Site icon InMarathi

“बेशरम मी तुझ्या बायकोला ओळखते..” असं म्हणत तनुजाने धर्मेंद्रच्या कानाखाली मारली!

tanuja and dharmendra featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलिवूड म्हंटलं की आपल्यासमोर उभी राहते झगमगती दुनिया आणि या दुनियेतले झळकणारे स्टार्स, आणि याच स्टार्सची वेगवेगळी गॉसिप्स आणि त्यांचे न ऐकलेले किस्से!

राखी सावंत आणि मीखा सिंग यांचं चुंबन असो किंवा अक्षयच्या बायकोने पॅन्टची चेन फॅशन रॅम्पवर उघडणं असो, बॉलिवूडच्या या स्टार्सची अशी अनेक लफडी आपण बघितली आहेत आणि त्यावरून झालेलं वादंगसुद्धा अनुभवलं आहे.

 

 

सलमान ऐश्वर्याच्या प्रेमप्रकरणानंतर झालेले वाद असो किंवा शाहरुख सलमान आणि संजय दत्त यांच्यात झालेली कथित मरामारी असो बॉलिवूडकरांना हे असे वादंग काही नवीन नाहीत!

बॉलिवूडच्या एका अशाच जोडीचा धम्माल किस्सा आपण आज जाणून घेणार आहोत. ती जोडी म्हणजे ६० आणि ७० चं दशक गाजवणारी तनुजा आणि धर्मेंद्र यांची!

बच्चन आणि राजेश खन्नाच्याही आधी धर्मेंद्र या नावाचं गारुड साऱ्या इंडस्ट्रीवर होतं आणि ही-मॅन धर्मेद्र आणि तनुजा यांनी तो काळ चांगलाच गाजवला होता, दोघे त्या काळात बऱ्याच सिनेमात एकत्रच काम करायचे.

 

बहारें फिर भी आयेंगी, इज्जत, दो चोर अशा वेगवेगळ्या सिनेमात काम केल्याने तनुजा आणि धर्मेंद्र हे एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. पण एवढे चांगले मित्र असूनही असं नेमकं काय झालं की तनुजा यांनी बेशरम म्हणत त्यांच्या कानशिलात वाजवली!

ही गोष्ट आहे १९६५ ची, तनुजा आणि धर्मेद्र हे ‘चाँद और सुरूज’ या सिनेमाचं शुटींग करत होते, दोघेही चांगले मित्र असल्याने दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत असत, मजा मस्ती तसेच कधीतरी दारूचेही सेवन करत असत.

धर्मेंद्र यांनी आपली पहिली बायको प्रकाश कौर हिच्याशीसुद्धा तनुजाची भेट घडवून आणली होती शिवाय धर्मेद्रच्या मुलांशीसुद्धा तनुजा यांची चांगलीच गट्टी जमली होती.

एके दिवशी बहुतेक धर्मेद्र थोडेफार दारूच्या नशेत असताना सेटवरच तनुजा यांच्याशी फ्लर्ट करायचा प्रयत्न करत होते, तनुजा धर्मेंद्र यांना चांगलीच ओळखत असल्याने तिला हा सगळा प्रकार फार चुकीचा वाटला.

धर्मेंद्र यांच्या या वर्तणूकीचे उत्तर म्हणून तनुजाने चक्क धर्मेंद्र यांच्या कानाखाली लगावली आणि त्यांना खडेबोल सुनावले की “बेशरम मी तुझ्या बायकोलादेखील चांगलीच ओळखते तरी तू माझ्याशी फ्लर्ट करतोयस.”

 

 

हे ऐकल्यावर धर्मेंद्र अगदी ओशाळले, त्यांना स्वतःच्याच या कृत्याची लाज वाटायला लागली. याबाबतीत धर्मेंद्र यांनी तनुजाची माफी मागितली आणि मला राखी बांधून भाऊ बनव अशी इच्छादेखील व्यक्त केली!

सुरुवातीला तनुजा यांनी ही मागणी फार मनावर न घेता टाळाटाळ केली पण नंतर धर्मेंद्र हे त्यांच्या मागणीवर अडून राहिल्याने तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या मनगटावर काळा धागा बांधून त्यांना भाऊ मानलं खरं.

बॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही, उलट या दोघांनी ती गोष्ट फार उत्तमरीत्या हाताळली आणि स्वतःचं काम सुरूच ठेवलं!

 

 

आजच्या ऑनस्क्रीन किंवा ऑफस्क्रीन कपल्सना अशा गोष्टी कोणताही गाजावाजा न करता किंवा जास्त चर्चा न करता कशा हाताळायच्या हे धर्मेद्र आणि तनुजा यांच्याकडून शिकण्यासारखं आहे!

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version