Site icon InMarathi

फिरोज खानला ‘टक्कर’ देऊन ‘तो’ बनला ८० च्या दशकातला खलनायक!

villains featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

इंग्रजित एक वाकप्रचार आहे, एव्हरिथिंग हॅपन्स फॉर रिझन. घडणार्‍या प्रत्येक घटनेमागे काही एक योजना असते. त्या क्षणाला आपल्याला वाटतं की अरे, हे असं का घडल? पण पुढे जाऊन त्या घटनेचा परिणाम म्हणून अशी एखादी आयुष्याला कलाटणी देनारी घटना घडते की जे घडलं ते बरंच झालं असं वाटतं.

अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी सुप्रसिध्द अभिनेता शक्ती कपूर सोबत घडली ज्यानं बॉलिवुडला एक देखणा खलनायक मिळवून दिला!

 

 

ऐंशीच्या दशकात ज्याने आऊ लोलिता म्हणत किंवा मैं एक छोटासा नन्हासा मुन्नासा बच्चा हूं म्हणत धुमाकूळ घातला तो शक्ती कपूर बॉलिवुड मधील देखण्या खलनायकांपैकी एक आहे.

भेदक डोळ्यांचा आणि देखणा चेहरा लाभलेला हा पंजाबी तरूण पुण्यातील फिल्म इंन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेऊन बाहेर पडला होता तेव्हाची ही गोष्ट.

इतर हजारोंप्रमाणेच डोळ्यात स्वप्नं घेऊन हा तरूण बॉलिवुडमधे नाव कमवायच्या तयारीत होता. अर्थात देखणा चेहरा आणि अभिनयाचं शिक्षण या बळावर लगेचच संधी मिळणं अशक्यच होतं. अशातच एक दिवस अशी घटना घडली की शक्ती कपूरचं अवघं आयुष्यच बदलून गेलं.

एक छोटीशी घटनाही तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी देऊ शकते? याचम उत्तम उदाहरण म्हणजे शक्ती कपूरसोबत घडलेली ही घटना.

शक्ती कपूर इंडस्ट्रीत काम मिळविण्यासाठी स्ट्रगल करत असताना इथे एका अत्यंत रुबाबदार, देखण्या हिरोची चलती होती. अमिताभ, राजेशसारखं यश नसलं तरीही त्याच्या नावाचा दबदबा होता. त्याचे त्या काळात बोल्ड वाटणारे चित्रपट हिट होत असत.

 

 

मुळात आम पब्लिकला काय हवंय हे त्यानं अचूक ओळखलं होतं. या अभिनेता, निर्मात्याचं नाव होतं, फिरोज खान. एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेल्या फिरोज खानच्या हाती नियतीनं शक्ती नावाच्या नवख्या तरूणाची दोरी दिली होती.

लिंकिंग रोडवरून साऊथ मुंबईत शक्ती जात असताना त्याच्या गाडीला एक अपघात झाला आणि या अपघातात जरी त्याच्या गाडीचं अतोनात नुकसान झालं तरीही अशा शंभर गाड्य़ा घेता येतील इतकं यश, पैसा त्याला या अपघातानं मिळ्वून दिलं.

तो नेहमीप्रमाणेच गाडीतून जात असताना एक मर्सिडीज आली आणि शक्तीच्या गाडीशी टक्कर होऊन त्याच्या गाडीचा चक्काचूर झाला. संतापलेला शक्ती गाडीबाहेर पडला त्याचवेळेस ज्या गाडीसोबत त्याचा अपघात झाला त्याच्याही मालक गाडीतून उतरला.

त्याला पहाताकशणी शक्ती पुढचं मागचं सगळं विसरून गेला कारण समोरच्या गाडीतून खाली उतरलेली व्यक्ती होती, फिरोज खान. शक्तीनं लगे हात फिरोजला आपली माहिती सांगितली.

 

कसा तो एफटीआय मधून शिक्षण घेऊन बाहेर पडला आहे आणि कसा कामाच्या शोधात आहे वगैरे. शक्तीच्या द शक्ती कपूर होण्याच्या प्रवासाची ही फिल्मी स्टोरी इथून चालू झाली.

या अपघातानंतर त्याच दिवशी संध्याकाळी शक्ती त्याच्या एका लेखक मित्राच्या घरी गेला होता. बोलता बोलता मित्रानं सांगितलं की फिरोज खान त्याच्या अगामी कुर्बानी चित्रपटासाठी एका अशा अभिनेत्याच्या शोधात आहेत ज्यानं एफटीआयमधून अभिनयाच डिप्लिमा घेतला आहे आणि ज्याच्या गाडीचा अपघात फिरोज खानच्या गाडीसोबत झालेला आहे.

हे ऐकून शक्ती तिनताड उडालाच.. त्यानं अत्यंत एक्साइट होत सांगितलं की अरे तो तरूण मीच आहे. माझ्याचबाबतीत हे सगळ घडलंय. पुढे त्या मित्राने फिरोज खानला फोन करुन ही माहिती दिली आणि शक्ती कपूरला त्याचा इंडस्ट्रितला पहिला ब्रेक मिळाला- ‘कुर्बानी!’

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version