हत्तींची ऑडिशन? आशुतोष गोवारीकरांचं ‘परफेक्शन’ दाखवणारा रंजक किस्सा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आज बॉलीवूडच्या या मायाजालात काम करण्यासाठी देशभरातून नव्हे तर इतर देशातील कलाकार देखील येत असतात. बॉलीवूडमध्ये दाखल झाल्यावर लगेचच काम मिळेल याची शाश्वती नसते. वर्षानुवर्षे संघर्ष करून कलाकरांना कुठेतरी संधी मिळते. तर दुसरीकडे सेलिब्रेटी किड्सना सहज बॉलीवूडमध्ये संधी मिळून जाते. यावरून अनेक उलट सुलट चर्चा मागच्या वर्षीपासून सुरु आहे.
बॉलीवूडमध्ये चमकायचं असेल तर अनेक ठिकाणी ऑडिशन द्याव्या लागतात. स्टुडिओ, दिग्दर्शकांचे ऑफिसेसमध्ये सतत घिरट्या घालवल्या लागतात. आजकाल कास्टिंग डायरेक्टर नावाचा नवा प्रकार उदयास आल्याने, कास्टिंग डायरेक्टर कलाकारांची निवड करतो.
कलाकार आपापले फोटो, ऑडिशनसाठी तयार केली एखादी व्हिडिओ क्लिप, व्यक्तीरेखेसाठी लागणार पोशाख इत्यादी गोष्टींचा नीट अभ्यास करून ठेवत असते. काही कलाकरांना अगदी पहिल्याच ऑडिशनमध्ये काम मिळते तर काहीजणांना खूप संघर्ष करावा लागतो. हे झाला कलाकारांचं पण सिनेमामध्ये जर प्राणी वापरले तर त्यांची देखील ऑडिशन घेतली जाते.
एका सिनेमासाठी हत्तीची गरज होती तेव्हा दिग्दर्शकाने एक दोन नव्हे तर तब्बल १०० हत्तींची ऑडिशन घेतली होती, आश्चर्य वाटलं असेल ना? नेमका कोणता तो सिनेमा चला तर मग जाणून घेऊयात…
जोधा अकबर सिनेमा आठवत असेल, ग्रीक गॉड अर्थात हृतिक रोशन आणि ऐश्वर्य राय बच्चन या दोघांनी काम केलेला हा सिनेमा, भव्य दिव्य सेट्स, उत्तम कलाकारांची बांधणी, प्रेमकथा, फर्मास उर्दू या सगळ्या गोष्टींची उत्तम सांगड असेलल्या सिनेमाने प्रेक्षकांची मन जिंकली मात्र इतिहासकारांनी काहीसा नाराजीचा सूर लावला होता.
–
- दिग्दर्शकाची चाणाक्ष नजर… आणि ‘हा’ सुपरहिट डायलॉग तयार झाला!
- तालिबान्यांनी जीवघेण्या धमक्या देऊनही बॉलिवुडच्या या दिग्दर्शकाने शूट केला सिनेमा
–
मुद्दा होता तो हत्तीच्या सीन्सचा, सिनेमात युद्धाचे काही प्रसंग आहेत, जिथे आपण पहिले असेल घोडदळ, पायदळ आणि हत्ती दाखवले आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचे बारीकसारीक गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष असते. जेव्हा हत्तींची सीनमध्ये गरज होती तेव्हा त्याने आपल्या पत्नीला सांगितले ‘मला १०० हत्ती हवेत, हत्तींमध्ये सुद्धा केवळ मादी हत्तीण हवी’.
दिग्दर्शकाच्या या विचित्र अटीबद्द्दल बायकोला आश्चर्य वाटले, कारण तीच सिनेमाची निर्माती होती, तिने आपली शंका व्यक्त केली की मादी हत्तीण का? त्यावर हुशार दिग्दर्शकाने उत्तर दिले की, ‘मादी हत्ती या तीव्र नसतात, तसेच त्या एकाच उंचीच्या हव्यात.
तब्बल १०० हत्तींना सेटवर आणणे म्हणजे महादिव्य काम होते यावर देखील दिग्दर्शकाने असे सांगितले की सिनेमात व्हीएफएक्सचा खर्च कमी करायचा असेल तर आपण १०० हत्तींनाच घेऊ.
आयएमडीबीच्या माहितीनुसार सिनेमामध्ये ८० हत्तीणी, १०० घोडे आणि ५५ उंट इत्यादींचा फौजफाटा घेऊन सिनेमा बनवला गेला होता. सिनेमा तयार झाला आणि आपल्याला एक भव्यदिव्य कलाकृती पाहायला मिळाली.वरील किस्सा हा आशुतोष गोवारीकरच्या पत्नीनेच एका मुलाखतीत सांगितला आहे.
–
- भारतीय चित्रपटांना नवी दिशा देणारा असामान्य दिग्दर्शक : आशुतोष गोवारीकर
- घोड्यांच्या देखभालीपासून ऑस्करपर्यंत – वाचा या भारतीय दिग्दर्शकाचा अफाट प्रेरणादायी प्रवास
–
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरची ओळख एक हुशार आणि अभ्यासू दिग्दर्शक म्हणून आहे. लगान सारख्या सिनेमावर त्याने घेतलेली मेहनत खरोखरच आपल्या कामावरच्या प्रेमाची पावती देते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.