Site icon InMarathi

NCB चे काम काय असते? रेड टाकण्याची नेमकी पद्धत काय आहे? जाणून घ्या

drugs inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हल्ली फिल्मसिटी किंवा स्टुडिओपेक्षाही अधिक काळ एनसीबीच्या कार्यालयात दिसतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सिनेमा, जाहिराती यांमधून प्रेक्षकांना आदर्शतेचे धडे देणारे हे कलाकार दारू, ड्रग्स यांच्या विळख्यात अडकलेले पाहिल्यानंतर यांना आपण आदर्श का म्हणावं? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

 

 

मागील वर्षी अभिनेता सुशांत सिंग राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडचा एक भयानक, विद्रुप चेहरा समोर आला. केवळ हिरोच नव्हे तर दिपीका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही एनसीबी वारी चुकली नाही.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर तर अनेक सेलिब्रिटींचे धाबे दणाणले आहेत. ज्याप्रमाणे राजकारणात ‘आता इडीच्या कचाट्यात कोण सापडणार? असा प्रश्न रेंगाळत असताना “दुसरीकडे आता कोणता सेलिब्रिटी एनसीबीच्या जाळ्यात अडकणार?” असा सवाल विचारला जात आहे.

मात्र बॉलिवूडमधील डॉन, दबंग अशा भल्याभल्यांना धडकी भरवणारं एनसीबीचं खातं नेमकं कोण आहे? एनसीबीचे अधिकारी नेमकं करतात काय? या अधिका-यांना टिप देतं कोण? आणि सेलिब्रिटी ते ड्रग्स माफिया अशा भलाभल्यांच्या मुसक्या आळणा-या रेड्स नेमक्या पडतात कशा? याबद्दल उत्सुकता असेल तर हा लेख तुम्ही वाचायलाच हवा.

NCB कोण आहे?

जगात व्यसनांच्या आहारी गेलेल्यांची संख्या काही कमी नाही. मध्यम वर्गीय घरातील तरुण ते थेट बडे कलाकार, खेळाडू हे सगळेच धुराच्या लोटांत गुरफटलेले दिसतात.

दारु, सिगरेट यांपासून ते अफू, चरस, गांजा, हिरॉइन अशा वेगवेगळ्या व्यसनांचे मार्ग शोधणारे नशाखोर लोकांची कमतरता नाही.

 

 

मात्र या सगळ्यांवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी भारत सरकारने एनसीबी शाखेवर सोपवली आहे. त्यासाठी कायद्यात स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या आहेत.

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो’ अर्थात NCB या शाखेव्दारे देशातील व्यसनी लोकांवर वचक ठेवला जातो.

१७ मार्च १९८६ रोजी दिल्लीत या संस्थेची स्थापना केली गेली. दिल्लीत या शाखेचं मुख्य कार्यालय कार्यरत आहे. नार्कोटिक्स ड्रग्स अण्ड सायकोट्रोपिकस अॅक्ट (१९८५) या कायद्याची तरतुदही करण्यात आली असून याच कायद्यांतर्गत या विभागाकडून कारवाई केली जाते.

या कायद्यांतर्गत कोणत्याही प्रकारच्या व्यसनांची शेती करमं, उत्पादन निर्मिती तसेत उत्पादन विक्री आणि सेवन अशा सर्वच क्रियांवर बंदी घालण्यात आली असून अशी कोणतीही कृती करताना रंगेहाथ सापडलेल्या व्यक्तींवर एनसीबी कारवाई करू शकते.

 

 

आयएस, आयपीएस, पॅरा मिलिट्री, नार्कोटिक्स स्पेशॅलिस्ट यांसह अनेक विभागातील तज्ञ या शाखेत वरिष्ठ अधिकारी या पदांवर कार्यरत असतात.

एनसीबी हे केवळ ड्रग्स सेवन नव्हे तर देशातील आमली पदार्थांची विक्री, स्मगलिंग रॅकेट्स, बड्या माफियांव्दारे देशासह विदेशातही केली जाणारी तस्करी अशा अनेक आघाड्यांवर काम करते, त्यामुळे ही भारताची शाखा केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून देश-विदेशातही यांचे खबरी काम करत असतात.

रेड कशी टाकली जाते?

अभिनेता अजय देवगण याचा रेड हा चित्रपट आठवतोय का? एका सत्य घटनेवर आधारीत या चित्रपटात आयकर विभागाची रेड नेमकी कशी पडते? त्यासाठी कोणती पुर्वतयारी केली जाते? प्रत्यक्ष रेड टाकताना कोणते नियम पाळले जातात? नेतेमंडळी असो वा कलाकार…रेडदरम्यान इतर कुणालाही बोलण्याची परवानगी नसते हे वास्तव दाखवलं आहे.

