Site icon InMarathi

आयकर विभागाची धाड पडली प्रियांकाच्या घरावर, आणि टॉवेल गुंडाळत दार उघडले शाहिदने

shahid final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड आणि बॉलीवूडमधली प्रेमप्रकरणं, कलाकारांचा ऑनस्क्रीन रोमान्स जितका पडद्यावर हिट होत नाही तितका ऑफस्क्रीन हिट होतो. मालदीव ट्रिप असो किंवा मुंबईतील हायफाय डेट असो कलाकारांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची प्रेमप्रकरणं बाहेर येतातच.

आज सोशल मीडिया मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याने एखाद्या शुल्लक घटनेचा रूपांतर मोठ्या घटनेत होते. त्यात कलाकारांचं आयुष्य हे तर सामान्य लोकांच्या आवडीचा विषय असतो. कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची प्रेमप्रकरणं जेवढी गाजतात तेवढी ती लवकरात लवकर संपुष्ठात देखील येतात. कधी कधी फिल्म प्रमोशनसाठी अशी खेळी केली जाते.

 

 

आज बॉलीवूडमधील काही जोड्या आजवर एकमेकांच्या सोबत आहेत तर काहीजण परस्पर संमतीने विभक्त देखील झाले. सध्या दोन जोड्यांच्या चर्चा खूप आहेत एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया तर दुसरे म्हणजे कतरीना, विक्की, सध्या या दोन्ही जोड्यांच्या लग्नाबद्दल त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत.

 

बॉलीवूडची या दोन जोड्या जशा चर्चेत आहेत तशा याआधी रणबीर दीपिका, सलमान कतरीना यांच्या लग्नबद्दल भरपूर चर्चा रंगल्या होत्या मात्र कुठेतरी बिनसलं आणि या जोड्या विभक्त झाल्या, अशीच एक जोडी होती ज्यांच्या रोमान्समुळे ते स्वतःच अडचणीत आले होते,

तरुणाईचा लाडका कबीर सिंग अर्थात शाहिद कपूर आणि हॉलिवूडमध्ये आपला डंका गाजवणारी प्रियांका चोप्रा, कमीने सिनेमापासून दोघे एकत्र आले, पडद्यावरचा त्यांचा रोमांस जसा गाजला तसाच तो ऑफ स्क्रिन सुद्धा गाजला.

 

 

झालं असं की शाहिद प्रियांका एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, मीडिया आणि फॅन्सना अंधारात ठेवून ते दोघे आपले प्रेम फुलवत होते मात्र आजच्या जगात ते ही कलाकारांची प्रेम प्रकरण कशी लपली जातील. २०११ साली प्रियांकाच्या घरी जेव्हा सकाळ सकाळ आयकर विभागाने धाडी टाकल्या होती तेव्हा प्रियांकाच्या घराचं दार हे शाहिद कपूरने उघडले होते.

 

 

आता तुम्ही म्हणाल यात काय? शाहिदने दार तर उघडले मात्र त्याने अंगावर फक्त एक टॉवेल गुंडाळला होता, सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेनंतर सुद्धा त्यांना एकत्र पहिले गेले होते. या घटनेची खबर तेव्हा मीडियापर्यंत पोहचली होती तेव्हा यावरून चांगलीच चर्च रंगली होती.

दोघांची प्रेमलीला काय फारकाळ टिकली नाही, दोघे वेगळे झाले आणि आज आपापले आयुष्याचे जोडीदार शोधून त्यांच्यासोबत आपला संसार करत आहेत. दोघांच्या आयुष्यात या आधी सुद्धा अनेक व्यक्ती होऊन गेल्या आहेत मात्र या घटनेमुळे कायमच फॅन्सच्या लक्षात राहतील.

 

 

आजकाल प्रेम ही गोष्ट जमान्यप्रमाणे बदलत जात असे, पूर्वी नातं टिकवण्यासाठी सल्ले दिले जायचे मात्र आता जोडप्यानं पटत नसेल तर विभक्त होण्याचे सल्ले दिले जातात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version