“मन्नतबाहेर नाही, कलामांच्या घराबाहेर फोटो काढा”: सडेतोड पत्रकाराचा व्हायरल व्हिडिओ
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
न्यूज चॅनल्स, प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं, देश तसेच राज्यातील कित्येक घडामोडींना वाचा फोडण्याचं काम या माध्यमातून होते. पण गेल्या काही काळापासून लोकशाहीचा हा चौथा स्तंभ कमकुवत झालेला दिसून येतोय.
याला जबाबदार जितकी प्रसारमाध्यमं आहेत तितकीच जवाबदार देशातली जनतासुद्धा आहे. “जो बिकता है वही बेचो” या नियमाखाली चालणारी बरीचशी माध्यमं जे खपतं तेच विकतायत आणि त्या नादात ते त्यांची खरी जबाबदारी विसरले आहेत.
जेव्हा शाहरुखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली तेव्हा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली, त्या घटनेनंतर प्रत्येक चॅनल्स ब्रेकिंग न्यूजच्याच मागे हात धुवून पळत सुटली होती. खरंतर आपल्या देशात ही गोष्ट नवीन नाही, एखादी घटना घडली की तिचा चावून पार चोथा करण्याचं काम आपली मीडिया करते.
कधीकधी तर त्याची शहानिशासुद्धा न करता केवळ ब्रेकिंग न्यूज सर्वात पहिले कोण देणार या स्पर्धेत फॅक्ट कुणीच तपासत बसत नाही. मराठी दिग्दर्शक निशिकांत कामत याच्या मृत्यूची बातमी असो किंवा टाटांनी एअर इंडिया पुन्हा घेतल्याची बातमी असो.
दोन्ही बातम्यांची काही काळानंतर पुष्टी झाली ती वेगळी गोष्ट पण कोण आधी बातमी देणार या चढाओढीमध्ये पत्रकारीतेचे मूलभूत नियम प्रसारमाध्यमं विसरली आहेत हे मात्र नक्की.
–
- आर्यन खानसोबत सेल्फी; कोण आहे हा, खासगी गुप्तहेर की तरुणांना लुबाडणारा तोतया?
- बाप तसा पोरगा : खुद्द शाहरुखलासुद्धा एकदा पोलिस स्टेशनची हवा खावी लागली होती!
–
जेव्हा आर्यन खानला अटक झाली तेव्हा तो ज्या बोटीवर पकडला गेला त्या बोटीवर आणखी कोण कोण उपस्थित होते, त्या बोटीच्या तिकिटाची किंमत काय होती या तर चर्चा रंगल्याच.
शिवाय आर्यनला अटक झाल्यावर तो जेलमध्ये काय जेवणार, त्याला स्पेशल वागणूक दिली जाणार का, इथपासून ते अगदी त्याच्या आईने त्याला मॅकडोनाल्डचं बर्गर आणून दिलं, तिला अश्रु अनावार झाले इथवर सगळ्या बातम्या माध्यमांनी मीठ मासाला लावून दाखवल्या आणि लोकांनीसुद्धा त्या चवीने ऐकल्या.
याच सगळ्या गोष्टीवर पटनावरून आलेल्या एका पत्रकाराने आपल्या मीडियाची चांगलीच टर उडवली आहे. सच तक नावाच्या एका युट्यूब चॅनलच्या मनीष कश्यप नावाच्या एका पत्रकाराने खुद्द शाहरुखच्या घराबाहेर म्हणजेच मन्नतबाहेर जाऊन शाहरुखची चांगलीच पोलखोल केली आहे.
सध्या फेसबुक, तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हे एक युट्यूब चॅनल आहे, कोणतंही नावाजलेलं चॅनल नव्हे ज्याला करोडो रुपयांचं आर्थिक सहाय्य देशातल्या मोठमोठ्या लोकांकडून केलं जातं.
त्यामुळे हे चॅनल आपल्याला कुठेच टेलिव्हिजनवर दिसणार नाही, पण तरीही देशातल्या एका मोठ्या सुपरस्टारच्या घराबाहेर जाऊन या सगळ्या प्रकारावर इतकं बेधडक भाष्य करायलासुद्धा वाघाचं काळीज हवं.
याच व्हिडिओमध्ये मनीष याने शाहरुखच्या घराबाहेरची अव्यवस्था तर दाखवलीच शिवाय कशाप्रकारे आजही त्याच्या घराबाहेर करोडो लोकं येतात आणि फोटो काढतात पण त्यांना ही जाणीव नाहीये का याच सुपरस्टारचा मुलगा हा एका मोठ्या ड्रग केसमध्ये पकडला गेलाय, तर निदान आत्तातरी याच्या घराबाहेर जाऊन फोटो काढण्यात नेमकं काय भूषण आहे असा सवाल त्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांना केला.
या प्रश्नावर काहींनी उत्तर दिलं तर काहींनी त्यांना या ड्रगकेसबद्दल काहीच माहीत नसल्याचा आव आणत शाहरुखप्रती प्रेम व्यक्त केलं.
कोणत्याही मोठ्या चॅनलशी जोडलेला नसूनही या माणसाने एका व्हिडिओमधून सगळ्या देशातल्या माध्यमांना पत्रकारिता काय असते हे दाखवून दिलं आहे.
आज आपल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून लोकं अशा मोठमोठ्या सेलिब्रिटीजची घरं बघायला येतात, त्यांनी कितीही गुन्हे केले तरी त्यांच्या घराबाहेर उभं राहून फोटो काढतात, पण याच देशाची सेवा करणाऱ्या ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या घराबाहेर जाऊन कुणीच कधी फोटो काढत नाही आणि काढला तरी तो सोशल मीडियावर टाकत नाही, असा या पत्रकाराने सवाल उपस्थित करून खरंच आपल्या सगळ्यांचे डोळे उघडले आहेत.
लोकांना हेच वाचायला आवडतं असं कारण देऊन ही प्रसारमाध्यमं त्यांची चामडी वाचवतात, शेवटी खापर फुटतं ते तुमच्या आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या डोक्यावरच.
कारण या सगळ्या मोठ्या सेलिब्रिटीजना आपण एवढं मोठं केलं आहे, आणि मध्यामं फक्त तेच दाखवत आहेत. हिंदी, मराठी इंग्रजी कोणतीही पत्रकारिता असो पण आज मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ बघून यातून काहीतरी धडा घ्यायलाच हवा.
शाहरुखच्या पोराने देशासाठी गोल्ड मेडल आणलेलं नाहीये, तो एका रेव्ह पार्टीत पकडला गेलाय आणि त्याच्यावर लागलेली कलमं ही खरंच खूप गंभीर आहेत, त्यामुळे प्रसारमध्यामांनी या गोष्टीचं भान राखून काम केलं पाहिजे.
नाहीतर हाच कमकुवत झालेला लोकशाहीचा चौथा स्तंभ कधी कोसळेल हे सांगता यायचं नाही, समस्त मीडिया क्षेत्राच्या डोळ्यात जहाल अंजन घालणाऱ्या या युट्यूब चॅनलला आणि त्याच्या पत्रकाराला एक कडक सल्युट झालाच पाहिजे!
===
- “माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स सुद्धा घ्यावेत”, वाचा शाहरुख अजून काय म्हणाला होता
- बॉलिवूडच्या ‘धुंद’ पार्ट्यांशी ‘बटाटा’ ग्रुपचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.