आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२०१९ एप्रिलमध्ये The Tashkent Files हा सिनेमा रिलीज झाला आणि सगळीकडेच त्याची हवा झाली, तब्बल ३ महीने फक्त माऊथ पब्लिसिटीवर हा सिनेमा चालला आणि लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.
विवेक अग्निहोत्री या दिग्दर्शकाचं चांगलंच कौतुक झालं, लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूमागचं गूढ आणि त्यामागची राजकीय खेळी या सिनेमातून बेधडकपणे मांडल्याने विवेक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव तर झालाच पण समाजातल्या एका घटकाकडून त्यांच्यावर टीकादेखील झाली.
देशाचा इतिहास आजवर आपल्याला ज्या पद्धतीने शिकवला गेला त्याच्या विरुद्ध जाऊन सत्यपरिस्थिति आणि घटना यांची माहिती विवेक यांनी या सिनेमाच्या माध्यमातून दिली त्यामुळे मोठमोठ्या मीडिया हाऊस तसेच समीक्षकांनी या सिनेमाकडे कानाडोळा केला.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
या सिनेमाचं प्रमोशन म्हणावं तसं केलं गेलं नाही, त्याविषयी मीडियाच्या माध्यमातून काहीच बोललं गेलं नाही, मोठमोठ्या समीक्षकांनी तर या सिनेमाचे रिव्यू करायचंसुद्धा टाळलं. आजवर सिनेमाच्या माध्यमातून आपल्या डोक्यात जे narrative सेट करण्यात आलं त्याच्या विरुद्ध भाष्य करणारा सिनेमा असल्याने एकाप्रकारे विवेक अग्निहोत्री यांना वाळीत टाकण्यात आलं.
एवढं होऊनही सिनेमाने चांगलाच बिझनेस केला, प्रेक्षकांनी हा सिनेमा उचलून धरला, त्यानंतरच काहीच महिन्यात विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या फाइल्स सिरीज मधल्या पुढच्या सिनेमाचे म्हणजेच ‘द काश्मीर फाइल्स’ची घोषणा केली होती.
सिनेमाच्या नावावरून आपल्याला अंदाज आला होताच की काश्मीरमधल्या नरसंहारावर भाष्य करणारा, काश्मीरी पंडितांच्या समस्येवर भाष्य करणारा हा सिनेमा असणार आहे, आणि एकंदरच त्यावेळेस कशाप्रकारे नरसंहार झाला, लाखो पंडितांना त्यांचं घर सोडून आपल्याच देशात त्यांना निर्वासित म्हणून वागणूक मिळाली यावर हा सिनेमा बेतलेला आहे.
या घोषणेनंतर कोरोनामुळे सारा देश तब्बल दीड वर्षं लॉकडाऊनमध्ये होता, मनोरंजनक्षेत्र तर पूर्णपणे ठप्प होतं, आत्ता यावर्षाच्या अखेरीस सगळं हळूहळू सुरळीत होऊ लागलं, बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग असलेल्या सिनेमांची घोषणा व्हायला लागली.
अशातच विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ची तारीख जाहीर केली, पुढच्या वर्षी गणतंत्र दिवसाच्या मूहर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी पृथ्वीराजबरोबरच हा सिनेमा रिलीज होणार आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत एक टुर अमेरिकेत आयोजित केली आहे, त्याचं नाव आहे Right To Justice, या मोहिमेअंतर्गत अमेरिकेतल्या १५ वेगवेगळ्या शहरांत या ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केलं आहे.
–
- ”शास्त्रीजी एकदा नाही, दोनदा निधन पावले. एकदा परदेशात, नि दुसऱ्यांदा स्वदेशात…”
- चित्रपट बनवताना पोटाची खळगी भरण्यासाठी अडवाणींना नडलेल्या प्रोड्यूसरची गोष्ट!
–
नुकतीच या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा व्हिडिओ स्वरूपात शेयर केल्या आहेत.
लोकांच्या प्रतिक्रिया बघून हा सिनेमा प्रत्येक भारतीयाला भावुक करणार हे नक्की, शिवाय आधीच्या सिनेमाप्रमाणेच या सिनेमातूनसुद्धा परखडपणे सत्य मांडलं गेलं असल्यामुळे त्याविषयी लोकांनी विवेक अग्निहोत्री यांचे मनापासून आभार मानले आहेत.
विवेक अग्निहोत्री नक्कीच त्यांच्या या सिनेमातून एक वेगळाच अनुभव आपल्याला देतील ही खात्री आहेच, पण एवढ्या मोठ्या घटनेवर हा सिनेमा बेतलेला असूनसुद्धा याची भारतीय मीडिया इंडस्ट्रीत काहीच वाच्यता आपल्याला बघायला न मिळणं यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही.
मोठ्या स्टारचा किंवा स्टारकीडचा एखाद्या सिनेमाची जेव्हा चर्चा असते तेव्हा कित्येक महिन्यांपासून त्याचं प्रमोशन केलं जातं, मुलाखती घेतल्या जातात, त्या लोकांबद्दलचे चांगले लेख आर्टिकल्स पब्लिश केली जातात. एकंदर त्याची फुकट पब्लिसिटी मीडियामधून होते, पण जरा कुठे यांच्या विचारांच्या पलीकडे जाऊन जर कुणी काही कलाकृति सादर करत असेल तर त्याला कसं दुर्लक्षित केलं जातं हे या घटनेवरून आपल्याला समजतं!
मीडिया इंडस्ट्रीतला हा दुटप्पीपणा आपल्याला नवीन नाही. जेव्हा याच विषयावर बेतलेल्या विधु विनोद चोप्रा यांचा ‘शिकारा’ सिनेमा जेव्हा आला तेव्हा त्याबद्दल कशाप्रकारे मीडियामधून चित्र मांडण्यात आलं हे आपण पाहिलंच होतं.
जेव्हा शिकाराचंसुद्धा असं स्पेशल स्क्रीनिंग केलं गेलं तेव्हा चित्रपटातल्या कथानकाच्या चुकीच्या चित्रीकरणामुळे कित्येक काश्मिरी लोकांनी नाराजी दर्शवली होती, तेंव्हा खुद्द विधु विनोद चोप्रा यांनी उद्दामपणे त्याकडे कसं दुर्लक्ष केलं याचे व्हिडिओज आजही तुम्हाला सोशल मिडियावर बघायला मिळतील.
आणि जेव्हा हीच घटना विवेक अग्निहोत्रीसारखा प्रामाणिक दिग्दर्शक सिनेमातून मांडू पाहतो तेव्हा त्यांच्या या कलाकृतीला स्वीकारण्याची तयारी सिनेइंडस्ट्री किंवा मीडिया इंडस्ट्री दाखवत नाही.
‘द काश्मीर फाइल्स’ बद्दल लोकांच्या प्रतिक्रिया बघून तर हेच समोर येत आहे की या सिनेमातून बरीच खरी बाजू लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला गेला आहे, आणि विवेक अग्निहोत्री यांच्या या प्रत्यनाला भारतीय प्रेक्षक नक्कीच दाद देईल.
मीडियाने जरी या सिनेमाकडे दुर्लक्ष केलं तरी आधीच्या सिनेमाप्रमाणेच या सिनेमालासुद्धा लोकं उचलून धरतील, अर्थात हे सगळं सिनेमा रिलीज झाल्यावरच आपल्याला समजेल, तोवर आपल्या मीडिया इंडस्ट्रीला या गोष्टीची जाणीव व्हावी हीच माफक अपेक्षा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.