तरुणाईचे लाडके पॉपकॉर्न खरं तर आहेत आरोग्यसाठी फायदेशीर!! वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
पॉपकॉर्न जगभरात रूळला तोच मुळात सिनेमाचा भिडू म्हणून. सिनेमा बघताना हातात पॉपकॉर्न असल्याशिवाय मजा नाही. म्हणूनच जगभरातया यच्चयावत चित्रपटगृहात पॉपकॉर्नचे स्टॉल अनिवार्यपणे असतात. तुम्ही आदी सवयीनं आणि टाईमपास म्हणून खाता त्या पॉपकॉर्नमधे नुसतीच टाईमपास चव नाही तर अनेक उत्तम पोषण मुल्यंही आहेत-
–
- सावधान, चुकूनही ‘हे’ ९ पदार्थ कधीही एकत्र खाऊ नका, नाहीतर…
- सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय…
–
सिनेमा बघताना हातात पॉपकॉर्नचा टब असेल तर जास्त मजा येते. सिनेमा आणि पॉपकॉर्न यांचं नातं अतूट आहे. मात्र हे पॉपकॉर्न, ज्यांच्याकडे आपन निव्वळ टाईमपास म्हणून बघतो त्यात आहाराशास्त्राच्यादृष्टीनं उत्तम गुणही लपलेले आहेत. रक्तातील साखरेचे नियमन, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे, पचन सुधारणे, वृध्दत्वाला दूर ठेवणे, वजन कमी करण्यास मदत करणे अशा अनेक बाबतीत पॉपकॉर्न मदत करतं.
पॉपकॉर्न नेमकं काय आहे ?
पॉपकॉर्नला संपूर्ण धान्य अन्न मानलं जातं. वरून टणक शेल असणारं आणि आत पिष्टमय असणारा मक्याचा दाणा विशिष्ट तापमानाला गरम होतो तेंव्हा आतील स्टार्चयुक्त भाग गरम होऊन हवेचा दाब वाढून त्याची लाही बनते.
इतिहासातील नोंदी सांगतात की पॉपकॉर्नला ६ हजार वर्षांहून जुना इतिहास आहे. जगभरात अनेक देशांत मका हे मुख्य धान्य असल्यानं मक्याच्या इतर खाद्य पदार्थांसोबतच मक्याच्या लाह्या अर्थातच पॉपकॉर्न हे देखिल पूर्वंपार बनत आलेलं आहे.
इतिहासात डोकावून पाहिलं तर अशा प्रकारे मक्याच्या वाळवून खडखडीत केलेल्या दाण्यांना उष्णता देत त्याच्या लाह्या बनविण्याचा पहिला प्रयोग पेरू या देशात केल्याचे उल्लेख पुरातत्व शास्त्रज्ञांनी केलेले आहेत.यासशिवाय साधारण याच कालखंडापासून न्यू मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतही पॉपकॉर्नचे उल्लेख आढळतात.
जगभरात विविध चवी आणि रंगात पॉपकॉर्न बनविले जातात. मात्र आपल्याला जे परिचित आहेत ते पॉपकॉर्न एका पौष्टिक पदार्थाचं भ्रष्ट रुप आहे आणि म्हणूनच ते जंक फ़ूड समजलं जाऊ लागलं. आपण खातो ते पॉपकॉर्न मुख्यत: बटरचा सढळ वापर आणि भरपूर मीठ असणारं असतं.मॉल, चित्रपटगृहात मिळणार्या पॉपकॉर्नमधे साधारणपणे ६० ग्रॅम संतृप्त चरबी असते (सॅच्युरेटेड फ़ॅट).
घरात पॉपकॉर्न बनवितानाही व्हेजिटेबल किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जातो. खरंतर योग्य प्रमानातील उष्णताही पॉपकॉर्न बनवायला पुरेशी असते. त्यामुळे घरात पॉपकॉर्न बनविताना त्यात बटर, तेल इत्यादी घालणं टाळावं. तेल, बटरच्या वापरामुळे जेंव्हा मक्याच्या दाणा लाही बनत असतो तेंव्हा घडणार्या क्रियेमधे यातील “हल” च्या पॉलिफ़ेनॉलिकवर परिणाम होऊन यातील पोषण मूल्यं कमी होतात.
पॉपकॉर्नमधिल पोषण मूल्यंयामधे उत्तम फ़ायबरचं प्रमाण उत्तम असतं. पॉलीफ़ेनिलोक संयुगं असतात ब जीवनसत्व, मॅन्गेनिज आणि मॅग्नेशियम असतं.
पॉपकॉर्नचे फायदे :
पचन सुधारते –
पॉपकॉर्न हे संपूर्ण धान्य आहे. एंडोस्पर्म, जर्म आणि कोंडा असल्यानं ते तांदूळ भाकरी, पोळी, ब्रेड इत्यादीप्रमाणेच तिनही घटकांचा समावेश असणारं आहे. यातील कोंडा पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो आणि बध्दकोष्ठतेपासून सुटका करतो. संपुर्ण पचन संस्था निरोगी ठेवण्यास याची मदत होते.
–
- त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या; या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही चिरतरुण राहू शकता…
- व्यायामाचा अतिरेकही ठरू शकतो घातक; हे गंभीर परिणाम लक्षात ठेवा!!
–
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात रहाते –
विद्र्व्य चोथा, जो संपूर्ण धान्यांत आढळणारा फ़ायबरचा एक प्रकार आहे तो कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो.
रक्तातील साखरेचे नियमन –
रक्तातील साखरेवरही फ़ायबर उत्तम काम करत असल्यानं रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या पातळीवर नियंत्रण राखण्याचं काम हे करतं. टाईप२ मधुमेह होण्याची शक्यता यानं कमी होते.
याशिवाय यातील ॲण्टीऑक्सिडंटमुळे वृधत्व आणि दीर्घकालीन आजारांशी सामना करणं शक्य होतं हे सगळे फ़ायदे लक्षात घेता पॉपकॉर्नकडे एक पौष्टीक स्नॅक म्हणून बघायला काहीच हरकत नाही, मात्र ते बनविताना तेलाचा, बटरचा आणि मिठाचा वापर टाळावा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.