Site icon InMarathi

भांडण झाल्यावर नेहमी ३६ चा आकडा का धरतात? वाचा यामागचं गंमतीशीर कारणं

36 final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आयुष्यात आपलं बऱ्याच लोकांशी पटत नाही.घरी असलो तरी आई, बाबा,आपली मुलं, आणि ऑफिसात असलं की आपले सहकारी, बॉस या सगळ्यांशी आपले कधी ना कधी भांडण होत असते..कोणाशीतरी एखाद्या गोष्टीवरून ना पटण किंवा एखाद्या विषयावरून मतभेद असणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि खरं सांगायचं तर त्या शिवाय आयुष्याला तरी मजा आहे का सांगा बरं!!!!!

 

 

हसणं खेळणं आनंदी राहणं जितक गरजेचं असत तसंच मतभेद असणं सुद्धा त्यामुळे एकमेकांची मत,विचार हे आपल्याला जाणून घेता येते.
पण आपल्या आयुष्यात अशी सुद्धा एक तरी व्यक्ती असते जिच्याशी आपल अजिबात पटत नसतं, जिचे विचार आपल्याला अजिबात मान्य नसतात..

 

istock

 

इतकं की ती व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोरसुद्धा नको असते, त्या व्यक्तीचं नाव, तिचा विषय सुद्धा आपल्याला नको असतो. अशा वेळेला सहज तोंडातून निघून जाते, की  “तिचा आणि माझा ३६ चा आकडा आहे”..किंवा आपण मित्र मैत्रिणी एकत्र जमलो की दुसऱ्याबद्दल गॉसिप करताना म्हणतोच ना, की ‘त्याचा आणि त्या दुसऱ्या मुलाचा एकदम ३६ चा आकडा आहे!’ आणि आई जर मावशीशी किंवा काकूशी किंवा बिल्डिंग मधल्या मैत्रिणींशी गप्पा मारत असेल तर हे वाक्य नक्कीच असत..’ती तिकडे राहते ना तिचा आणि त्या पहिल्या मजल्यावरच्या काकूंचा एकदम ३६ चा आकडा आहे.

 

 

ही वाक्य लहानपणापासून ऐकत आलेली असतो. त्यामुळे आपल्या तोंडात बसलेली असतात. जसे जसे मोठे होतो त्याचे अर्थ सुद्धा कळायला लागतात. पण आपल्या रोजच्या गडबडीत आपण साध्या साध्या गोष्टींकडे लक्ष सुद्धा देत नाही. आता हेच बघा ना..दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतील, विरोधाभास असेल तर ३६ चा आकडा आहे असं आपण म्हणतो. पण ३६ चं का? ३७ का नाही?? ९३ नाही..किती लॉजिकल प्रश्न आहे की नाही हा!

 

 

याचं उत्तर कठीण वाटत असलं तरी सगळ्यात सोपं आहे. आपल्याला पटकन हे कळत नाही कारण ३६ हा अंक मांडण्यामध्ये फरक आहे. आपल्या मराठी मध्ये तीन आणि सहा हे आकडे आपण ३ आणि ६ अशा प्रकारे लिहितो. नीट बघितलं तर ३ च्या उलट ६ आहे. म्हणजेच ३ आणि ६ विरोधाभास दाखवतात. दोन व्यक्तींमधील दुरावा, विरोधाभास दाखवण्यासाठी हे आकडे आपली भुमिका तंतोतंत निभावतात.

दोन व्यक्तींमध्ये मतभेद असतात त्यामुळे एकेमकांच्या उलट त्या व्यक्तीची मत असतात. म्हणून मतभेद झाले, कोणाशी पटत नसेल तर ३६ चा आकडा आहे असं आपण म्हणतो.

 

shuttestock

 

आज अनेत कुटुंब, मित्रांचे ग्रुप्स यांमध्ये ३६ चा आकडा असलेल्या अनेक जोड्या दिसून येतील. साधी हाताची बोट सारखी नसतात तिथे माणसं कशी सारखी असणार त्यामुळे माणसामाणसांमध्ये भांडणं असमं स्वाभाविक आहे.

माणसांचे एकवेळ मतभेद परवडले पण एकमेकांबद्दलचे मनभेद असू नये.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version