दिवसाला ८० कोटी चॉकलेट्सची निर्मिती, ६० देशांमध्ये ख्याती! हा प्रवास सोपा नव्हता…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
चॉकलेट हा आपल्या सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. चॉकलेट आणि त्यापासून तयार होणारे सिरप, कॉफी, केकसारखे इतर सगळेच पदार्थ इतके आकर्षक असतात, की त्यांच्याबद्दल जाणून घेतांना सुद्धा एक निराळा गोडवा जाणवतो.
‘हर्षेज्’ या चॉकलेट तयार करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची यशोगाथा सुद्धा याला अपवाद नाही. अमेरिकेत शोध लागलेल्या ‘हर्षेज्’ची सुरुवात ही १८७३ मध्ये एका कॅन्डी शॉपपासून झाली होती. मिल्टन हर्षे या अमेरिकेतील व्यक्तीने फिलाडेल्फिया या शहरात ‘हर्षेज्’ची मुहूर्तमेढ रोवली होती.
मिल्टन हर्षे यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही पेन्सिलविनिया येथे सुरू केलेल्या ‘कॅण्डी शॉप’मधील मर्यादित यश आणि न्यूयॉर्क येथील कॅण्डी शॉपमध्ये झालेल्या नुकसानाने झाली होती.
न्यूयॉर्कमधील व्यवसायात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी हर्षे हे पुन्हा पेन्सिलविनिया येथे आले आणि त्यांनी ‘कॅरेमल’ विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
२० वर्ष तो व्यवसाय यशस्वीपणे चालवल्यानंतर मिल्टन हर्षे यांनी येणाऱ्या काळात चॉकलेटची वाढणारी मागणी लक्षात घेऊन ‘कॅरेमल’ तयार करणारी कंपनी सुद्धा विकण्याचा निर्णय घेतला.
पदार्थ विज्ञानात पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मिल्टन हर्षे यांनी १८९३ मध्ये ‘वर्ल्ड कोलंबियन एक्सपोसीजन’ या शिकागो येथील प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली होती. या प्रदर्शनात हर्षे यांना चॉकलेट तयार करणारं एक यंत्र दिसलं. मिल्टन हर्षे यांनी ते यंत्र विकत घेऊन १८९४ मध्ये ‘द हर्षे कंपनी’ची स्थापना केली.
–
- लहानपणीचं आवडतं “रावळगांव” चॉकलेट… वाचा, त्याच्या लोकप्रियतेचं रहस्य!
- सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स!
–
चॉकलेट तयार करण्याचं यंत्र येण्यापूर्वी चॉकलेटकडे एक महाग वस्तू म्हणून बघितलं जायचं. चॉकलेट तयार करण्याच्या प्रक्रियेला लागणारा वेळ कमी व्हावा आणि दुधापासून चॉकलेट तयार करता यावं यासाठी मिल्टन हर्षे यांनी संशोधन सुरू केलं. दुधापासून चॉकलेट सोबतच कँडी तयार करता यावी म्हणून हर्षेज् यांनी ‘मिल्क प्रोसेसिंग प्लॅन्ट’ची सुरुवात केली.
चॉकलेट तयार करून त्याला ‘कॅरेमल’चं आवरण देण्याचा ‘हर्षेज्’ यांचा पहिला विचार होता. पण, लोकांना चॉकलेटची आवडलेली चव यामुळे हर्षे यांनी ‘कॅरेमल’ वापरण्याची कल्पना बाद केली.
मिल्टन हर्षे यांनी लवकरच ‘हर्षेज्’ मिलकी बार’ तयार करण्यास सुरुवात केली. चॉकलेटच्या आणि सिल्व्हर रॅपरच्या रंगात विकायला सुरुवात केलेली कँडी ही अल्पावधीतच पूर्ण अमेरिकेत लोकप्रिय झाली.
१९०० साली मिल्टन हर्षे यांनी ‘कॅरेमल’ विकण्याचा प्लॅन्ट विकून टाकला आणि आपलं पूर्ण लक्ष चॉकलेट तयार करण्यावर केंद्रित केलं.
पेन्सिलविनिया या शहरात मिल्टन हर्षे यांनी आपली चॉकलेट तयार करण्यासाठी एक परिसरच विकसित करून घेतला. १९०७ मध्ये ‘हर्षेज्’ यांनी ‘हर्षेज् किसेस’ या चॉकलेटची निर्मिती केली. १९२५ मध्ये ‘हर्षेज्’ यांनी ‘मिस्टर गुडबार’ आणि १९२६ मध्ये ‘हर्षेज् सिरप’ची निर्मिती केली ज्यामुळे ते घराघरात पोहोचले.
‘हर्षेज्’ कंपनीने प्रगतीतील पुढचं पाऊल १९६३ मध्ये पडलं जेव्हा त्यांनी ‘रिज् पिनट बटर कप्स’ ही कंपनी विकत घेतली. हे चॉकलेट काही वर्षांनी कंपनीचं सर्वात जास्त विक्री होणारं चॉकलेट ठरलं.
‘हर्षेज्’ या कंपनीची चॉकलेट्स आज जगातील ६० देशांमध्ये चवीने खाल्ली जातात. सध्या ‘हर्षेज्’ ही कंपनी दिवसाला ८० कोटी चॉकलेट्सची निर्मिती करते आणि जगभरात त्यांना निर्यात करते. जगभरात आज ‘हर्षेज्’मुळे १४,००० लोकांना नोकरी मिळाली आहे.
–
- किचनमध्ये आईने केलेल्या प्रयोगाला बहीण-भावाने दिलं व्यवसायाचं रूप; करतायत करोडोंची कमाई
- आपल्या आवडत्या ‘कॅडबरी- डेअरी मिल्क’ विषयीच्या या खास गोष्टी वाचून तुम्ही थक्क व्हाल
–
अमेरिकेला जाणारे कित्येक पर्यटक हे पेन्सिलविनिया येथील ‘हर्षे पार्क’ला भेट देतात आणि ‘हर्षेज्’च्या इतिहासाची माहिती घेत विविध चॉकलेट्सची चव चाखत असतात.
१२५ वर्षांपासून चॉकलेट तयार करणारी ही कंपनी आजही तशीच जिभेवर रेंगाळणारी चव चाखण्याची पर्वणी देत आहे हीच त्यांची विशेषता आहे. मिल्टन हर्षे यांची लोकांना सर्वोत्तम चॉकलेट आणि सेवा देण्याच्या वृत्तीमुळेच हे यश शक्य झालं आहे यावर ‘हर्षेज्’ सोबत वर्षानुवर्षे काम करण्याचा अगाध विश्वास आहे. सुरुवातीच्या काळात आलेलं अपयश विसरून ‘हर्षेज्’ने मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.