' कधीकाळी उपजीविकेची मारामार असलेलं हे गाव आज फटाक्यांचं सर्वात मोठं मार्केट आहे – InMarathi

कधीकाळी उपजीविकेची मारामार असलेलं हे गाव आज फटाक्यांचं सर्वात मोठं मार्केट आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नदीचं कुळ आणि ऋषींच कुळ शोधू नये, असं आपल्याकडे म्हंटलं जात. तस आजकाल एखादी गोष्ट हिट ठरली, की आपण लगेचच गुगल करून त्या गोष्टीची इतंभूत माहिती मिळवतो. आज तंत्रज्ञान इतके मोठ्या प्रमाणावर प्रगत झाल्याने आपलं जगणं अगदी सुखकर झालं आहे.

प्रगत तंत्रज्ञानाच्या बरोबरीने आपले सण समारंभ देखील स्मार्ट होत आहेत. आज भाऊ बहिणीला पारंपरिक भेटवस्तू देण्यापेक्षा स्मार्टवॉच देताना दिसून येतो. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी आपण आपले सण तितक्याच उत्सहाने साजरे करतो.

 

ganpati bappa morya inmarathi

 

गणपती तर मागच्यावर्षीपासून साध्या पद्धतीने साजरे होतअसले तरी दिवाळी मात्र यंदा सगळे उत्सहाने साजरे करणार आहेत. दिवाळी म्हटलं की बच्चे कंपनीची सर्वात लाडकी गोष्ट म्हणजे फटाके असं होतं. पूर्वी दिवाळी म्हटलं, की फटाके असं समीकरण होटं, मात्र आता नेत्यांचे वाढदिवस असो किंवा भारताने जिंकलेली मॅच असो आपण जल्लोषासाठी लगेचच फटाके फोडतो.

 

crackers inmarathi

सणांचं किंवा आनंदाचं समीकरणझालेल्या या फटक्यांचा नेमका उगम कुठे माहिती आहे का? भारतातील एका छोट्याश्या गावात झाला आहे, कला तर मग जाणून घेऊयात…

नेमकं गाव आहे तरी कुठे?

आज भारतातील फटक्यांची उलाढाल सर्वात जास्त या गावातून होते. तामिळनाडू राज्यात शिवकासी असे या गावाचे नाव आहे. एकेकाळी रोजच्या गरजा भागवणायसाठी संघर्ष करणारे हे गाव आज भारताच्या नकाशावर आले आहे. आज देशभरात या गावातून फटाके पुरवले जातात.

 

sivkasi inmarathi

 

वात पेटली कशी?

गोष्ट आहे जवळजवळ १०० वर्षपूर्वीची भारतावर इंग्रजांचे राज्य होते. अनेक तरुण बेरोजगार कामाच्या निमित्ताने गाव सोडून शहराकडे वळले होते. त्याकाळी दिल्ली कलकत्ता मुंबई आणि मद्रास ही चार शहर प्रामुख्याने रोजगार उपलब्ध करून देणारी होती.

शिवकाशी गावातील दोन तरुण पी अय्या नादार आणि त्याचा भाऊ शानमूग नादार हे अगदी कोवळ्या वयात कामानिमित्त गावातून बाहेर पडले. हरितक्रांतीची स्वप्न बघणारी हे दोघे जाऊन पोहचले कलकत्त्यामध्ये, तिथे त्यांनी काडेपेटीची कारखान्यात काम करून त्यांनी आग कशी तयार होते ही कला शिकली.

 

kolkata-inmarathi

 

सुरवातीला त्यांना कंपनीत कशीबशी नोकरी मिळाली, परंतु त्यांना जिथे काडेपेटीची पॅकेजिंग होते त्या विभागात टाकले होते मात्र त्यानंतर त्यांचा संबंध आला तो केमिकलशी, कोणते केमिकल वापरले तर काय होते याचा त्यांनी अभ्यास केला.

शिवकाशीत पुरागमन :

आजच्या काळात जसे अनेक तरुण काही काळापुरती नोकरी करून धंद्याचे गणित समजून आपाआपला व्यवसाय सुरु करतात त्याचपद्धतीने या दोन भावांनी १९२२ च्या आसपास गावात परत येऊन फटक्यांचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. खास जर्मनीवरून त्यांनी मशीन मागवले होते.

 

nadar inmarathi 1

 

गावातल्या लोकांना सुद्धा त्यांनी ट्रेन केले त्याचबरोबरीने ते दोघे देखील फटाके तयार करण्यात तरबेज झाले. १९४० च्या सुमारास दुसरे युद्ध सुरु झाले आणि त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला, आता महायुद्धाचा आणि त्यांच्या व्यवसायाचा काय संबंध असं प्रश्न पडला असेल तर महायुद्ध सुरु झाले आणि भारत सरकारने स्फोटक पदार्थांवर निर्बंध लादले होते.

 

second world war InMarathi

 

महायुद्ध संपल्यानंतर फटक्यांचा व्यवसाय इतका यशस्वी झाला, की  १९८० पर्यंत त्या गावात जवळजवळ १८० फटाक्यांचे कारखाने उभे राहिले. २००१ च्या अहवालानुसार आज जवळळपास ४५० कारखाने अस्तित्वात आहेत.

 

nadar 2 inmarathi

 

गावाला हरितक्रांती बनवायला निघालेले नादार बंधू उष्ण हवामान, पावसाचा अभाव या नैसर्गिक गोष्टींच्या अभावामुळे बनवू शकले नाहीत मात्र गावाला रोजगार निर्मिती करायला नक्कीच भाग पाडले.

===

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?