Site icon InMarathi

बिग बॉस स्कॅम: जेंव्हा टिव्ही ‘शो’च्या नावाखाली ९ महिला सापळ्यात अडकल्या होत्या

big boss show inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बिग ब्रदर या रिॲलिटी शो च्या अनेक देशात आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि त्या मूळ शो इतक्याच लोकप्रियही आहेत. मात्र जगभरातल्या मनोरंजन विश्वातच्या सिरियल इंडस्ट्रीत लोकप्रिय अशा तुर्कीश सिरियल विश्वामध्ये मात्र केवळ एकदाच हा रिॲलिटी शो आला. एकदाच आलेल्या या शोच्या नावावर सिनेमाला लाजवेल असं नाट्यमय अपहरण झालं आणि त्या नंतर हा सिझन पहिला आणि शेवटचा ठरला.

 

 

जसं चित्रपट जगतात हॉलिवूड, बॉलिवूड, ईराणी चित्रपटांचा बोलबाला आहे तसाच सिरियल विश्वात भारतीय, अमेरिकन, ब्रिटीश सिरीयल्सच्या बरोबरीनं कोरियन आणि तुर्कीशचा बोलबाला आहे. गेल्या दोन तीन वर्षात जगभरात तुर्कीश सिरियल्सचे चाहते वेगानं वाढत आहेत. व्हॉईस ऑफ इंडिया, इंडियाज गॉट टॅलेंट, मास्टर शेफ असे आपल्याकडचे लोकप्रिय रिॲलिटी शो हे वर्ल्ड शोच्या भारतीय फ्रेन्चाइजीस आहेत. जगभरातल्या टेलिव्हिजन जगतात त्या त्या देशातल्या भाषेत हे शो बनत असतात आणि ते लोकप्रियही आहेत. तुर्कीमधे देखिल यातले बहुतेक सगळे शो आवडीने पाहिले जातात.

असं असलं तरिही एक असा लोकप्रिय शो आहे जो जगभरातल्या जवळपास प्रत्येक टेलिव्हिजन क्षेत्रात बनत असला तरिही तुर्कीमधे तो बनत नाही. किंबहुना काही वर्षांपूर्वी एकमेव सिझन बनवून हा शो बंद करण्यात आला.

या शो चं नाव आहे, बिग ब्रदर! आपल्याकडे बिगबॉस नावानं हा लोकप्रिय शो गेल्या दहा बारा वर्षांहून अधिक काळ वर्षातून एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. या शो शी संबंधी एक खळबळजनक घटना वर्षांपूर्वी तुर्कीत घडली होती.

बिगब्रदरचा फॉररमॅट सर्वांनाच परिचित आहे. बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवता विविध क्षेत्रातील दहा – बारा लोकांना एकत्र ठेवलं जातं. घरात जागोजागी लावलेले कॅमेरे प्रत्येक क्षणाचं रेकॉर्डिंग करत असतात आणि मग एडिटींग करून यातल मनोरंजक असं फूटेज प्रसारित केलं जातं.

रोजच्या जगण्यातलं नाट्य कॅमेर्‍यानं टिपून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा हा शो आहे. त्यामुळे तुर्कीत नऊ महिलांबाबत ही जी घटना घडली त्यात शंका घेण्यासारखं काहीच नव्हतं. मात्र जेंव्हा खरा प्रकार या महिलांच्या लक्षात आला तेंव्हा त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. या महिलांना बिगब्रदरच्या घरातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तुर्कीश मिल्ट्री पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता, इतकी परिस्थिती गंभीर होती.

 

 

इस्तांबूलच्या जवळ असणारं रिवा हे सुंदर गाव! इस्तांबुलच्या उच्चभ्रू मंडळींचे प्रशस्त समर व्हिला असणा-या रिवामधील एक समर व्हिला २००९ साली बिगब्रदरचं घर म्हणून निवडण्यात आलं होतं. काही लोकप्रिय तुर्कीश सिरियल्सचं चित्रीकरण रिवामधे करण्यात आलं आहे त्यामुळे सहभागी स्पर्धक महिलांना काही शंका येण्याचं कारणच नव्हतं.

