Site icon InMarathi

राज कपूरने ‘कुरूप’ म्हणून हिणवलं; नाहीतर झीनतऐवजी या सिनेमात ‘दीदी’ दिसल्या असत्या!

lata mangeshkar featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साऱ्या जगावर आपल्या आवाजाने मोहिनी घालणाऱ्या लता मंगेशकर यांना कोण ओळखत नाही? संगीताशी ज्याचा दूरदूरवर काहीही संबंध नाही अशी व्यक्तिसुद्धा लता मंगेशकर या व्यक्तिमत्वाशी परिचित असणारच!

आजच्या पिढीच्या तोंडावरही त्यांचीच गाणी असतात. कित्येक पिढ्यांनी त्यांची गाणी गाऊन स्वतःचं करियर घडवलं, आज डझनभर रीयालिटि शोजमधून कित्येकांना त्यांच्यातले कलागूण दाखवायला वाव मिळतो, पण ज्या काळात टेलिव्हिजन तर सोडाच पण रेडियो हीसुद्धा एक चैनीची गोष्ट मानली जायची त्या काळात लता मंगेशकर यांनी नावलौकिक मिळवलं.

 

 

लता मंगेशकर यांच्या गायकीबद्दल आपण बरेच किस्से ऐकले असतील पण आज आम्ही तुम्हाला लतादीदी यांच्या बाबतीत घडलेला एक वेगळाच किस्सा सांगणार आहोत!

दीनानाथ मंगेशकरांच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबातल्या सदस्यांनी फार कष्टात दिवस काढले. तेव्हा त्यांनी गाणं या गोष्टीकडे एक छंद म्हणून नव्हे तर उत्पन्नाचं साधन म्हणून बघितलं.

याच दरम्यान लतादी या वयाच्या १४ व्या वर्षापासूनच सिनेमातल्या नायक नायिकेच्या बहिणीचा किंवा मैत्रिणीचा रोल करायच्या. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठीच लता या अभिनय करायच्या. पण एकेदिवशी खुद्द राज कपूर यांच्या एका टिप्पणीमुळे लता मंगेशकर यांना खूप चीड आली होती.

 

prabhatkhabar.com

 

राज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही गोष्ट आहे १९७८ मध्ये आलेल्या सत्यम शिवम सुंदरम या सिनेमादरम्यानची. खरंतर राज कपूर या सिनेमात लता मंगेशकर यांना घेऊ इच्छित होते, जिचा आवाज खूप सुरेल आहे पण चेहेरा अगदीच सामान्य आहे.

या सिनेमाच्या माध्यमातून राज कपूर समाजाला हा संदेश देऊ इच्छित होते की शारीरिक सौंदर्यच महत्वाचे नसते, माणसाचे मन निर्मळ हवे. लता मंगेशकर यांनादेखील या सिनेमाची कथा भावली होती, आणि त्यांनी सिनेमात काम करण्यासाठी होकारसुद्धा दिला होता!

राज कपूर यांनी सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत एक स्टेटमेंट दिले होते ते असे की – “जेव्हा तुम्ही एक दगड बघता, तो दगड तोवर एक दगडच भासतो जोवर त्यावर कुणी धार्मिक निशाणी लावत नाही, तसंच तुम्ही जेव्हा एक सुरेल आवाज ऐकता तेव्हा तुम्हाला तो आवडतो, पण जेव्हा तुम्हाला समजतं की हा तर एका कुरूप व्यक्तीचा आवाज आहे तेव्हा तुम्हाला कसं वाटेल?”

 

 

राज कपूर यांच्या या वक्तव्यामुळे लता मंगेशकर नाराज झाल्या. त्यावेळेस चर्चा अशीही होती की आवाज आणि चेहऱ्यातल्या विरोधा भासामुळेच लता मंगेशकर यांना फिल्मसाठी घेतलं आहे.

यामुळे लता मंगेशकर यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी राज कपूरच्या या सिनेमात कम करण्यास नकार दिला, राज कपूर यांनी लतादी यांना बरीच विनवणी केली तरी लता मंगेशकर त्यांच्या मुद्द्यावर कायम होत्या.

अखेर या सिनेमासाठी किमान त्यांनी त्यांचा आवाज द्यावा अशी मागणी राज कपूर यांनी लतादीदींकडे केली, पहिले तर त्या यालाही तयार नव्हत्या पण नंतर त्यांनी याच सिनेमासाठी स्वतःचा आवाज दिला आणि त्यातली सगळीच गाणी सुपरहीट झाली.

नंतर या सिनेमातल्या मुख्य भूमिकेसाठी झिनत अमानला घेण्यात आलं. सिनेमाची कथा आणि मांडणी बरीच बोल्ड असल्याने आणि शशी कपूर – झिनत यांच्यातल्या काही भडक सीन्समुळे लोकांनी या सिनेमावर खूप तोंडसुख घेतलं, लतादी यांच्या सुरेल आवाजामूळेच या सिनेमाची आठवण आजही काढली जाते.

 

 

कदाचित लता मंगेशकर यांनी या सिनेमात काम केलं असतं तर नक्कीच हा सिनेमा एका वेगळ्याच पद्धतीने आपल्यासमोर आला असता, पण झीनत यांना आवाज देणाऱ्या लतादीदी यांनी या सिनेमात काम न करणं हे त्यांच्या चांगलंच पथ्यावर पडलं.

हा सिनेमा त्यातल्या कथेपेक्षा गाण्यांसाठीच ओळखला जातो, आणि हीच एक गायिका म्हणून लतादीदी यांची खरी जीत आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version