ज्या देशात ही रम अस्तित्वात आली, तिथेच ती मिळणं आता अशक्य झालंय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
काही वस्तूंचे ब्रँड हे त्या वस्तूपेक्षाही मोठे झालेले असतात. जसं की, झेरॉक्स म्हणजेच फोटो कॉपी हे कित्येक लोकांना आजही वाटतं. बिसलेरी म्हणजेच शुद्ध पाणी ही एक ओळखसुद्धा काही लोकांमध्ये खूप रूढ झालेली आहे.
मद्यप्रेमींमध्ये रम म्हणजे ‘बकार्डी’ ही पण एक ओळख खूप लोकप्रिय आहे. १८६२ मध्ये क्युबा येथे शोध लागलेली ही रम आज १५० वर्ष झाले तरीही ‘बकार्डी’ जगभरात असलेली मागणी ही त्यांनी गुणवत्तेत राखलेल्या सातत्याची पावती आहे.
कित्येक पार्ट्यांची शान असलेली ‘बकार्डी’ सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. ज्या क्युबा शहराने ‘बकार्डी’ला जन्म दिला तिथेच ती आता मिळेनाशी झाली आहे. काय कारण असेल? बकार्डीचा इतिहास काय आहे? जाणून घेऊयात.
बकार्डी आणि कोका-कोला हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय कॉकटेल म्हणून मानलं जातं. कॅरेबियन आणि अमेरिकेतील लोकांना सर्वाधिक आवडणाऱ्या या रमचा शोध स्पेनमध्ये जन्म झालेल्या ‘फाकुंडो बकार्डी मासो’ या व्यक्तीने लावला होता.
–
- मद्यप्रेमी असाल किंवा नसाल पण जगातल्या या महागड्या Whiskies विषयी जाणून घ्याच!
- जागा २० एकर, टर्नओव्हर ५०० कोटी, जगप्रसिद्ध भारतीय ब्रॅंडची कथा!
–
१६ व्या वर्षी फाकुंडो हा स्पेनहून क्युबा मध्ये आला होता. सुरुवातीला एक साधं ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून तयार करण्यात आलेल्या बकार्डीला नंतर ‘यीस्ट’चा वापर करून एक विशेष चव देण्यात आली होती.
चारकोलच्या सहाय्याने बकार्डीमधील सर्व अशुद्धता काढून टाकण्यात आली आणि त्याचं आयुष्य वाढवण्यात आलं. पांढऱ्या बॅरल मध्ये ठेवून बकार्डी ही साचवून ठेवली जायची. या प्रक्रियेमुळेच जगातील पहिल्या ‘पांढऱ्या’ रमची निर्मिती झाली.
फाकुंडो बकार्डी याने पहिली फॅक्टरी ही मेहुण्यासोबत सुरू केली होती. बकार्डी लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली तेव्हा क्युबा हा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडत होता.
१८८० आणि १८९० च्या दशकात हा स्वातंत्र्य संघर्ष सुरू होता. स्पेनच्या सैनिकांसोबत सुरू असलेल्या या संघर्षात फाकुंडोच्या मोठ्या मुलाला कित्येक वेळेस जेल मध्ये जावं लागलं होतं. क्युबा मधील सर्व कुटुंबांना सुरक्षेच्या कारणासाठी ‘जमैका’ला पाठवण्यात आलं होतं.
१९१२ मध्ये जेव्हा अमेरिकेने क्युबावर आपला ताबा घोषित केला होता त्यानंतरचे दिवस हे बकार्डीसाठी भरभराटीचे होते. फाकुंडो बकार्डी याने त्यानंतर बार्सिलोना आणि न्यूयॉर्क शहरात आपले बॉटलींग प्लॅन्ट सुरू केले. १९२० मध्ये जेव्हा अमेरिकेत बदलाचे वारे वाहू लागले आणि क्युबा हे एक पर्यटन स्थळ म्हणून समोर आलं.
