' बॉलिवूडच्या ‘धुंद’ पार्ट्यांशी ‘बटाटा’ ग्रुपचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय? – InMarathi

बॉलिवूडच्या ‘धुंद’ पार्ट्यांशी ‘बटाटा’ ग्रुपचं नेमकं कनेक्शन आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेले २ दिवस सोशल मीडियावर, न्यूज चॅनल्सवर, प्रत्येकाच्या न्यूज फिडवर एकाच गोष्टीची चर्चा होताना दिसतिये ती म्हणजे शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या अटकेची.

२ ऑक्टोबरला मुंबईच्या आलीशान क्रूसवर होणाऱ्या रेव्ह पार्टीत आर्यन खान आणि त्यासोबत ८ जणांना NCB ने ताब्यात घेतलं, चौकशी केली आणि त्यांना अटक केली.

 

aryan khan inmarathi

 

सुरुवातीला छोटंसं वाटणारं हे प्रकरण आता एक मोठं वळण घेणार आहे. बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन तर पुन्हा एकदा सिद्ध झालं आहेच तरी बॉलिवूडमध्ये हे ड्रग पुरवण्याचं काम नेमकं कोण करतं? या मुलांच्या हाती हे ड्रग्स कोण देतं? बॉलिवूडच्या या बड्या पेज ३ पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ कोण पुरवत? हे असंख्य प्रश्न तुमच्या मनात पडले असतील.

NCB च्या प्राथमिक चौकशीतून असं समोर आलं आहे की मुंबईच्या क्रूसवर आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीत मुंबईच्या कुख्यात ‘बटाटा गॅंग’ने ड्रग्स पुरवले होते. अटक केलेल्या लोकांची चौकशी केल्यावर या प्रकरणात संशयाची सुई ही बटाटा गॅंगकडेच जात आहे!

आर्यन खानने जरी त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की ‘त्याला या पार्टीत प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं’ तरी या सगळ्यामागे खूप मोठं ड्रग रॅकेट काम करतंय असा NCB चा दावा आहे.

बॉलिवूडच्या अशा बड्या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थ नेऊन देण्याचं काम बटाटा गॅंगच करते आणि गेल्या काही महिन्यांपासून ही गॅंग पुन्हा चांगलीच कार्यरत असल्याच तपासातून समोर आलं आहे.

बटाटा गॅंग आहे तरी कोणाची?

मुंबईच्या मोठ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सचं सेवन म्हणजे बटाटा गॅंगचं नेटवर्क नक्की असा समजच आहे. या गॅंगची ३ प्रमुख नावं म्हणजे फारूक बटाटा, शाहदाब बटाटा आणि सैफ बटाटा.

मुंबईत गल्लोगल्ली बटाटा विकून फारूक बटाटानी ड्रग्सच्या दुनियेत एंट्री घेतली आणि तिथून त्याने त्यांचं साम्राज्य उभारायला सुरुवात केली. आज मुंबई व्यतिरिक्त देशभरात कुठेही होणाऱ्या रेव्ह पार्टीत बटाटा गॅंगचा हात असतोच.

 

farooq batata inmarathi
aajtak.in

 

९० च्या दशकात फारूक बटाटाने मुंबईत बटाटा विकून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली. फारूक अशाच ठिकाणी बटाटे विकायचा जिथे अंडरवर्ल्डची लोकं त्यांच्या कुटुंबासोबत राहायची!

फारूक कडून सुरुवातीला या लोकांनी ड्रग्सच्या काही डिल्स केल्या, पण नंतर फारूकला या गोष्टीची जाणीव झाली की त्याला या छोट्या मोठ्या डिल्समध्ये काहीच मिळणार नाही, त्याला त्याचं साम्राज्य उभारायलाच लागणार आहे.

फारूक बटाटा दाऊदला कसा भेटला?

माफिया विश्वात एंट्री घेतल्यावर त्यादरम्यान फारूक बटाटाची ओळख दाऊदची बहीण हसिना पारकरशी झाली. हळू हळू त्याने डी कंपनी आणि अबू सालेमच्या मदतीने स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली.

 

haseena parkar and dawood inmarathi

 

मुंबईचा बराचसा विभाग आज ड्रग्स सिंडीकेटने विभागला आहे. साऊथ मुंबईकडच्या भागात रिंकु पठाणचं वर्चस्व आहे, तर बांद्रा ते मीरा रोडचा एरिया हा फारूक बटाटा गॅंगच्या अधिपत्याखाली आहे.

मुंबई पोलिस आणि NCB च्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये स्वतःचं कनेक्शन तयार केल्यानंतर फारूक बटाटाने सागरी मार्गाच्या सहाय्याने गोव्यातसुद्धा ड्रग्सच्या धंद्याचा जम बसवायला सुरुवात केली.

पोलिसांच्या मते ड्रग्सचा धंदा हा विश्वासाचा धंदा आहे, आणि फारूक बटाटाने बॉलिवूडच्या लोकांचा हाच विश्वास संपादन करून स्वतःचं जाळं पसरवायला सुरुवात केली.

फक्त ड्रग्सच नाही तर बऱ्याच गोष्टींच्या नकली उत्पादनातसुद्धा फारूक बटाटाचा हात आहे. गुटखा आणि साबण या दोन्ही धंद्यातसुद्धा त्याचं मोठं नाव आहे.

फारूक बटाटाची दोन्ही मुलं शाहदाब आणि सैफ हे कायम मुंबई पोलिस आणि NCB च्या रडारवर असतात. शाहबादला तर पोलिसांनी बऱ्याचदा अटक केली आहे. फारूकचा हाच मुलगा ड्रग्सचा बिझनेस सातासमुद्रापार नेण्यासाठी जवाबदार आहे.

 

shadab batata inmarathi
ndtv.in

 

गेल्या काही वर्षांपासून आपल्या तपास यंत्रणा या बटाटाचे नेटवर्क तोडण्यासाठी जीवाचं रान करतायत, फक्त भारतातच नाही तर इतरही देशात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये बटाटाचा सहभाग असतो.

पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार बटाटाला मुंबईत एवढं मोठं साम्राज्य उभं करून देण्यात बॉलिवूडने चांगलाच हातभार लावला आहे. आणि यामुळेच ड्रग सिंडीकेट उभं राहण्यात खूप मदत झाली असून मुंबईत होणाऱ्या या बड्या रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा पुरवठा बटाटा गॅंगकडूनच होतो असा तपास यंत्रणांना संशय आहे.

 

bollywood parties inmarathi

 

अर्थात आर्यन खान ज्या पार्टीत पकडला गेला त्याच्याविरोधात कोर्टात केस सुरू आहे, शिवाय अजूनही आर्यन खानला भारतीय न्यायव्यवस्थेकडून काहीच सूट मिळाली नाहीये.

पण मुंबईच्या बटाटा गॅंगचं वर्चस्व बघता या पार्टीतही याच गॅंगने ड्रग्स पुरवले असतील ही शक्यता नाकारता येणार नाही, आणि यापुढे होणाऱ्या चौकशीतून आर्यन खान आणि इतर लोकांचे या बटाटा गॅंगशी असलेले संबंध समोर आले तरी आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?