रणजीत मुलींचे कपडे ओढायचा म्हणून त्याला घरच्यांनी धक्के मारून बाहेर काढलं होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज आणि जागतिक कंटेंटचा आस्वाद घेणाऱ्यांना ‘व्हिलन’ ही कॉन्सेप्टच कधी पचनी पडणार नाही. कारण आत्ताचे सिनेमे किंवा सिरिज या जास्तकरून वास्तवदर्शी असतात त्यामुळे त्यात सगळ्याच प्रकारची पात्रं पाहायला मिळतं.
एक काळ असा होता की सिनेमा म्हणजे हीरो हिरॉईन आणि व्हिलन हे समीकरणच होतं, भले तो व्हिलन हिरॉईनचा बाप का असेना पण सिनेमात व्हिलन नसेल तर तो सिनेमा अपूर्ण वाटायचा.
भारतीय चित्रपटसृष्टीनेतर असे बरेच व्हिलन दिले आहेत. शोलेचा गब्बर सिंग असो, बॉबीमधला प्रेम चोप्रा असो, मिस्टर इंडियामधला मोंगॅम्बो असो किंवा किंवा संजूबाबाने साकारलेला खलनायक असो!
फरक फक्त एवढाच होता की त्या काळातले कलाकार हे लवकर टाइपकास्ट होत असत. टाईपकास्ट म्हणजे एका गोष्टीचा छप्पा पडणे. ऋषि कपूर यांनी चॉकलेट बॉय म्हणून सिनेइंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली त्यापुढे त्यांना सतत तसेच रोल मिळत गेले, ऋषि कपूर यांना व्हिलन म्हणून दाखवायचं धाडस थेट २०१२ च्या अग्निपथच्या रिमेकमध्ये केलं गेलं!
याच टाईपकास्ट होण्यामुळे आपल्याला जेवढे चांगले ‘व्हिलन’ मिळाले तेवढेच चांगले ‘अॅक्टर’ आपल्यापासून दुरावले. अमरिश पुरीसारख्या सीनियर अॅक्टरनेतर शेवटपर्यंत खाष्ट वडिलांची किंवा खलनायकाचीच भूमिका केली.
अजय देवगण, संजय दत्त, अक्षय कुमार यांनासुद्धा त्यांनी अॅक्शन हीरोची इमेज ब्रेक करायला कित्येक वर्षं गेली. हे सांगण्याचा मातीतार्थ एकच की इंडस्ट्रीमध्ये तुमच्यावर एक ठपका बसला की तो कायमचा बसतो, हा एक प्रकारचा शापच आहे.
हा शाप आणखीन एका लोकप्रिय व्हिलनला मिळाला ज्यामुळे त्याला त्यांच्या घरच्यांनी धक्के मारून बाहेर काढलं. ज्याचं अर्ध आयुष्य मुलींचे कपडे खेचण्यात गेलं, जो केवळ नजरेनेच समोरच्या हिरॉईनला अस्वस्थ करायचा असा बॉलिवूडचा अट्टल व्हिलन म्हणजे रणजीत!
तब्बल ३५० हून अधिक सिनेमात निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या रणजीतवर व्हिलनचा ठप्पा बसला तो अजूनही तसाच आहे, आजही हाऊसफूलसारख्या मॅड कॉमेडी सिनेमातसुद्धा रणजीतला एक व्हिलन म्हणूनच दाखवलं जातं.
नुकत्याच एका मुलाखतीत रणजीत यांनी त्यांच्या फिल्मी प्रवासातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
रणजीतच्या मते त्यांनी कधीच स्वतःला एक अभिनेता म्हणून मानलं नाही, शिवाय कोणत्याही गॉडफादरचा हात डोक्यावर नसतानाही त्यांनी एवढी मजल मारली ते केवळ आत्मविश्वासावरच.
त्यांनी कधीच स्वतःची व्हिलन ही प्रतिमा ग्लोरीफाय नाही केली, उलट ज्या भूमिका समोर येतील त्या रणजीत करत गेले आणि त्यातूनच त्यांची ही खलनायकाची इमेज तयार झाली, आणि या इमेजचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरसुद्धा चांगलाच परिणाम झाला.
–
- बॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे?
- अनेक तरुणींना लग्नाच्या जाळ्यात अडकवणारा, बेमालूम सोंगाड्या “लखोबा लोखंडे”!
–
रणजीत यांच्या या इमेजचा लग्नाआधी त्यांना फारसा फरक पडला नाही, पण नंतर लोकांचा समज असाच झाला की हा माणूस तसाच आहे जसा तो स्क्रीनवर दिसतो. ते जेव्हा जेव्हा कुटुंबासोबत बाहेर जेवायला हॉटेलमध्ये जायचे तेव्हा तिथली लोकं त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत.
जेव्हा रणजीत यांनी शर्मिलीमध्ये प्रथम निगेटिव्ह भूमिका वठवली तेव्हा त्यांना त्यांच्या घरातून धक्केमारून बाहेर काढलं होतं. रणजीतच्या आई वडिलांना वाटायचं की आपला मुलगा वाईट लोकांच्या संगतीत राहून मुलींचा छळ करतो आणि यालाच तो स्वतःचं प्रोफेशन समजतो.
अर्थात नंतर त्यांचा गैरसमज दूर झाला कारण रणजीत यांना इतक्या सिनेमांच्या ऑफर यायला लागल्या की त्यांना शुटींग संपवून घरी जायला सुद्धा वेळ मिळत नसे, ते त्यांच्या गाडीतच झोप काढत असत, आणि शुटींग पूर्ण करत असत.
सुरुवातीच्या काळात साध्या सरळ भूमिका केल्यानंतर माझं पूर्ण आयुष्य हे मुलींचे कपडे ओढण्यातच गेलं असं रणजीत मस्करीत जरी म्हणत असले तरी ते तितकंच खरं आहे, त्यावेळेस सिनेमात दिसणारे रेप सीन्स तेवढे अंगावर येणारे नसायचे नाहीतर रणजीत यांचं जगणं मुश्किल झालं असतं.
रणजीत यांनी भले हीरोची भूमिका केली नाही पण व्हिलन म्हणून त्यांनी त्यांची दहशत त्या काळच्या प्रेक्षकांच्या मनात निर्माण केली तशी कुणालाच करता आली नाही.
या गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही, जे काम मिळेल ते तो करत गेला आणि बनला एक एव्हरग्रीन व्हिलन!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.