आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
राज कपूर आणि लता मंगेशकर, आपल्या देशाने लाभलेली ही दोन मोठी रत्नं. तरुण पिढीतले आपण लतादीदींची कितीतरी जुनी गाणी आजची गाणी जितक्या आवडीने ऐकतो तितक्याच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक आवडीने ऐकत आलोय. राज कपूर हे हिंदी सिनेजगतातलं एक खूप मोठं नाव. त्यांना ‘शो मॅन’ म्हटलं जायचं.
‘मेरा नाम जोकर’, ‘श्री चारसोबीस’, ‘आवारा’, हे त्यांचे काही अतिशय गाजलेले आणि आवर्जून पहावेत असे चित्रपट. राज कपूर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पटकन काय उभं राहत असेल तर ती ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यातली राज कपूर आणि नर्गिस यांची प्रतिमा.
मध्यरात्री आपल्याला कुणी फोन सहसा करतच नाही. पण जर कुणी आपल्याला कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा अन्य कुठल्या कारणासाठी मध्यरात्री फोन केलाच तर आपण पटकन चिडतो. “ही काय वेळ आहे का फोन करायची?” उद्या सकाळी बोलू. “, अशीच आपली चिडून प्रतिक्रिया येते.
—
त्यामुळे कुणालाही रात्री फोन करणं हे आपल्याकडे शिष्टाचारांना धरून समजलं जात नाही. काही वर्षांपूर्वी राज कपूर यांनी मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रात्री एक वाजता फोन केला होता. नेमका काय होता हा किस्सा? जाणून घेऊया.
–
–
‘जिस देश में गंगा बेहती है’ या चित्रपटातल्या ‘आ अब लौट चले’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेसचा हा किसा आहे. या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरस देणाऱ्यांची आणि संगीतकारांची गरज होती. त्यावेळेस काही तांत्रिक अडचणींमुळे ‘मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंग’ करणं शक्य नव्हतं.
मध्यरात्र ही काही गाण्याचं रेकॉर्डिंग करण्याची वेळ नक्कीच नाही. मात्र राज कपूर यांनी रस्त्यावर पहाटे ३ वाजता या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं होतं. त्यावेळेस रस्त्यावर फारशी गर्दी नसायची त्यामुळे अशा प्रकारे रेकॉर्डिंग करणं शक्य झालं होतं.
या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू असताना मध्यरात्री एक वाजता त्यांनी लतादीदींना फोन केला. “क्लायमॅक्सचं गाणं नायिकेशिवाय पूर्ण होईल असं मला वाटत नाही”, असं त्यांनी लतादीदींना सांगितलं. त्या गाण्यातला आलाप त्यांना दीदींनी गायला हवा होता.
लतादीदींसारख्या इतक्या मोठ्या गायिकेला इतक्या अपरात्री फोन आलाय म्हटल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरी आश्चर्य वाटलं नसतं. पण दीदींनी कुठलेही आढेवेढे न घेता राज कपूर यांना गाण्यासाठी आपला होकार कळवला होता.
‘सत्यम शिवम सुंदरम्’ या चित्रपटात राज कपूर यांना लतादीदींना घ्यायचं होतं. लता दीदींनी आधी या प्रस्तावाला त्यांचा होकार कळवला होता मात्र त्यांच्यात काहीतरी वाद निर्माण झाला, लता दीदी गाणं गाण्यासाठी तयार नव्हत्या, अखेर राज कपूर यांच्या विनंतीवरून त्यांनी होकार दिला, आणि सत्यम शिवम सुंदरम हे गाणं अजरामर ठरलं..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.