Site icon InMarathi

‘सुर्यवंशी’ मधील लॉजिक गुंडाळून ठेवलेल्या या ६ चुका; मुर्खपणाचा नमुना!

sooryawanshi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी थिएटरमध्ये आला आणि प्रेक्षकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. ”तो येणार, तो येणार” म्हणत अखेर तो आला, आणि त्याला पहाण्यासाठी देशातील थिएटर्स हाऊसफुल्ल झाली.

प्रेक्षकांनी यंदा आपली दिवाळी या नव्या पाहुण्यासह साजरी करण्याचा निर्णय घेतला होता, तुमच्यापैकी पण अनेकांनी हा चित्रपट पाहिला असेलच, नाही का?

 

 

पण जरा थांबा, चित्रपट पाहिला, टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या मारल्या, मात्र या सगळ्या गर्दीत चित्रपटातील काही चुका लक्षात आल्या का? अर्थात रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे अनेकांनी डोकं आणि लॉजिक बाजूला ठेऊनच चित्रपटगृहात प्रवेश केला असणार, मात्र तरिही प्रेक्षकांना मुर्ख बनवण्याचा चंगच बांधलेल्या या चित्रपटातील ७ अक्षम्य चुका पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, ”चुकीला माफी नाही”.


—-

१. गाडी कोणं चालवत होतं?

सिम्बा, सिंघम आणि सुर्यवंशी या तीन महारथींचा एकत्रित चित्रपट म्हणजे हशा, स्टन्ट्स आणि चित्रपटातील हुल्लडबाजी असणार हे नक्की! मात्र  सिम्बा अर्थात रणवीर सिंगची एन्ट्री म्हणजे मुर्खपणाची हद्द झाली.

आपल्या अतरंगी हालचालींसाठी प्रसिद्ध असलेला सिम्बा गाडीतून नव्हे तर गाडीच्या बोनेटवर बसून प्रवेश घेतो, बरं, ते ही प्रेक्षकांनी मान्य केलं, मात्र ज्या गाडीवर बसून तो दमदार एन्ट्री घेतो ती गाडी नक्की कोण चालवत होतं? याचं उत्तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरही मिळणार नाही, कारण गाडीला चालकच नाहीये.

 

 

गाडीने प्रवेश केल्यानंतर सिम्बा मारामारी करण्यात व्यस्त असतो, मात्र त्यावेळी गाडी उलटीपालटी होत असल्याचे दाखवताना, गाडीतील मुळ चालकाचा रोहित शेट्टीला विसर पडल्याने एकंदरित पहिल्याच काही मिनिटांमध्ये चित्रपट आपल्याला मुर्ख बनवणार याची खात्री पटते.

२. आर्यनमॅन सिम्बा

सिम्बाच्या एन्ट्रीमधील आणखी एक महत्वाची चूक म्हणजे गाडीच्या बोनेटवर बसून सिम्बा एन्ट्री घेतो, यावेळी ”दया, दरवाजा तोड दो” या ठरलेल्या युक्तीने तो दार फोडून प्रवेश करतो, त्यावेळी गाडीच्या धडकीमुळे प्रचंड वजनाचा दरवाजा तुटतो, त्याच्या ठिकऱ्या उडतात, मात्र तरिही सिम्बाच्या पायाला खरचटही नाही.

 

 

सिम्बा नव्हे आर्यनमॅन अशी भुमिका दाखवली असती तर किमान प्रेक्षकांनी हा सीन खरा तरी मानला असता.

३. सिंघमपुढे सारे फिके

जो प्रताप सिम्बाचा, तोच सिंघमचा! चित्रपटातील एका सीनमध्ये सिंघमला मारण्यासाठी वेगाने आलेल्या रॉकेटमुळे १० फुटांवर असलेल्या भल्यामोठ्या गाडीने पेट घेतला. आजुबाजुचा परिसर आगीत होरपळू लागला, मात्र त्यापुढे कोणत्याही सुरक्षेविना बिन्धास्त चालणाऱ्या सिंघमला मात्र कोणतीही इजा झाली नाही.

 

 

कुणालाही न घाबरणारा सिंघम अजस्त्र अशा रॉकेटलाही घाबरत नाही, हे पाहिल्यानंतर लॉजिक आणि बॉलिवूड यांचा काहीही संबंध नाही हे मान्य करावंच लागतं.

४. काचा फुटल्या नाहीत

एका सीनमध्ये घराला आग लागते. आगीचे लोळ परिसरात पसरतात. नागरिकांची धावपळ होते, मात्र ज्या घराला आग लागलीय, त्याच्या खिडकीच्या काचा मात्र जैसे थे!

 

 

आता याला काय म्हणावं? रोहित शेट्टीचं दुर्लक्ष की प्रेक्षकांना मुर्ख समजण्याची हातोटी ?

५. खलनायकच ते ऑफिसर

चित्रपटातील आणखी एका सीनवरून गेल्या काही दिवसांपासून गदारोळ माजला आहे. सिम्बा सिनेमात जो खलनायकाचा भाऊ बनला आहे. तोच सूर्यवंशी सिनेमात एँटी टेरिझम स्क्वाड ऑफिसर दाखवण्यात आला आहे.

 

 

प्रेक्षकांनी ही चुक केंव्हाच दाखवून दिली, मात्र तरिही यात कोणताही बदल न केल्याने प्रेक्षक चांगलेच खवळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘RIP LOGIC’, ‘रोहित शेट्टीच्या फिल्मला भावपूर्ण श्रद्धांजली’ असं म्हणत ट्रोलर्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.

६. टायगरची कॉपी

चित्रपटाचा आणखी एक सीन खूप ट्रोल होत आहे ज्यामध्ये अक्षय कुमार छतावरून खाली उडी मारताना दिसतोय. हा सीन सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाची कॉपी असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

एक था टायगर या चित्रपटातही सलमान अशीच अॅक्शन करताना दिसला होता. त्यामुळे रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांना ट्रोल केले जात आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version