' कर्जबाजारी होऊन मायानगरी मुंबईत आला आणि ६ महिन्यात त्याचं आयुष्य बदलून गेलं! – InMarathi

कर्जबाजारी होऊन मायानगरी मुंबईत आला आणि ६ महिन्यात त्याचं आयुष्य बदलून गेलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही अनेकांची आवडती मालिका आहे. सास-बहू, षडयंत्र, मेलेली माणसे जिवंत होऊन परत येणे यासारखा ड्रामा नसलेली, मध्यमवर्गीय माणसाचे रोजचे आयुष्य आणि त्यांचे सर्वसाधारण प्रश्न मांडणारी तसेच बिल्डिंगमध्ये एकोप्याने राहणारी, एकमेकांना मदत करणारी माणसे दाखवणारी ही मालिका दर्शकांना आवडली नसती तरच नवल!

विविधरंगी, वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन यात घडते. मराठी, गुजराती, सिंधी, पंजाबी, दक्षिण भारतीय अशी कुटुंबे गुण्यागोविंदाने एकाच ‘गोकुळधाम’ नावाच्या सोसायटीमध्ये राहतात आणि रोजच्या उभ्या राहणाऱ्या प्रश्नांना एकमेकांच्या मदतीने तोंड देतात. असे हलकेफुलके विषय आणि एक से एक पात्रे असल्याने ही मालिका म्हणजे दर्शकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे.

 

tarak mehta ka ulta chashma inmarathi

 

एक पिढी ही मालिका बघत मोठी झाली. मालिकेतले बालकलाकार देखील बघता बघता मोठे झाले, परंतु आजही या मालिकेचा प्रेक्षकवर्ग कमी झाला नाही.

दयाबेन, जेठालाल, मेहता साहेब, अंजली भाभी, टप्पू, बापूजी, सेक्रेटरी भिडे, माधवी भाभी, सोनू, बबिता जी, अय्यर, एव्हरग्रीन बॅचलर पत्रकार पोपटलाल, डॉक्टर हाथी, सोढी अशी सगळीच पात्रे लोकांच्या अत्यंत आवडीची आहेत.

बापूजींचे पात्र रंगवणारे अमित भट्ट हे खऱ्या आयुष्यात जेठालाल म्हणजेच दिलीप जोशींपेक्षा वयाने लहान आहेत. तसेच दयाभाभी आणि सुंदरलाल हे खऱ्या आयुष्यात देखील बहीणभाऊ आहेत.

तुम्हाला माहित आहे का अय्यरची भूमिका करणारे तनुज महाशब्दे हे खरं तर मराठी आहेत. परंतु मालिकेत मात्र एका दाक्षिणात्य व्यक्तीची भूमिका त्यांनी अगदी हुबेहूब केली आहे. त्यांनी सुरुवातीला या मालिकेच्या काही भागांचे लेखन केले होते.

 

iyer tarak mehta ka ulta chashma inmarathi

या मालिकेतील बालकलाकार तर दर्शकांचे प्रचंड लाडके आहेत. गोगी हे मालिकेतील पंजाबी पात्र आहे. त्याचे खरे नाव समय शाह असे आहे. गोगीचे मालिकेतले नाव गुरुचरण सिंग सोढी असे आहे. आणि योगायोगाने हेच नाव गोगीच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्याचे खरे नाव आहे. गोगीचे वडील रोशन सिंग सोढी यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव देखील गुरुचरण सिंग आहे.

गुरुचरण सिंग यांच्याविषयी…

मूळचे दिल्लीचे असलेले गुरुचरण सिंग हे खरं तर व्यवसायाने फार्मासिस्ट होते. अभिनयक्षेत्राशी त्यांचा काही जवळचा संबंध नव्हता. परंतु त्यांच्या नशिबात मात्र प्रसिद्धी आणि अभिनय होता.

नशिबाचे फासे उलटे पडल्यानंतर ते कामाच्या शोधात दिल्लीहून मुंबईला आले आणि पुढे रोशन सिंग सोढी म्हणून घराघरात त्यांचे नाव झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ही मालिका सोडली. परंतु त्याचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

 

roshan singh sodhi inmarathi

 

कोव्हीडमुळे झालेल्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये मालिकांचे चित्रीकरण देखील काही काळ थांबले होते. नंतर चित्रीकरण पूर्ववत सुरु झाले परंतु इतर कलाकारांप्रमाणे गुरुचरण सिंह मात्र मालिकेत परतले नाहीत. २००८ पासून सुरु झालेल्या या मालिकेत आता मात्र सोढीचे पात्र रंगवताना बलविंदर सिंग सूरी दिसतात.

बलविंदर सिंग सूरी यांना आपण ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात बघितले आहे. बलविंदर सिंग देखील ही भूमिका चांगल्याप्रकारे करत आहेत परंतु चाहत्यांना मात्र गुरुचरण सिंग यांची आठवण येतेच.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करण्या आधी ते आर्थिक संकटात सापडले होते. काही कारणामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता.

सुदैवाने त्यांना तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि काही महिन्यांतच त्यांनी आर्थिक संकटावर विजय मिळवला. ही मालिका मिळाल्यानंतर त्यांचे नशीब पालटले असे ते म्हणतात.

 

roshan singh sodhi inmarathi

 

त्यांच्या कामात आलेल्या अडचणींमुळे त्यांच्यावर मोठे कर्ज झाले होते. लोक आपापले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांच्या मागे लागले होते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी ते सगळं सोडून स्वप्नांच्या शहरात म्हणजेच मुंबईला आले. सुरुवातीला त्यांनी मॉडेलिंगचे काम केले. त्यानंतर सहा महिन्यांतच त्यांना तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रोशन सिंग सोढी या गॅरेज मालकाची भूमिका मिळाली.

त्यांनी जीव ओतून काम केले आणि हे पात्र रंगवले. लोकांना हे पात्र खूप भावले. खरं तर २०१३ साली निर्मात्यांशी असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी ही मालिका सोडली होती पण चाहत्यांच्या आग्रहाखातर निर्मात्यांनी त्यांना मालिकेत परत बोलावले होते. अखेर मागच्या वर्षी त्यांनी ही मालिका सोडली पण त्याचे कारण मात्र स्पष्ट केले नाही.

प्रयत्न केले तर कुठल्याही संकटातून मार्ग निघतोच याचे आणखी एक उदाहरण म्हणजे गुरुचरण सिंग हे आहेत. या गुणी अभिनेत्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

 

gurucharan singh inmarathi

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?