उंची, रंग यावरून केली जाणारी विनोदाची ‘हवा’ थांबणार तरी कधी?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : सोहम गोडबोले
===
काय रे काळ्या कुठे होतास? असा हमखास डायलॉग आपल्या ओळखीतल्या ज्या व्यक्ती काळ्या असतात त्यांना मारला जातो. एखादी व्यक्ती काळी, गोरी जाड बारीक शरीराने अपंग असेल तर त्या व्यक्तीची हमखास टिंगल केली जाते. घरातून सुरवात झालेल्या चेष्टेचे रूपांतर नंतर सार्वजनिक चेष्टेत होते आणि ती व्यक्ती फक्त आणि फक्त विनोदाचा भाग बनून जाते.
निखळ विनोद करणं आता खूप कमीजणांकडे राहिले आहे. आज मित्रांच्या ग्रुपमध्ये, कुटुंबात अशी एक व्यक्ती हमखास आढळून येते जिच्या अंगी विनोद बुद्धी जन्मजातच असते. आपल्या त्याच विनोद बुद्धीने ती व्यक्ती सर्वांचे मनोरंजन करत असते.
आज कोरोनामुळे एकूणच सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे, सध्या मनोरंजनाचे एकमेकांव साधन म्हणजे टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म, घरातील आबालवृद्ध मंडळी त्याच त्याच रटाळ सिरीयल बघून आपला वेळ घालवतात, झी ने प्रेक्षकांच्या प्रचंड टीकेनंतर ४ मालिका बंद केल्या खऱ्या मात्र त्याजागी आलेल्या मालिका देखील पुन्हा तेच दळण दळणाऱ्या आहेत.
रोजचे डेली सोप बघण्यापेक्षा हसण्याचे कार्यक्रम बघावे तर तिकडेही विनोद निर्मितीची केविलवाणी अवस्था दिसून येत आहे. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम गेली ६,७ वर्ष चालू आहे. सुरवातीला या कार्यक्रमाची हवा झाली ती लय भारी सिनेमामुळे, घरचाच सिनेमा असल्याने झी ने आपल्या चॅनेलवर सिनेमाचे प्रमोशन केले, सिनेमा सुपरहिट ठरला त्यामागे अनेक कारणं होती मात्र तिथून या शोची हवा निर्माण होऊ लागली.
–
- ‘झी मराठी’च्या बालिश मालिकांमधील या फालतू चुका म्हणजे बावळटपणाचा कळसच!
- सध्या ‘ट्रोल’ होणाऱ्या मराठी मालिकांची भुरळ इतर भाषांनाही पडली होती
–
एक एक सिनेमे येऊ लागले आणि शो हिट ठरू लागला, सुरवातीला भाऊ कदम कुशल बद्रिके आणि निलेश साबळे हे तीनच कलाकार होते हळूहळू एक एक विनोदवीर त्यांच्यात सामील झाला. भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे भाऊ कदम कुशल बद्रिके या पाची जणांचा कॅप्टन निलेश साबळे, पाची जणांच्यातले गुण निलेश साबळेने अचूक हेरले आणि त्यानुसार व्यक्तिरेखा त्यानं देण्यात आल्या.
आज सोशल मीडियावर स्त्रियांच्यावर अनेक विनोद होत असतात त्यावर पुरुष मंडळी खोखो हसत असतात, मात्र स्त्रियादेखील विनोद करू करून पुरुषानं पुरून उरू शकतात हे श्रेया बुगडेने करून दाखवले. सागर करंडे, भाऊ, कुशलने केलेली स्त्री पात्र भाव खाऊन जायचे मात्र नंतर प्रेक्षक सुद्धा त्यांना बघून कंटाळू लागले.
या शोचा एक प्रयोग चांगला होता की केवळ सिनेमाचे प्रमोशन न करता नाटक, सिरीयलसारख्या कलाकृतींचे प्रमोशन केले त्यांचा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे ,कारण आज वाढत्या मनोरंजनाच्या माध्यमांमुळे नाटक हा प्रकार मागे पडत चालला आहे त्यातच कोरोनामुळे तर नाट्यसृष्टीचे कंबरडे मोडले आहे.
या शोची हवा इतकी झाली की बॉलीवूडच्या खानमंडळींना आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये यावे लागले. भारतातल्या सर्वाधिक टीआरपी असलेल्या शोमध्ये या शोची गणना होऊ लागली. मात्र कौतुकाचा वर्षाव जितका होतो तितकंच त्या शो ला उतरती कळा लागू लागली. तेच तेच विनोद, भाऊ कदमला तंबाखू, दारूवरून विनोद करायला लावणे, त्यांच्या कंपूत सामील झालेल्या विनीत बोन्डे, अंकुर वाढवे या कलाकारांच्या शारीरिक व्यंगावरून खिल्ली उडवणे, डोंबिवली शहरावरून तर इतकी विनोद झाले की त्या विनोदावरुन कुशल भाऊने ठाण्यात घर घेतले.
विनोदनिर्मितीची प्रक्रिया नंतर त्यांनी थांबवली की काय असेच वाटू लागले, आणि एकूण सध्याच्या शोची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यात कमी म्हणून आणखीन काही कलाकरांना त्या शोमध्ये घेऊन आपलंच हस करत आहेत. जज म्हणून स्वप्नील जोशीला बसणवण्यात आले आहे. ज्याचं काम जजपेक्षा मध्ये मध्ये आपली मत सांगणं आणि विनाकारण हसणं, हेच दिसून येत आहे.
चला हवा येऊ द्या शोला पर्याय म्हणून प्रेक्षक महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतात. मात्र तिथेही अवस्था बिकटच आहे. कॉमेडी एक्सप्रेस, फूबाईफूच्या मैदानात तयार झालेले कलाकार या शोमध्ये आहेत. प्रसाद ओक पार्टी देत नाही या एका वाक्यवरून त्यांनी अनेक एपिसोड खपवले आहेत. इतर नवखे कलाकार आपापल्या परीने उत्तम काम करणायचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यातून विनोद निर्मिती होताना दिसून येत नाहीये.
–
- “टुकार मालिका प्रेक्षकांमुळेच चालतात…” प्रशांत दामलेंचं सणसणीत प्रत्युत्तर
- तुम्हीच ‘अभिनय’ही करा; ‘मालिका’ तर कुणी पाहतच नाहीये! एक चाहता म्हणतोय, की…
–
मराठीत विनोदी सिनेमाचा इतिहास खूप मोठा आहे, अगदी दादा कोंडके पासून ते सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांसारख्या दिग्गज लोकांनी आपल्या सिनेमातून कायमच प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. आज प्रेक्षक बनवा बनवी सिनेमाची तर अनेक पारायण करतात तरी सुद्धा कंटाळत नाही.
मूळच्या कपिल शर्माच्या शो वर बेतलेला चला हवा येऊ द्या हा शो एकेकाळी प्रेक्षकांच्या पसंतीचा शो होता मात्र त्याच त्याच विनोद निर्मितीमुळे प्रेक्षकांच्या नापसंतीस उरत आहे. शारीरिक व्यंगांवरून, रंगावरून विनोद निर्मित करण्याचा प्रकार त्यांनी तातडीने बंद करावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.