Site icon InMarathi

फिल्म स्टुडिओत वॉचमनच्याही आधी हजर असणारा वक्तशीर ‘महानायक’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अमिताभ नावाचं नाणं गेली अनेक दशकं खणखणीत वाजतं आहे याचं कारण त्यांचा अभिनय हे तर आहेच पण कमालीची शिस्त हे देखील एक कारण आहे. अमिताभ बच्चन हे नाव सिनेजगतात केवळ अभिनयासाठी आणि त्यांच्या व्यावसायिकपणासाठीच ओळखलं जातं असं नाही तर त्यांच्या वेळ पाळण्याबद्दलही ते प्रसिध्द आहेत.

सिनेमासृष्टीत अनेक सुपरस्टार त्यांच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल कुप्रसिध्द आहेत. गोविंदा आणि राजेश खन्ना तर सकाळच्या शिफ़्टला रात्री येण्याइतके लेट लतीफ होते. मात्र अमिताभ हे नेहमीच दिलेल्या वेळेत हजर रहाण्याबाबत ओळखले जातात.

 

 

गेल्या पाच दशकात दोनशेहून अधिक चित्रपट दिलेल्या या मेगास्टारला वेळेची शिस्त पाळणं आवडतं. अमिताभ यांना एखादी वेळ दिलेली आहे आणि ते हजर झाले नाही हे चित्रच दूर्मिळ आहे.

एक काळ असा होता जेंव्हा अमिताभ अजून चाचपडत होते. त्यांचं करियर अद्याप आकार घ्यायचं होतं. अशा काळात ते सेटवर पोहचत असे तेव्हा तिथला वॉचमनही आलेला नसे. अनेकदा अमिताभ स्वत:च गेट उघडून सेटवर पोहोचत असे.

स्टूडिओमधे गेट उघडून ते थांबले नाही तर बाकीचे येईपर्यंत त्यांनी पाणी वगैरेही सोडून ठेवलं होतं. अर्थात तेंव्हा अमिताभ नावाला अद्याप वलय प्राप्त व्हायचं होतं मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

 

आता अमिताभ सेटवर वेळेआधी पोहोचले तर युनिटची तारांबळ उडते. आता अमिताभनं गेट उघडून सेटवर यावं हे धाडस कोणी करू धजणार नाही मात्र अमिताभ कालच्या इतकेच आजही निवांत आहेत.

कोणी वेळेत येवो न येवो मी वेळेतच हजर होणार आणि इतर जण उशिरा आले तरीही मला फरक पडत नाही असं ते म्हणतात.

ते असं म्हणत असले तरीही त्यांच्यासोबत काम करणारे सहकलाकार मात्र अमिताभ सोबत काम करायचं तर दुहेरी तणावात असतात. एकतर अमिताभनं पडद्यावर आपल्याला खाऊन टाकू नये यासाठी प्रयत्न कराचे आणि वेळेआधी नाही तर किमान वेळेत सेटवर हजर रहायचे.

याबाबत गोविंदा आणि अमिताभचा यांचा एक किस्सा लोकप्रिय आहे. झालं असं की, गोविंदाला बडे मियां छोटे मियांची ऑफर आली आणि सोबत अमिताभ आहेत कळल्यावर त्याला चित्रपट स्विकारावा की सोडावा ही पंचाईत पडली.

 

 

याचं कारण सेटवर उशिरा पोहोचण्याबाबत गोविंदा बदनाम होता आणि वेळेआधी अर्धा तास पोहोचण्याच्या वक्तशिरपणाबद्दल अमिताभ ओळखले जायचे. अमिताभसारखा महानायक आपल्यासोबत काम करणार याहून दुसरं भाग्य नाही हे गोविंदाला कळत होतं मात्र स्वत:च्या उशिरा येण्याच्या सवयीला तो बदलू शकत नव्हता.

एका वाईट सवयीपायी चांगला सिनेमा हातातून जाण्याची भीतीही होतीच. अर्थात याला गोविंदाची सवय जितकी कारणीभूत होती तितकीच एकाच वेळेस तो त्याकाळात अनेक चित्रपटात काम करत असे हे महत्वाचं कारणही होतं.

शेवटी त्यानं या पेचातून एक भलताच मार्ग काढला. धाडस गोळा करून त्यानं थेट अमिताभ यांनाच फोन लावला आणि सध्या एकाच वेळेस अनेक चित्रपटांचं शुटींग करत असल्यानं सेटवर पोहोचायाला त्याला बरेचदा खुप उशिर होतो हे मोकळेपणानं मान्य करून टाकलं.

यावर ग्रेट अमिताभनं अगदी सहजपणे त्याला सुचवलं की हरकत नाही. तू ज्या वेळेत सेटवर येणार असशील तशी कल्पना आधी देत जा म्हणजे त्याप्रमाणे मी सेटवर येत जाईन.

 

 

आता लोकांना यावरून गॉसिप करायचं असेल तर करु देत आपण त्याकडे लक्ष द्यायचं नाही. गोविंदानं हा शब्द मात्र अगदी काटेकोरपणे पाळला आणि बडे मियां छोटे मियांचं चित्रीकरण सुरळीत पार पडलं.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version