' तंदूर केस – ज्या हत्याकांडानंतर पुढील अनेक वर्ष दिल्लीकर हॉटेलमध्ये जायला घाबरायचे – InMarathi

तंदूर केस – ज्या हत्याकांडानंतर पुढील अनेक वर्ष दिल्लीकर हॉटेलमध्ये जायला घाबरायचे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नव्वदच्या दशकात दिल्लीत एक अशी खळबळजनक घटना घडली की त्यानंतर सुमारे वर्षभर लोकांनी हॉटेलमध्ये गेल्यावर तंदूर मधील चमचमीत पदार्थ खाणं बंद केलं होतं, इतकंच नव्हे तर हॉटेलमध्ये जायचं या विचारांनीच दिल्लीकरांना कापरं भरायचं, कारण केवळ दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी एक घटना दिल्लीच्या हॉटेलमध्ये घडली होती. एक निर्घूण हत्या आणि ती लपविण्यासाठी युवा कॉंग्रेसच्या सुशील शर्मा या निर्ढावलेल्या कार्यकर्त्याने संपूर्ण देशाच्या तंदूर व्यवसायावर झालेला परिणाम! एक विचित्र, भयंकर, आजही अंगावर काटा आणणारं तंदूर हत्याकांड!

 

murder inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

खून करणं क्षणिक मानसिक अवस्थेत घडून जातं मात्र तो खून पचविणं फार कठीण असतं. असंचं एक न पचलेलं खून प्रकरण म्हणजे दिल्लीत घडलेलं, देश हादरविणारं तंदूर हत्याकांड! सत्तेची गुर्मी माणसाला ‘आपण वाट्टेल ते करू शकतो’ असा माज देते याचं उत्तम उदाहरण असणारं हे हत्याकांड!

सुशील शर्मा हा युवा कॉन्ग्रेसचा नेता, टिपिकल दिल्लीचा मग्रूर, पैसेवाला आणि राजकीय सत्तेची धुंदी चढलेला. त्यानं आपल्या पत्नीचा केलेला खून आणि बिबत्सपणाची मर्यादा ओलांडून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा केलेला प्रयत्न म्हणून गुन्हेगारी जगतातही या हत्याकांडाचा उल्लेख केला जातो.

 

tandoor case inmaaraathi

 

खरंतर आपल्याकडे राजकीय पक्षांचा पाठींबा असलेल्या सामान्य कार्यकर्त्यालाही कोणी काही जाब विचारण्याची सोय नाही. अगदी गल्लीतल्या कार्यकर्त्याकडेही माज आणि पॉवर असते की या मंडळींची अरेरावी, गुन्हे सहज पचून जातात. सामान्य नागरिक तर सोडाच, पण शासकीय आणि पोलिस यंत्रणाही यांच्या दावणीला बांधलेली असते. अशा परिस्थितीत एका पोलिसाच्या चातुर्यामुळे हे तंदूर हत्याकांड उघडकीला आहे.

काय घडलं त्या काळरात्री?

त्या रात्री नेहमीप्रमाणेच कॉन्स्टेबल अब्दुल नजीब कुल्लू हे आपला साथीदार होमगार्ड चंदर पालसोबत दिल्लीतील अशोक नगर परिसरात गस्त घालत होते. त्या दिवशी त्यांचा वायरलेस सेट पोलिस ठाण्यातच राहिला होता. नेहमीप्रमाणेच गस्त घालत असताना अचानक त्याचं लक्ष एका विचित्र घटनेकडे गेलं.

यात्री निवासच्या बगिया रेस्टॉरंटकडून आगीचे लोळ आणि धुराचे लोट अशोक यांनी पाहिले. सुरवातीला हॉटेलमध्ये आग लागली असावी हा अंदाज करत दोघे रेस्टॉरंकडे मदतीसाठी धावले. मात्र घटनास्थळी गेल्यावर ना अपेक्षित गर्दी होती ना आरडाओरडा! उलट दाराजवळ हॉटेलमालक सुशील शर्मा शांतपणे उभा होता. आपल्या हॉटेलला आग लागली असताना मालक असा शांतपणे त्याकडे पहात उभा आहे ही बाब पोलिसी नजरेला खटकली आणि इथेच संशयाला सुरुवात झाली.

 

fire inmarathi

 

नजीब यांनी सुशील यांच्याकडे चौकशी केली असता पार्टीचे बॅनर जाळत असल्याचं थातुरमातुर उत्तरं देण्यात आली. नजीब यांनी आत जाऊन खातरजमा करण्याची मागणी केली असता सुशील कुमारनी त्यांना विरोध केला. आता मात्र नजीब यांना इथे काहीतरी काळबेरं असण्याची शंका येऊ लागली.

नजीब यांनी तेथून निघून जाण्याचं नाटक केलं, मात्र चतुराईने हॉटेलची मागची बाजू गाठली आणि कंपाऊंड वॉलवरून उडी मारून हॉटेलमध्ये प्रवेश केला. 

