Site icon InMarathi

सेन्सॉरने कोणतीही काटछाट न करता बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या किसिंग सीनला परवानगी दिली होती

karishma inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२००४ साली मर्डर नावाचा सिनेमा येऊन गेला, सपेन्स थ्रिलर अशा पद्धतीचा हा सिनेमा खरं तर एका कोरियन सिनेमावरून ढापला होता. हा सिनेमा हिट होण्यामागे सर्वात दोन मोठी कारण आहेत ती म्हणजे यातील गरमागरम दृश्य अर्थात किसिंग सीन्स आणि आणि गाणी, या सिनेमात सगळेच नवे कलाकार होते अगदी गायक कुणाल गांजवलाचा सुद्धा पहिला सिनेमा होता.

 

 

सिनेमा हिट तर ठरला मल्लिका शेरावत नावाचं वादळ बॉलीवूडमध्ये दाखल झालं होत, पुढे हेच वादळ जाऊन हॉलिवूडमध्ये सुद्धा धडकलं, इम्रान हाश्मीचे देखील एकामागोएक सिनेमे येऊन गेले. सिनेमाची चर्चा रंगली ती यातील बोल्ड सीन्सवरून, मात्र याआधी सुद्धा एक सिनेमा येऊ गेला होता ज्यात बॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा किसिंग सीन होता तो म्हणजे राजा हिंदुस्थानी..

 

 

नव्व्दचं दशक संपायला आलं होत तसेच बॉलीवूडमधली काही मंडळींचं करियर संपण्याच्या मार्गावर होते, चुकीचे निर्णय, चुकीचे सिनेमे यावरून अनेक चांगल्या कलाकारांची करियर संपत चालली होती. अभिनेत्रीचं करियर तर फार काळासाठी असते त्यात आपले काम उत्तम व्हावे यासाठी त्या देखील धडपडत असत.

 

गोविंदाची हिरोइन म्ह्णून ओळखली गेलेली अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर, कपूर खानदानातून अभियानाचा वारसा घेऊन आलेली करिष्मा १९९१ साली आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून बॉलीवूडमध्ये दाखल झाली, सुरवातीला तिलादेखील सशक्त भूमिका मिळत नव्हत्या, १९९६ साली आलेल्या राजा हिंदुस्थानी सिनेमाने तिला विशेष ओळख मिळवून दिली.

 

 

आपल्यातल्या अभिनय कौशल्याची परीक्षा असलेला हा सिनेमा गाजला खरा मात्र त्यामागे तिने घेतलेलं कष्ट कदाचित अनेकांना माहिती नसतील, नुकतेच या सिनेमाने २५ वर्ष पूर्ण केली आहेत. तर करिष्माने एका मुलाखतीच्या दरम्यान सिनेमाबद्दलचे अनुभव सांगितले होते..

करिष्माच्या करियरमधला टर्निंग पॉईंट असलेला हा सिनेमा, सिनेमाची चर्चा तिच्या लुकपेक्षा तिने दिलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या किसिंग सीनची.

मुलाखतीमध्ये तिने सांगितले की हा सीन करताना माझी अवस्था ठीक नव्हती, उटीमध्ये हा सीन शूट करताना प्रचंड थंडी होती, या सीनचे शूटिंग दोन तीन दिवस गेले होते कारण हा सीन पावसात शूट करायचा होता, त्यात थंडी अशा बिकट परिस्थतीत हा सीन शूट केला गेला.

 

 

या सिनेमात करिष्मा ऐवजी जुही चावलाला विचारण्यात आले होते असे बोलले जाते कारण आमिर आणि जुही या दोघांची जोडी हिट होती म्हणूनच कदाचित तिचा विचार केला गेला असेल, नंतर जुहीने हा रोल नाकारला आणि शेवटी तो करिष्माच्या पदरात पडला.

 

 

सेन्सॉर बोर्डने दिले U सर्टिफिकेट :

आजकाल सेन्सॉर बोर्ड क्षुल्लक कारणावरून सिनेमांना A सर्टिफिकेट देते, मात्र त्याकाळात सेन्सॉर बोर्डाने कोणतीही आडकाठी न करता या सिनेमाला A सर्टिफिकेट देऊन टाकले, खुद्द सिनेमाच्या दिग्दर्शकांनी हा किस्सा सांगितला त्यांना सुद्धा हा आश्चर्याचा धक्का होता.

 

 

सिनेमात इतका मोठ्या किसिंग सीन्सची इतकी हवा झाली होती की अनेक प्रेमीयुगलांनी हा सिनेमा थिएटरात कॉर्नर सीट पटकावून बघितला होता. सिनेमातील नदीम श्रवणची गाणी सुपरहिट ठरली, सिनेमातील नयनरम्य लोकेशन्समुळे, नेहमीप्रमाणे आमिरच्या वेगळ्या भूमिकेमुळे तो चांगलाच गाजला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version