Site icon InMarathi

बॉलिवूडच्या मायलेकींनी एका कारणामुळे २० वर्षे एकमेकींशी संवाद साधला नाही

nutan final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

दर्जेदार अभिनय आणि सहजता या गुणांमुळे प्रसिद्ध असलेली उत्तम अभिनेत्री नूतनजी यांना विसरणे अशक्य आहे. ५०-६० च्या दशकातील ही अभिनेत्री आपल्या करिअर मुळेच नव्हे तर वैयक्तिक बाबींमुळे सतत चर्चेत राहिली.

नूतनजी यांचा जन्म २४ जून १९३६ मध्ये संपन्न घरात झाला. त्यांच्या बहीणभावांमध्ये सगळ्यात मोठ्या होत्या. नूतन ज्यांच्या आईचे नाव शोभना सामर्थ, तर वडिलांचे नाव कुमारसेन समर्थ होते. नूतनजिंच्या आई सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करत होत्या, त्यांच्याच प्रेरणेने नूतनजी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या आईनेच त्यांच्या स्वप्नांना पंख दिले. नूतनजींच त्यांच्या आईसोबत खूप जवळच आणि घट्ट नात होत.

 

 

नूतनजिंनी १९५० मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.त्या वेळी त्यांचं वय खूप कमी होते.त्यांचा पहिला चित्रपट “नल दमयंती” हा होता, ज्यामध्ये त्यांनी बाल कलाकार म्हणून अभिनय केला होता. त्याच वर्षी ” हमारी बेटी” हा त्यांचा दुसरा चित्रपट आला होता,जो त्यांच्या आईने बनवला होता.

१९५९ मध्ये नूतनजींच लग्न लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी झाले. लग्नानंतरही त्यांची बॉलिवूड कारकीर्द चालूच होती. हमलोग, शिशम, आगोश असे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. लग्नानंतर काही काळ त्या लंडनला गेल्या, परत आल्यानंतर सीमा या चित्रपटाने त्यांनी पुन्हा कारकिर्दीला सुरुवात केली. ज्यात त्यांनी विद्रोही भूमिका केली होती. याच भूमिकेसाठी त्यांना पहिला बेस्ट अॅक्टरस ऑफ फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

 

 

नूतन जी यांची एकंदर कारकीर्द खूप यशस्वी ठरली. पण काही वैयक्तिक बाबींमुळे त्या काहीशा नाराज होत्या, शिवाय त्यामुळेही त्या सतत चर्चेत राहिल्या.

 

लग्नापूर्वी नूतनजी यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्या त्यांच्या आईसोबत २० वर्षे बोलल्या नाहीत. त्यांच्या न बोलण्या मागे तसच काहीस कारण होत ते म्हणजे नूतनजींना त्यांच्या आईने बॉलिवूड मध्ये ओळख निर्माण करून दिली, ती म्हणजे त्यांच्या आईच्या नावाच्या प्रोडक्शनमध्ये ज्याचं नाव होत शोभना पिक्चर्स.

नूतनजी जे काही कमावत होत्या ते सगळं त्यांच्या आईच्या कंपनीमध्ये जात होत, सगळे आर्थिक व्यवहार त्यांच्या आई सांभाळत होत्या,जसा सगळ्या मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसाच विश्वास नूतनजींचा आपल्या आईवर होता, म्हणूनच नूतनजींनी कधीच त्यामध्ये लक्ष घातले नाही.

 

 

हा विश्वास तेव्हा तुटला जेव्हा इन्कम टॅक्स ऑफिस मधून टॅक्स भरण्यासाठी पत्र घरी आले. टॅक्स म्हणून भरावी लागणारी रक्कम खूप मोठी होती, पत्र घरी असल्यावर शोभानाजिनी सगळीच्या सगळी रक्कम नूतन जिना भरायला सांगितली, नूतनजी ही रक्कम भरायला तयार नव्हत्या, कारण त्यांची पूर्ण कमाई ही कंपनीतच जमा होत होती.

नूतनजी तरीदेखील त्यांच्या हिस्स्यामध्ये असलेली रक्कम भरायला तयार होत्या,पण त्यांच्या आईने सगळीच रक्कम तूच भर असे सांगितले.बर काही प्रॉपर्टी विकायला शोभानाजिंचा विरोध होता, तसच शोभानाजिंच्या कंपनीत नूतनजिंचा फक्त ३० टक्के हिस्सा होता.

 

आपल्या आईला नात्यापेक्षा पैसा आणि जमीन जुमला जास्त जवळचा झाला आहे हे नूतनजींच्या लक्षात आले आणि त्याच वेळी त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

नूतनजी या घटनेमुळे प्रचंड दुखावल्या गेल्या, त्यांच्या विश्वासाला तडा गेला तो कायमचा. पुन्हा त्या कधीही आपल्या आईशी बोलल्या नाहीत. यांच्यातील वाद इतके वाढले गेले की हे प्रकरण कोर्ट कचेरी पर्यंत जाऊन पोहचले.पण यांच्यातील संबंध पुन्हा पूर्वी सारखे झाले नाहीत.आपल्या दर्जेदार अभिनयामुळे नूतनजींनी चार दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि कायमच करत राहतील यात कसलीही शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version