या नऊजणींना बिगब्रदरसारख्या शोमधे सहभागी होण्यासाठी निवड झाल्याचं सांगण्यात आलं आणि त्यांना या व्हिला ठेवण्यात आलं, तत्पूर्वी त्यांच्या एका करारावर सह्याही घेण्यात आल्या. या करारानुसार त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी, मित्र, आप्तेष्टांशी संपर्क ठेवता येणार नव्हता. या गुप्ततेच्या कराराचा भंग केल्यास तसेच पहिल्या दोन महिन्यात शो सोडल्यास दंड म्हणून ५० हजार तुर्कीश लिरा (२० हजार डॉलर्स) इतका भलामोठा दंड भरावा लागणार होता.

सुरुवात एका सामान्य शो सारखी झाली असली तरी वास्तवात या महिलांची नग्न छायाचित्रं, व्हिडिओ प्रसारीत केले जात होते आणि मुख्य म्हणजे याची कल्पना घरातील कोणालाही नव्हती.

 

सहभागी स्पर्धक असणार्‍या दोन महिलांना शंका आल्यावर त्यांनी हा शो सोडण्याचं ठरविलं. मात्र दंडाची पूर्ण रक्कम भरल्याखेरीज व्हिलातून बाहेर जाता येणार नाही हे सांगत असतानाच त्यांना धमकावण्यातही आलं.

दुसरीकडे अन्य काही स्पर्धकांच्या कुटूंबियानांही शंका येऊ लागली होती. कारण त्यांना व्हिलामध्ये बंद असणार्‍या त्यांच्या मुलीशी, बहिणीशी संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात येऊ लागला. या स्पर्धकांपैकी एका महिलेनं कसाबसा घरच्यांशी संपर्क साधला आणि त्यांना परिस्थिती सांगून मदत करण्यास सांगितलं. या स्पर्धकांत काही टीनएजर मुलींचाही समावेश होता. डोगन वृत्तसंस्था आणि हॅबरटर्क वृत्तपत्रांनी या प्रकरणाला वाचा फोडली.

घरात अडकेलेल्या महिलांपैकी काहींंच्या कुटुंबियांनी पोलिस तसेच वृत्तपत्र माध्यमं यांची मदत घेत हा प्रकार उडकीस आणला.

या घरातून सुटका झाल्यानंतर एका स्पर्धकानं सांगितलं की त्या घरात त्यांच्यासोबत काही गलिच्छ प्रकार घडला नसला तरिही, बिकीनीत अर्धनग्न अवस्थेत पूलवर फिरणं, भांडण करणं वगैरे गोष्टी बळजबरीनं करवून घेतल्या गेल्या.

 

 

पोलिसांनी सुटका केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आणि केवळ तुर्की मनोरंजन क्षेत्रात नाही तर सामान्य प्रेक्षकांतही खळबळ उडाली. यथावकाश या प्रकरणाचा तपास चालू झाला, खटला उभा राहिला. न्यायालयात असा दावा करण्यात आला की सहभागी स्पर्धकांना हा शो इंटरनेटवरून थेट प्रसारीत केला जाणार आहे याची करारावर सह्या करताना पूर्ण कल्पना होती त्यामुळे फसवणूकीचा प्रश्नच येत नाही. तेरा महिन्यांचा करार असल्यानं त्यांनी त्यापूर्वी व्हिला सोडण्याचा प्रश्न येत नव्हता. यात बेकायदेशीर असं काहीच नव्हतं . शिवाय सदर कार्यक्रमाची जाहिरात नामांकीत वाहिन्यांवरून केली गेली होती. पूलवर आणि घरात सर्वत्र कॅमेरे असले तरिही बाथरूममध्ये कॅमेरे नव्हते असाही युक्तीवाद करण्यात आला.

पोलिसांनी छापा टाकला तेंव्हा खिडक्यांच्या काचा फ़ुटलेल्या होत्या आणि बरचंस सामानसुमान, कॅमेरे गायब झाले होते. या घरातलं कॅमेरे नियंत्रीत करणारं वायरचं जंजाळ मात्र भिंतीत तसंच लपविलेलं होतं.

 

 

सध्या हिंदी तसेच मराठी बिग बॉसची धुम सुरु आहे. प्रेक्षकही शो पाहण्याच दंग आहेत, मात्र या शोचा प्रणेता असलेल्या बिग ब्रदरच्या या आठवणी पुसणं आजही अनेकांना शक्य नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version