' अकबराच्या विचित्र हट्टापायी संगीतसम्राट तानसेनचा सूर कायमचा हरपला… – InMarathi

अकबराच्या विचित्र हट्टापायी संगीतसम्राट तानसेनचा सूर कायमचा हरपला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उत्तम गायकीचा मापदंड म्हणून भारतात तानसेन यांचं नाव घेतलं जातं. तानसेनी गायकी ही उच्च दर्जाची आणि गायकीतला अखेरचा टप्पा मानला गेला आहे. मुघल राजवटीत होऊन गेलेला हा श्रेष्ठ गायक आजही त्याच्या गायकीसाठी परिचित आहे. इतिहासात त्यांचे नाव कोरले गेलेले आहे. मात्र अशा या श्रेष्ठ गायकाचा मृत्यू अकबरामुळे ओढावला हे सत्य अनेकांना ठाऊक नाही.

अकबर दरबारी नवरत्नं होती आणि ती त्यांच्या क्षेत्रात अव्वल समजली जात. मग तो चतुर सल्लागार बिरबल असो, कवी रहिम असो की राजगायक तानसेन!

 

tansen inmarathi

 

संगीत सम्राट तानसेन ज्या ग्वाल्हेर नगरीतले आहेत तिथे असं म्हटलं जातं की इथल्या वातावरणात तानसेनी सूर इतके भरलेले आहेत की इथलं बाळ रडलं तरिही ते कर्कश ऐकू येत नाही, बाळही सुरात गातं. तानसेन यांची संगीत साधना इतकी श्रेष्ठ दर्जाची होती की त्यांनी दिपक राग आळवला तर दिवे उजळून निघत असत. त्यांच्या सुरात इतकी ताकद असल्याचा दावा केला जायचा.

आज ऐकायला अतिशयोक्ती वाटत असली तरिही इतिहासाच्या पानात धांडोळा घेतला तर याचे दाखले वाचायला मिळतील.

अकबर तानसेनाच्या गायकीचा चाहता होता आणि नुसताच चाहता होता असं नाही तर नवरत्नांत तानसेन त्याचा सर्वात लाडका होता.

 

akbar darbar inmarathi

 

अनेक दरबारीजनांना यामुळेच तानसेन यांचा पराकोटीचा मत्सर वाटत असे. या मत्सरानं आणि तानसेन यांच्या सुरानंच त्यांचा मृत्यु करवून आणला.

मत्सर, हट्ट आणि मृत्यु

या सर्वश्रेष्ठ गायकाचा मृत्यू कसा झाला? याबाबतचं रहस्य आजही तसंच असलं तरिही याबाबतच्या कथा याची साक्ष देतात की दरबारी जनांच्या मत्सरानं आणि साक्षात अकबराच्या हट्टामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढावला.

अकबराचे विशेष लाडके असणारे तानसेन त्यांची कोणतीही फर्माईश दुर्लक्षित करत नसत हे सर्वांना ठाऊक होतं. याचाच फायदा घेत दरबारी जनांनी मत्साराग्नीत पेटून अकबराच्या कानावर घातलं की, तानसेन हे ‘राग दिप’ अत्यंत सुंदर गात असल्याने तुम्ही त्यांचा हा राग ऐकायलाच हवा.

सुरवातीला अकबरानं याकडे डोळेझाक केली मात्र नंतर त्याचीही उत्सुकता चाळवली गेली. अखेर एक दिवस त्यानं तानसेनकडे राग दीप गाण्याची फर्माईश केली.

 

tansen akbar inmarathi

 

एरवी प्रत्येक फर्माईश सर आंखो पर घेणार्‍या तानसेननी ही फर्माईश मात्र नाकारली. याचं कारण होतं, त्यांच्या सुरात असणार्‍या ताकदीने दिवे नुसतेच उजळत नसत तर त्यात दाहकता येत असे. हा राग आळवत असताना त्यांच्या शरीरात उष्णता निर्माण होऊन अंगाचा दाह होत असे. हे अकबराच्या कानावर घालूनही अकबर हट्टालाच पेटला होता. त्याला राग दीपक ऐकायचा होता आणि त्या सुरांमुळे उजळणारे दिवेही बघायचे होते.

अखेर बादशहाचा हुकूम सर आंखो पर मानत तानसेननी सूर आळवायला सुरवात केली. बघता बघता ते गाण्यात तल्लीन झाले आणि दरबारातले दिवे उजळले, त्यात इतकी प्रखरता होती की दरबारात आग लागली.

 

fire inmarathi

 

तानसेन डोळे मिटून तल्लीन होऊन गात असल्यानं दरबारात काय घडतंय हे त्यांच्या गावीही नव्हतं. दरबारात आग लागल्यानं सगळे सैरावैरा जीव वाचवत धावू लागले. इकडे तानसेन यांच्या शरीरात उष्णता निर्माण झाली आणि त्यांच्या शरिरातून उष्णतेच्या वाफा निघू लागल्या. हे सगळं कसं थोपवावं कोणालाच समजेना.

===

दरबारात यावेळेस तानसेन यांच्या मुलीही उपस्थित होत्या. त्यांनी हा प्रसंग ओळखून ताबडतोब राग मल्हार गायला सुरवात केली. तानसेनाच्याच मुली त्या! त्यांच्या गळ्यातले सूरही वडिलांइतकेच ताकदीचे होते. बघता बघता पावसाच्या सरी बरसू लागल्या आणि वातावरणातला दाह शमला.

अकबर आणि दरबारी बचावले तरिही ऐंशी वर्षाच्या तानसेन यांच्या तब्येतीवर याचा परिणाम व्हायचा तो झालाच.

 

tansen fire inmarathi

 

अखेर या तापातच ते १५८५ मधे इहलोकीची यात्रा संपवून गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?