तेंव्हा हॉटेल कर्मचारी केशवकुमार तंदूरजवळ उभा राहून आग पेटवत असल्याचं पाहून नजिब यांचा संशय बळावला. ”आग विझविण्याऐवजी तु आणखीन का भडकावतोस? असं विचारताच यावर त्यानंही सुशील कुमारसारखंच पार्टीचे बॅनर जाळत असल्याची सबब सांगितली. मात्र बर्नर जाळायला लोण्याच्याच्या बरण्या, बटरच्या लाद्यांची गरज नसते हे पोलिसी मेंदूच्या लक्षात आलं.

 

hote fire inmarathi

 

नजीबनी जवळ जाऊन पाहिलं असता तंदूरच्या आत एखादा प्राणी जळत असल्यासारखं वाटलं. अखेर दटावल्यानंतर केशवनं सांगितलं की बकरा जाळत आहोत मात्र नजिब यांच्या तीक्ष्ण नजरेनं तंदूरमधील जळून खाक झालेले मानवी हात पाय ओळखले. 

ती आग विझवण्याचा नजीब यांनी आटापिटा केला. वेळप्रसंगी भाजणाऱ्या हातांनीही त्यांनी अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी खटपट केली आणि त्यांचे हे प्रयत्न पाहून धाबरलेल्या केशवने हॉटेलबाहेर पळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

त्यानंतर अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख आणि सुशीलचा जवाब यांनुसार सूशील यांच्या पत्नीची हत्या केल्याची बाब उघड झाली आणि सुरु झालं तपासणयंत्रणेचं चक्र!

एकाच कुटुंबातल्या ११ सदस्यांच्या रहस्यमयी मृत्यूचं कोडं CBI ने सोडवलं खरं, पण…

महाराष्ट्राला हादरवून सोडणारा हा खटला आजही अनेकांची झोप उडवतो!

 

naina sahani inmarathi

 

एका कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचार्‍यानं निडरपणे केलेली ही कारवाई होती. देशाला हादरविणारं तंदूरकांड उघडकीला आल्यानंतरही कायद्यानं सुशील कुमारला शिक्षा व्हायला बराच काळ गेला.

हत्या का केली?

या खुनाचं कारण सांगताना सुशील कुमारनं पत्नीचे, नैना सहानीचे परपुरूषाशी विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याचं सांगितलं. या संशयातून त्यांनी २ जुलै १९९५ रोजी त्यांच्या रहात्या घरी पत्नीवर गोळ्या झाडल्या मात्र सुशील कुमारचा क्रूरपणा इथेच संपला नाही तर नंतर त्यानं तिच्या शरीराचे तुकडे केले.

नैनाचा मृत्यु झाला मात्र या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यावर सुशील आणि केशवने खलबतं केली. भविष्यात आपला गुन्हा उघड होवू नये यासाठी मृतदेह जाळून टाकण्यावर त्यांचं एकमत झालं. त्यातही त्यांची विकृत मानसिकता दिसून आली.

 

naina sahani case inmarathi

 

आपल्या मालकीच्या हॉटेलचा वापर करत, जळल्या तंदूरमध्ये हा मृतदेह जाळण्यात आला. या घटनेचा सर्वप्रथम खुलासा करणारे पोलिस नजीब यांनी मृतदेहाची जी विटंबना या दोघांकडून करण्यात आली होती त्याचं भयावह वास्तव सांगितलं.

दिल्लीकरांच्या नजरेसमोरून आजही हे वास्तव हालत नाही.

नजीब यांना संशय आल्यानंतर सुशील शर्मा बाहेरच्या बाहेर पळून गेला होता मात्र एका आठवड्यानं त्याला अटक करण्यात आली. ट्रायल कोर्ट आणि नंतर हायकोर्टानं सुशील शर्माला फाशी द्यावी असा निर्णय दिला मात्र सुप्रिम कोर्टानं हे वाक्य बदलून सांगितलं की, शर्माचा गुन्हा हा समाजाविरुद्ध गुन्हा नसून पत्नीशी असणार्‍या तणावपूर्ण नात्यातून घडलेला आहे.

 

tandoor case 11 inmarathi

 

हा गुन्हा आणखी एका गोष्टीसाठी ओळखला जातो, तो म्हणजे हा भारतातील महत्वाच्या प्रकरणांपैकी एक असून आरोप सिद्ध करण्यासाठी डीएनए पुराव्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास करण्यात आला होता. 

घटनेला अनेक वर्ष उलटल्यानंतरही आजही हॉटेलमध्ये जाणाऱ्या दिल्लीकरांच्या मनात कधी ना कधी भिती दाटते. टेबलावरील गरमागरम, चविष्ट तंदुरमधील पदार्थ खाताना मनात दाटणारी भिती, अंगावर येणारा काटा आजही कायम आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?