वाजपेयींच्या राजकीय शत्रुचा भाजपकडून जयजयकार, वाचा यामागे काय शिजतंय.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. प्रश्न सर्जिकल स्ट्राईक चा असो वा नोटबंदी किंवा काँग्रेस पक्षाच्या असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचं जगातील सर्वात उंच स्मारक उभं असो, मोदींनी नेहमीच आपल्या समर्थकांना आणि विरोधकांना चकित केलं आहे.
ही आठवण करून द्यायचं कारण हे की, परवाच मोदींनी अलिगढच्या राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने एका विद्यापीठाचं उदघाटन केलं. तुम्हाला वाटेल,” त्यात काय एवढं ?” ही बातमी एका कारणासाठी विशेष आहे.
तत्पूर्वी, “राजा महेंद्र सिंह कोण होते ?” हे जाणून घेऊयात.
अलिगढ मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या उदघाटनात मोदींनी ज्यांचा ‘स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्व अर्पण करणारे राष्ट्र नायक’ असा उल्लेख केला ते राजा महेंद्र प्रताप सिंह यांचं कर्तृत्व हे स्वातंत्र्य संग्रामापासून आहे. त्यांनी नेहमीच शिक्षण प्रसारासाठी समाजाला खूप मदत केली. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयु) साठी त्यांनी आपली जमीन बहाल केली होती. जाट समुदायाच्या नेत्याला नेहमीच दुर्लक्षित ठेवण्यात आलं असं त्यांच्या समाजातील लोकांचं म्हणणं आहे.
भारतातच नाही तर अफगाणिस्तान मधील काबुल मध्ये जाऊन त्यांनी तिथल्या निर्वासितांचे प्रश्न सोडवले होते. राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी डिसेंबर १९१५ मध्ये अफगाणिस्तान मध्ये ‘अस्थायी हिंद सरकार’ ची स्थापना केली होती. या सरकारचे ते स्वतः राष्ट्रपती देखील झाले होते. जर्मन आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांना मिळून त्यांनी भारतातील इंग्रजांवर हल्ला केला होता. पण, इंग्रजानी कुटनीतीनेने ते युद्ध अफगाणिस्तानला बंद करायला भाग पाडलं होतं.
वायपेयींचे राजकीय शत्रु
भाजपचे जेष्ठ नेते अटल बिहारी वायपेयी यांच्या राजकीय शत्रुच्या नावासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनेच आग्रह धरावा ही बाब अनेकांना रुचली नाही, अनेकांनी भुवया उंचावल्या तर काहींनी हा पंतप्रधान मोदींचा स्टन्ट असावा असं म्हणत खांदे उडवले.
असं काय घडलं की राजा प्रताप सिंह आणि वाजपेयी यांच्यात तेढ निर्माण झाली, तर घटना होती १९५७ च्या निवडणूकीची! वाजपेयी निवडणूकीच्या रिंगणात उभे असताना राजा महेंद्र प्रताप सिंह यांनीही आपली दावेदारी जाहीर केली.
तेंव्हाच राजा प्रताप सिंह यांची सामाजिक ओळख जितकी कल्याणकारी आहे तितकीच त्यांची राजकीय ओळखही तितकीच करारी असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
राजा प्रताप सिंह हे भारतीय लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात असा एकमेव नेता आहे ज्याने १९५७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी चक्क अटल बिहारी वाजपेयी यांना निवडणुकीत हरवलं होतं. तेही छोट्या मोठ्या फरकाने नव्हे. राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या विरोधात लढतांना अटल बिहारी वाजपेयी यांची अनामत जप्त झाली होती. या लढाईची चर्चा पुढे अनेक वर्ष होत राहिली.
ही निवडणूक वायपेयी अशा पद्धतीने हारतील याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता, किंबहूना वायपेयींनाही या निवडणूकीच्या निकालाचा जबर धक्का बसला होता.
–
- केआरकेची भविष्यवाणी, ‘नरेंद्र मोदी होणार क्लीन बोल्ड ‘!! वाचा
- भारत-चीन सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी, अटलजी चक्क ८०० मेंढ्या घेऊन पोचले…!!
–
राजा महेंद्र प्रताप सिंह १ डिसेंबर १८८६ रोजी मुरसान प्रांतचे राजा घनश्याम सिंह यांच्या वंशात जन्म झाला होता. जनसेवा करण्याची वृत्ती आणि लोकांचा विश्वास जिंकण्याची कला त्यांच्यात उपजतच होती. अलिगढ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एकूण १८ देशांना भेट देऊन वृंदावन मध्ये आशियातील पहिलं ‘टेक्निकल कॉलेज’ सुरू केलं होतं. मूर्तिकला, शिलाई, गालिचा तयार करणे अश्या गोष्टी विद्यार्थ्यांना मोफत शिकवल्या जायच्या.
२९ एप्रिल १९७९ रोजी राजा महेंद्र प्रताप सिंह यांचं निधन झालं होतं.
राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विश्वविद्यालय चं उदघाटन होतांना या २ गोष्टींचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे:
१. अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी च्या बाजूला दुसरं विद्यापीठ उघडण्यात मोदी यांची कोणती नीती आहे ? शेतकऱ्यांच्या आंदोलनात नाराज झालेल्या बहुसंख्य जाट लोकांना खुश करण्याची तर ही रणनीती असेल का ?
२. अटल बिहारी वाजपेयी सारख्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याला हरवणाऱ्या राजा महेंद्र प्रताप सिंह यांचं कौतुक करत ते पक्षाच्या वतीने हा जुना पराभव मान्य करून पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत का ?
राजकीय विश्लेषक वरील प्रश्नांची उत्तरं शोधून आपल्यासमोर ठेवतीलच. पण, त्यातील खरं उत्तर मोदीजीच सांगू शकतात.
मोदींना समजणं सोपं नाहीये हेच खरं. कारण, ते सोपं असलं असतं तर विरोधकांना त्यांना हरवणं इतकं अवघड गेलं नसतं. बरोबर ना ?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.