क्युबामध्ये आलेल्या पर्यटकांना बकार्डी मोफत देऊन या उद्योग समूहाने आपली लोकप्रियता वाढवली होती. एकाच घरातील तीन पिढ्यांनी सुरू ठेवलेला हा व्यवसाय वृद्धिंगत होत गेला आणि मेक्सिको, पयुरेटो रिको आणि अमेरिकेतील इतर भागात बकार्डी रम पोहोचू लागली.
१९३० मध्ये बकार्डीने ‘हवाना’ येथे आपलं मुख्य कार्यालय सुरू केलं. १९६० चं दशक हे बकार्डीच्या क्युबामधील अस्तित्वाला धक्का देणारं होतं. फिडेल कॅस्ट्रो या व्यक्तीने लोकांना एकत्र करून क्युबावर आपला दावा घोषित केला. बकार्डी कंपनीला आपलं ट्रेडमार्क विकून टाकण्यासाठी सांगण्यात आलं.
बकार्डीची तिसरी पिढी त्यावेळी हा व्यवसाय चालवत होते. फाकुंडो बकार्डी यांनी तयार केलेला हा ब्रँड इतरांच्या हातात द्यावा लागू नये म्हणून बकार्डीने आपलं काम बहामामधून हलवून मेक्सिकोमध्ये पूर्णपणे शिफ्ट केलं.
अमेरिकेतील व्यापारासाठी ही बाब बकार्डीच्या फायद्याची ठरली. पण, त्यामुळे एक फरक पडला की बकार्डीचं क्युबामधील अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झालं. आजही बकार्डी क्युबामधील स्टोअर्स मध्ये मिळत नाही.
क्युबा या आईसलँडवर आता ‘हवाना क्लब’ या रमने मार्केट काबीज केलं आहे. बकार्डीने हा ब्रँड विकत घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. पण, क्युबामधील सरकारने त्या गोष्टीची परवानगी दिली नाही. फिडेल कॅस्ट्रोच्या काळातील गोष्टी या आजही आमलात आणल्या जात आहेत ही एक आश्चर्याची बाब आहे.
बकार्डी ही देशाची ओळख व्हावी आणि एका कुटुंबाची मालमत्ता असू नये अशी फिडेल कॅस्ट्रोची नेहमीच इच्छा होती. १९६४ मध्ये बकार्डीने आपलं मुख्य कार्यालय ‘मियामी’ इथे हलवलं. ‘बकार्डी बिल्डिंग’ म्हणून ही जागा आज प्रसिद्ध आहे.
–
- चकणा म्हणून या ५ गोष्टी टाळाच, नाहीतर ‘एकच प्याला’ तुम्हाला चांगलाच महागात पडेल!
- गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतलं ४०० वर्षं जुनं पेयं आजही कित्येक पर्यटकांना आकर्षित करतं!
–
बकार्डी आज जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक खप असलेली रम म्हणून प्रसिद्ध आहे. पांढऱ्या रंगापासून बकार्डीची झालेली सुरुवात आज सोनेरी रंगापर्यंत जाऊन पोहोचली आहे.
१९९३ मध्ये बकार्डीचं ‘मार्टिनी अँड रोसिनी’ या कंपनीत विलीनीकरण झालं. पण, तरीही बकार्डीला क्युबा मध्ये विक्रीसाठी परवानगी मिळवता आलेली नाहीये. २०० ब्रँड्सचा मालक असलेला बकार्डी ग्रुप आज जगातील १७० देशांमध्ये पोहोचला आहे.
बकार्डी ही आपल्या चवीमुळे तर प्रसिद्ध आहेच. पण, ती त्याच्या संघर्ष कथेमुळेसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे.
बरमुडा सारख्या ठिकाणी तयार होणारी, जगभरात मिळणारी आणि उडणाऱ्या वटवाघळाचं चित्र असलेली बकार्डी ही क्युबामधील लोकांच्या पार्टीत सुद्धा पोहोचावी अशी तिथले लोक आजही इच्छा व्यक्त करत असतात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.