' ‘पद्मश्री’ गुंगा पैलवान आत्मसन्मानासाठी झगडतोय सरकारविरुद्ध! – InMarathi

‘पद्मश्री’ गुंगा पैलवान आत्मसन्मानासाठी झगडतोय सरकारविरुद्ध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ज्यांनी आपलं सगळं आयुष्य विधायक कार्यासाठी वाहून घेतलंय अशा ज्येष्ठ-श्रेष्ठांचा सन्मान म्हणजे पद्म पुरस्कार! समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असलेला हा ‘पुरस्कार सोहळा’ नुकताच दिल्लीत संपन्न झाला. हा बहुमान मिळवणाऱ्यांचं भरभरून कौतुक होतं, पेपर्सचे रकाने भरतात, ब्रेकिंग न्युजच्या मथळ्याखाली यांचे यांचा जयजयकार केला जातो, मात्र ज्या सरकारने हा मान दिला, कौतुक केलं, त्याच सरकारविरोधात पुरस्कारविजेत्यांनी दुसऱ्याच दिवशी आंदोलन पुकारलं असं तुम्हाला कुणी सांगितलं तर?

दुर्दैवाने ही बाब खरी आहे. ही कथा आहे एका पैलवानाची! त्याची अफाट जिद्द, व्यंगावर मात करत ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छाशक्तीची, या सर्वांची दखल घेणाऱ्या भारतीय सरकारची, मात्र केवळ पुरस्काराच्या तराजुत त्याचे यश तोलून प्रत्यक्ष सुविधांचा सोईस्कर विसर परडलेल्या प्रशासनाची!

 

virendar sinh inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोण आहे गुंगा पैलवान?

विरेंद्र सिंह उर्फ गुंगा पैलवान ठाऊक नाही असा माणूस उत्तर भारतात सापडणं कठीणच! कुस्तीचा वारसा सिंह परिवाराला पुर्वापार मिळालेला, कुटुंबातील प्रत्येकाने हा वारसा जपावा, पुढे न्यावा ही घरातील ज्येष्ठांची इच्छा विरेंद्रने पुर्ण करू शकेल की नाही याबाबत सगळ्यांनाच शंका होती, कारण विरेंदरच्या रुपाने घरात जन्मलेलं बाळ जन्मतः मुक बधीर होतं.

मात्र कुस्तीसाठी शब्द नाहीत, तर जिद्द लागते हे विरेंदरने खरं करून दाखवलं, म्हणूनच आजपर्यंत राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा अनेक स्तरांवर विरेंदरने आपला ठसा उमटवला. मुकबधीर असल्याने ‘गुंगा पैलवान’ या नावे त्याची चेष्टा केली जात असली, तरी आता मात्र त्याच्या कर्तृत्वाने हे नाव अभिमानाने उच्चारलं जातं.

 

virender 1 inmarathi

 

एकूणच आपल्या जिद्दीच्या बळावर भारताचं प्रतिनिधित्व करत विरोधी स्पर्धकावर हल्ला करणाऱ्या मुक्केबाजाला सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, मात्र पुरस्कार मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुंगा पैलवान दिल्लीतील हरियाणा भवन बाहेर उपोषणाला बसला.

नेमकं प्रकरण काय?

एका पद्मश्री पुरस्कार विजेत्याला आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसावं लागणं ही खेदजनक बाब आहे. मात्र वर्षानुवर्ष संयमाने न्यायाची वाट पाहूनही त्याला प्रतिसाद मिळत नसेल तर उपोषणाचे हत्यार उगारण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत विरेंदरने हरियाणा भवन गाठलं,

या उपोषणावेळी त्याने आजपर्यत कमाविलेली सगळी मेडल्स, बक्षिसं त्याने मांडली होती.

 

virendar wr inmarathi

 

विरेंदरला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर हरियाणाचा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ट्विट करत त्याचे अभिनंदन केले, अपंग असूनही जिद्दीने स्पर्धा जिंकणारा, हरियाणाचा सुपुत्र विरेंदर हा संपुर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे म्हणत त्यांनी विरेंदरचं तौंडभरून कौतुक केलं.

 

manoharlal inmarathi

 

त्यांच्या या ट्विटला उत्तर देत विरेंदरने आपली खंत मांडली आहे. ”मुख्यमंत्री महोदय मला पॅरा रेसलर मानतात, मात्र त्यादृष्टीने मला कोणत्याही विशेष सुविधा मिळालेल्या नाहीत. गेल्या चार वर्षांपासून मी मागण्यांसाठी झगडत असून यश मिळवूनही मी अद्याप ज्युनिअर कोच आहे. त्यामुळे या मागण्यांसाठी आता तुम्हाचा योग्य निर्णय घ्यायचा आहे”.

 

virendar tweet inmarathi

 

प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्यांना भेटत त्यांचे कौतुक केले. त्यावेळी मोदींकडेही त्याने आपल्या तक्रारींचा पाढा वाचला.

उपोषणाला बसलेल्या विरेंदरने हरियाणा राज्य सरकारला लक्ष केले. केंद्र सरकार जर पॅरा खेळाडू म्हणून सवलती देतं, मग राज्य सरकारला या बाबीचा कसा विसर पडतो? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.

उपोषण संपले पण…

पुरस्कारानंतर पद्मश्री पुरस्कार विजेता उपोषणाला बसला हे कळल्यानंतर मिडीयाने त्याकडे धाव घेतली, ही बाब दिल्लीत वाऱ्यासारखी पसरली. संसदेतील विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर ताशेरे ओढले.

ही बाब कळल्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी विरेंदरला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दिल्लीतील अनेक नेत्यांनी त्याची भेट घेत समजुत काढली. लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर विरेंदरने आपण उपोषण संपवत असल्याचं जाहीर केलं.

 

virendar sing inmarathi

 

विरेंदरचं उपोषण संपलं खरं, मात्र एका पद्मश्री पुरस्कार विजेत्याला अशा पद्धतीने आंदोलन करावं लागणं हे दुर्दैव नाही का? जिथे पद्मश्री पुरस्कार विजेत्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचण्यास उशीर लागतो, तिथे सामान्यांची काय गत?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?