“केरसुणी घेऊन जमीन झाडणार्या प्रियांका गांधींच्या व्हिडिओ मागे नेमकं राजकारण काय आहे?”
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – सोहम गोडबोले
===
गेल्या वर्षीपासून कोरोना हा साथीचा आजार भारतात फैलावु लागला आणि देशात एकच खळबळ उडाली होती. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकीचे जनजीवन पूर्णपणे ठप्प होते. निर्बंध उठू लागले जनजीवन रुळावर येत होते त्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सगळ्यावर पाणी फिरले गेले.
देशात एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे हरियाणा पंजाबमधील शेतकऱ्यांनी मात्र कृषी आंदोलनाविरुद्ध बंडच पुकारले होते. दिल्लीच्या बॉर्डर हे आंदोलन सुरु होते. ते आंदोलन संपते नाही तो पुन्हा एका नव्या आंदोलनामुळे राजकरण ढवळले गेले आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे या आंदोलनास सुरवात झाली. आंदोलनाची तीव्रता जशी वाढू लागली तसे पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्याच दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा त्याच भागात काही कामानिमित्त आला होता. तो जात असताना अनेक शेतकऱ्यांनी त्याला काळे झेंडे दाखवले, त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव असलेल्या गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले.
या कृत्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि विरोधकांनी सरकारला चांगेलच धारेवर धरले, शरद पवारांनी तर या घटनेला थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी जोडले. विरोधी पक्षाला या घटनेचे राजकरण करायला संधी मिळालीच.
–
- शेतकरी आंदोलनाचं खलिस्तानी कनेक्शन : ‘टुलकिट’ मागचा छुपा दहशतवाद
- “नेहरूंचा ‘हा’ कायदा शेतकरी आत्महत्येस कारणीभूत होता” सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
–
काँग्रेस सरकार हे अनेकवर्ष यूपीत आपले सरकार आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. मग ते हाथरास बलात्कार असो किंवा सोनभद्र येथे केलेलं आंदोलन असो, प्रत्येकवेळी आपण बघितलं तर लक्षात येईल की काँग्रेसकडून सध्या प्रियांका गांधी हाच चेहरा दिसत आहे. मागे राहुल गांधी यांनी यूपीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाअपयशच आले.
लखीमपूर दुर्घटनेतील पीडितांना भेटायला म्हणून प्रियांका गांधी दिल्लीवरून निघाल्या होत्या मात्र त्यांना घटनास्थळी पोहचू न देता वाटेतच अडवले आणि एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले.
कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत त्यांना ताब्यात घेण्यात आले. ज्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले ते अत्यंत खराब होते म्हणून चक्क प्रियांका गांधींनी हातात झाडू घेऊन साफसफाई करण्यास सुरवात केली.
प्रियांका गांधींच्या या कृतीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ टाकत सरकारवर टीका केली. मात्र यावरून तर्कवितर्क काढले जात आहे. सफाई कामगार असताना देखील प्रियांका गांधी यांनी का झाडू हातात घेतला? मुळात त्याच्यापर्यंत झाडू पोहचला कसा? असे तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र यामागे वेगळीच डाळ शिजली जात आहे असं दिसून येतयं, नेमकं काय आहे यामागचं राजकारण चला तर मग जाणून घेऊयात…
प्रियांका गांधी काँग्रेसचा चेहरा?
उत्तर प्रदेशच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. सत्ता कायम राखण्यासाठी योगी सरकारने कंबर कसली आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांची भेट झाली. साहजिकच भेटीत निवडणुकीची रणनीती आखली असणार. त्यातच काँग्रेसचे नेते पी एल पुनिया यांनी काही दिवसांपूर्वी असे म्हंटले की, ‘प्रियांका गांधी या काँग्रेस पक्षाचा चेहरा म्हणून यंदाच्या निवडणुकीत दिसेल, तसेच राज्यात त्यांच्या इतका मोठा राजकीय व्यक्ती नाही’.
विरोधी पक्षाकडे कोणताच लोकप्रिय चेहरा नसल्याने काँग्रेस आणि पक्षांनी प्रियांका गांधींवरच शिक्का मोर्तब केला असावा. प्रियांका गांधींच्या नजरकैदेतुन बाहेर आल्या नंतर त्यांनी दलित वस्तीला भेट दिली तिथेही त्यांनी झाडू मारला, योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांच दलित वस्तीत मोदींनी अखिल भारतीय स्वछता अभियानाचा नारा दिला होता.
प्रियांका गांधीच्या दलित वस्ती भेटीमुळे तिकडच्या नागरिकांवर याचा चांगलाच प्रभाव पडलेला दिसून येत आहे असे बोलले जात आहे. याआधी बस, स्कुटीवरून प्रवास करून त्यांनी आपली वेगळी ओळख जनमानसात निर्माण केलीच आहे.
विरोधकांमध्ये फाटाफूट :
लखीमपूरघटना घडल्यावर विरोधी पक्षातील अनेक मंत्र्यांची अडवणूक करण्यात आली होती. अखिलेश यादव जेव्हा घरातून निघाले तेव्हाच त्यांची अडवणूक करण्यात आली होती, मात्र त्यांनी आंदोलन केल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशच्या सरकारकडे हेलिकॉप्टर उतरवणायची परवानगी मागितली होती.
एकूणच सरकारने विरोधकांना वेगवेगळ्या ठिकाणहून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला. प्रियांका गांधींना गेस्ट हाऊसमध्ये नजर कैदेत ठेवले तर अखिलेश, शिवपाल यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले जेणेकरून विरोधकांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्यांच्यात फोडफोडीचे राजकारण करता येईल.
–
- मूर्ती पूजेच्या विरोधाखातर मुस्लिमांनी विरोध केलेल्या गांधींच्या पुतळ्याचे अखेर अनावरण
- देशाचे तुकडे करू पाहणारा कन्हैया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये; आता या पक्षाचा विनाश अटळ!
–
उत्तर प्रदेशचा भूभाग एखाद्या भिंतीसारखा पूर्वेपासून पश्चिमेकडे पसरला आहे. योगी सरकारचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प या राज्यात निर्माण होत आहेत. मध्यंतरी मुंबईची फिल्म सिटी यूपीत नेली जात आहे असे बोलले जात होते मात्र खुद्द योगींनी याला दुजोरा दिला.
राज्यांच्या निवडणुका होतीलच मात्र सध्या सगळेच राजकीय पक्ष एकाच गोष्टीच्या मागे लागले आहेत ते म्हणजे २०२४ची लोकसभा निवडणूक, आज भाजपला हरवण्यासाठी विरोधकांची फळी उभी राहत आहे. येत्या काही दिवसात काही नवे राजकीय भूकंप नक्कीच पहायला मिळतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.