Site icon InMarathi

सत्ताधारी उपमुख्यमंत्र्यांनी १९८४ मध्ये केलेलं कृत्य आजही महाराष्ट्र विसरलेला नाही…

ramrao 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘राजकारणी आणि त्यांची प्रकरणं’ हे समीकरण काही नवं नाही. राजकारणात आक्रमक असलेले नेते खऱ्या आयुष्यात प्रचंड रोमॅन्टिक, रंगेल असतात. अर्थात हे विधान सिद्ध करणारी अनेक उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात सापडतील.

 

 

अर्थात या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराम आदिक यांचं नाव घेतल्याशिवाय ही यादी पूर्ण होणं शक्यच नाही. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावर असतानाही रामराव आदिकांनी केलेलं ते कृत्य आजही महाराष्ट्र विसरला नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजपर्यंत अनेक हादरे सहन केले, अनेक धक्के पचवले, राजीनाम्यांची वादळंही मुकाटपणे सोसली मात्र सार्वजनिक आयुष्यात उघडपणे केलेले मद्यप्राशन आणि त्यानंतर एका अनोळखी महिलेचा लैंगिक छळ करण्याचं धाडस करणाऱ्या नेत्याचे हे कारनामे पचवताना केवळ सरकारचं नव्हे तर महाराष्ट्रातील जनताही तेंव्हा हतबल झाली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोण होते रामराम आदिक

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुसद्दी, हुशार व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राच्या राजकारणीतल एक अनुभवी चेहरा म्हणून रामराव आदिकांकडे पाहिलं जायचं.

 

 

वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेंव्हा आदिकांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा मोठ्या विश्वासाने देण्यात आली. मात्र त्यानंतर रामरावांनी जे काही रंग उधळले त्यानंतर मात्र वसंतदादांचा विश्वास मातीत मिसळला गेला.

घडू नये ते घडले

गोष्ट १९८४ सालाची! उपमुख्यमंत्रीपदावर असलेल्या रामराम आदिकांना जर्मनीतील हॅनोव्हर शहरात भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आमंत्रण आले होते. रामरावांचा रसिकपणा, कलेबद्दलचं प्रेम लक्षात घेता त्यांनी साहजिकच हे निमंत्रण स्विकारले.

आपल्या मोजक्या सहकाऱ्यांसह ते विमानाने जर्मनीसाठी निघाले. मात्र कोणत्याही सामान्य प्रवाशाप्रमाणेच त्यांना सहलीत धमाल करण्याचा मोह आवरला नाही. व्यसनांकडे असलेला त्यांचा कल मंत्रीमंडळातही सर्वांना ठाऊक होता, त्यामुळे विमानप्रवासात मद्यप्राशन करणाऱ्या आदिकांना पाहिल्यानंतर कुणाला फारसं आश्चर्य वाटलं नाही.

 

 

एकावर एक पेग रिचवणाऱ्या रामराम आदिकांना भानच उरलं नाही. अशातच बऱ्याचप्रमाणात मद्यप्राशन केल्यानंतर त्यांचा स्वतःवरील ताबा सुटला.

विमानातील एक देखणी हवाई सुंदरी व्हीआयपी गेस्ट असलेल्या आदिकांच्या कक्षात कामानिमित्त दाखल झाली. या तरुण, देखण्या युवतीला पाहिल्यानंतर आदिकांचा तोल ढासळला, डोळे चमकले आणि त्यांनी हवाई सुंदरीला जवळ बोलावले. तिच्याशी कामानिमित्त गप्पा मारण्यास सुरुवात केली आणि त्यादरम्यान इतर कुणाचेही लक्ष नसल्याचे पाहताच तिच्या शरीराला स्पर्श करण्यास सुरुवात केली.

सुरवातीला ती तरुणी घाबरली, मात्र आदिकांचा हेतू लक्षात येताच त्यांच्यापासून दूर होत ती तेथून निघण्यासाठी वळली. नेमका तेंव्हाच आदिकांना मोह आवरता आला नाही.

कुणाच्याही लक्षात यायच्या आधी त्यांनी लगबगीने उठून थेट हवाई सुंदरीचा हात धरला आणि तिला आपल्या जवळ ओढले.

 

अचानक घडलेल्या या प्रसंगाने ती तरुणी प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरडा केल्याने आदिकांचे सहकारी, शिवाय विमानातील इतर कर्मचारी यांनी धाव घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी विमानात लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सत्तेतील नेत्यानेच असा कारभार केल्यावर विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. ‘आदिकांनी राजीनामा द्यावा’, ‘भ्रष्ट नेत्याच्या हाती महाराष्ट्र नको’ या मागण्यांनी जोर धरला. मात्र आदिकांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला.

अजब बाब ही की मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनीही आदिकांची पाठराखण केल्याने विरोधकांसह जनताही खवळली.

मात्र यावेळी महाराष्ट्रातील सगळ्या मिडीयाने हे प्रकरण डोक्यावर घेतलं. आदिकांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी हा आग्रह धरण्यासाठी वृत्तपत्रांचे रकामे भरले जाऊ लागले. संपादकांनी खरमरीत अग्रलेख लिहीले.

त्यावेळी सोशल मिडीयासारखे प्रभावी हत्यार नसूनही तत्कालीन माध्यमांनी आपली भूमिका चोख निभावली. अनेक ज्येष्ठ पत्रकार सरसावले आणि सरकारलं जागं करण्याचा प्रयत्न केला.

वसंतदादांनी याबाबत बचावात्मक भूमिका घेत सरकार वाचवायचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पतीविरोधात जाऊन या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापलं.

अखेर राजीनामा दिलाच

मंत्रीमंडळातील १४ नेत्यांनी सह्यांची मोहिम घेत त्या दिवशी विमानात काहीच घडलं नाही असा बनावही केला. त्यासाठी त्या हवाई सुंदरीवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचंही नंतर उघडकीस आलं. मात्र सरकारच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही.

त्याचवेळी दिल्लीतील इंदिरा गांधींपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. इंग्रजी वृत्तपत्रांचे भरलेले रकाने पाहून इंदिरा गांधींनी बैठक बोलावली आणि तातडीने राजीनामा मागण्याचा आदेश दिला.

 

 

माध्यमांची आक्रमक भुमिका, जोडीला विरोधकांची टिका आणि महाराष्ट्रातील जनतेत पसरलेला असंतोष यांमुळे अखेर वसंतदादांनी माघार घेत आपल्या मंत्रीमंडळात आदिक नकोत असं जाहीर करत त्यांचा राजीनामा मागितला.

तेंव्हा मात्र आदिकांपुढे पर्याय उरला नसून त्यांनी नाराजीने राजीनामा दिला. अर्थात तेंव्हाही त्यांनी प्रसिद्धीसाठी स्टन्ट करत आपण दारू सोडत असल्याचं जाहीर केलं.

अनेक महिन्यांचा गदारोळानंतर हे प्रकरण शांतं झालं मात्र त्याचे पडसाद पुढील अनेक वर्ष कॉंग्रेसला भोगावे लागले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version