 

 

याप्रमाणेच एनसीबीकडून छापा टाकला जातो. किंबहूना इथे तर थेट आमली पदार्थ, ड्रग्स यांचा थेट संबंध असल्याने आरोपी नेमक्या कोणती नशा करताना अथवा कोणत्या अवस्थेत सापडेल? नेमके किती आरोपी असतील? नशा केल्याने आरोपींची मानसिकता कशी असेल? त्यांच्याकडे काही शस्त्रास्त असतील का? अशा अनेक मुद्द्यांचा विचार करत एनसीबीला छापा टाकावा लागत असल्याने ही रेड कोणत्याही चित्रपटाच्या कथानकापेक्षा वेगळी नाही.

एनसीबीची रेड ही केवळ एका दिवसापुरती असली तरी त्यामागे अनेक महिन्यांची मेहनत असते, एनसीबीच्या खब-यांचं जाळं देशभर पसरलं असल्याने त्यांच्याकडून मिळणा-या टिप्स हा कोणत्याही रेडचा पाया असतो.  मात्र या टिप्सी खातरजमा करण्याची जबाबदारी एनसीबीच्या वरिष्ठ अधिका-यांवर असते.

एखाद्या टीपची शहानिशा केल्यानंतर त्या रेडचा संपुर्ण आलेख तयार केला जातो. यासाठी पोलिस, सीबीआय किंवा इंटेलिजन्स ब्युरो यांसारख्या सरकारच्या इतर महत्वाच्या शाखांचीही मदत घेतली जाते.

यानंतर रेडची पुर्वतयारी करताना त्या जागेची रेकी अर्थात पाहणी केली जाते. यासाठी इंटिलीजन्स ब्युरोतर्फे जागेची सर्व माहिती, संभाव्य धोके, परिसराचा पुर्म तपशील एनसीबीच्या अधिका-यांना दिला जातो. रेडची पुर्वतयारी करताना हा सर्वात महत्वाचा भाग असतो.

 

 

त्यानंतर प्रत्यक्ष रेडसाठी निघताना गाड्या, अधिका-यांकडे असणारी साधनसामग्री, रेडसाठी आवश्यक असणारी यंत्रणा या सर्वांची जमवाजमव केली जाते. छापा टाकणारे अधिकारी प्रशिक्षित, अनुभवी असल्याने एकमेकांच्या कॉर्डिनेशनने ही प्रक्रिया पुर्ण केली जाते.

यामध्ये छापा टाकण्यापुर्वी काही तास टिम घटनास्थळी छुप्या मार्गाने पोहोचलेली असते. यासाठी अनेकदा टिमला अहोरात्र दबा धरून बसावं लागतं, यावेळी तेथिल खब-यांच्या मार्फत स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण केला जातो, काहीवेळी गरजेनुसार किमान २ व्यक्तींना प्रत्यक्षदर्शी म्हणूनही तयार केलं जातं. भविष्यात एखाद्या घटनेबाबत एनसीबीला कोर्टात जबाब द्यावा लागला तर अशावेळी या प्रत्यक्षदर्शीचं मत सर्वात महत्वाची भुमिका बजावतं.

एनसीबी छापा टाकण्यापुर्वी घटनास्थळाचे आत तसेच बाहेर पडण्याचे सगळे रस्ते बंद करते, त्यामुळे आतमधील आरोपींना बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतात. यावेळी घटनास्थळी कुछेही वावरण्याची किंवा दारंं बंद असतील तर ती तोडण्याचीही परवानगीही एनसीबीकडे असते.

 

 

मात्र यावेळी कोणत्याही निरपराध किंवा स्थानिक महिला, मुले यांना इजा होणार नाही याची खरबदारी एनसीबीला घ्यावी लागते.

त्यानंतर छापा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सर्व सामानाची तपासणी करत त्यातील आमली पदार्थ एनसीबी ताब्यात घेतं तसेच आरोपींनाही बेड्या ठोकल्या जातात.

ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर पुढे आरोपींनी गुन्हा दाखल करत त्यांना कोर्टासमोर हजर करणे, माध्यमांना याबाबतची माहिती देणे अशीही कारवाई एनसीबी तर्फे केली जाते.

 

 

नुकतंच एनसीबीकडून क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला. एनसीबीचेे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही रेड टाकण्यात आली, यामध्ये आर्यन खानसह इतर बड्या उद्योजकांच्या मुलामुलींसह अनेकांनना रंगेहात पकडण्यात आले. सध्या माध्यमांत केवळ हीच चर्चा रंगली असून या घटनेचे पुढे काय होणार याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version