’ हे तर आपलयाकडे सर्रासपणे होतं. त्यात काही चुकीचं आहे असं आपल्या पटकन लक्षात येत नाही इतकं ते आपल्या अंगवळणी पडलं आहे. पण जपानी लोक भूक असेल त्यापेक्षा कमी खातात. जर १००% भूक असेल तर ते ८०% पोट भरल्यावरच खायचं थांबवतात.

५. ग्रीन टीचं सेवन :

 

 

गेल्या काही वर्षांत आपल्याकडे ग्रीन टी पिण्याचं प्रमाण वाढेलेलं आहे. ग्रीन टी प्यायल्यामुळे वजनात पटापट घट होते हे तर आपल्याला माहीतच आहे. जपानी लोक नेहमी ग्रीन टी पितात. दिवसाला १-२ कप ग्रीन टी त्यांच्याकडे प्यायला जातो.

६. सटरफटर खाणे नाही :

 

 

आपल्याला संध्याकाळी थोडं काहीतरी खायची सवय असते ज्याला आपण मधल्या वेळचं खाणं म्हणतो. शिवाय काम करताना, ताण आला असेल तर, वेळ जात नसेल तर आपल्याला काहीतरी सटरफटर तोंडात टाकायची हमखास सवय असते. पण जपानी लोक याला अपवाद आहेत. ते दिवसाला ३ वेळा जेवण्याच्या अलीकडे पलीकडे काहीही अतिरिक्त न खाणं कटाक्षाने पाळतात.

७. मोठ्या मापाचे कपडे न मिळणं :

 

 

काही ठराविक दुकानं सोडली तर जपानमध्ये पटकन मोठ्या मापाचे कपडे मिळत नाहीत. भारतात तसं नाहीये. आपल्याकडे आपल्याला सगळ्या प्रकारच्या कपड्यांच्या प्लस साईजेस उपलब्ध असतात. त्यामुळे वजन जास्त असलं तरी आपल्या मापाचे कपडे आपल्याला सहज मिळतील हे आपल्याला माहीत असतं. आपण आपल्या वजनाची फिकीर न करण्याचं हेही एक कारण असू शकतं.

जपानी लोकांच्या रोजच्या जीवनशैलीतच त्यांनी या सगळ्या गोष्टी फार प्रयत्नपूर्वक रुजवल्या आहेत. आपल्यालाही या गोष्टी माहीत असतात पण केवळ गोष्टी माहीत असणे आणि त्या आमलात आणणे यामधलं अदृश्य पण फार मोठं अंतर आपल्याला पार करता येतंच असं नाही. आपण जर हे करण्यात कमी पडत असू तर वेळीच स्वतःकडे लक्ष द्यायला हवं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version