अंडे शाकाहारी की मांसाहारी? या कोड्याचे उत्तर या लेखात नक्की मिळेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्याइथे २ प्रकारचे अन्न सेवन करणारे लोकं असतात, एक व्हेजिटेरियन म्हणजेच शाकाहारी आणि दुसरे मांसाहारी म्हणजेच नॉन-व्हेजिटेरीयन्स! पण यामध्ये आणखीन एक प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला आहे तो म्हणजे Egg-etarian म्हणजेच फक्त अंड आणि अंड्याचे प्रकार खाणारे लोकं!
आपल्या देशात तर शाकाहारी विरुद्ध मांसाहारी अशी नुसती चढाओढ लागलेली असते, स्वतःच अन्न कसं श्रेष्ठ हेच सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात! पण आपली संस्कृती ही आपल्याला सदैव एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे अन्न हे पूर्णब्रह्म आहे! त्यामुळे शक्यतो कोणत्याही अन्नाला नावं ठेऊ नयेत!
लोकं एकतर पूर्ण शाकाहारी असतात, किंवा पूर्ण मांसाहारी असतात, पण असेही काही लोकं असतात जे कोणतंही मांस खात नाही पण अंड, अंड्याचे ऑमलेट, अंड्याची भुरजी, अंड्याची करी, उकडलेले अंडे असे तत्सम पदार्थ अगदी चवीने खातात!
लोकांचा एक गैरसमज असतो की जी कोणती पोषक तत्वे किंवा विटामिन्स असतात ती फक्त भाज्या आणि कडधान्ये यामध्येच असतात! पण असं नसून अनेक मांसाहारी पदार्थांमध्ये सुद्धा तितकीच उपयुक्त तत्वे असतात!
–
- कुठली अंडी बनावट आहेत ओळखण्यासाठी सोप्या आणि खात्रीलायक टिप्स..
- आयर्नची कमतरता; मात करण्यासाठी आहारात हव्या या महत्वाच्या पदार्थांचा समावेश
–
जसे की माशांमध्ये डी व्हीटामिन्स भरपूर प्रमाणात असतात, तसेच अंड्यामध्ये सुद्धा अशी बरीच तत्वे असतात! शिवाय हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीरात एक ऊर्जा कायम राहते!
पण काही लोकांनी अंडी आणि काही मांसाहारी पदार्थ खाणं टाळतात त्यामागची कारणं अत्यंत हास्यास्पद असतात!
कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्या पदार्थांमधून मिळणारी उपयुक्त सत्व आणि व्हिटामिन्स कडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही!
अंड आधी आलं की कोंबडी?
हा प्रश्न कित्येक दशकांपासून सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे. ह्या एका प्रश्नावर कित्येक चर्चासत्रे आजवर रंगलीत. पण अजूनही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काही सापडलं नाही. ह्यासारखाच आणखी एक प्रश्न आहे, ज्यावरून शाकाहारी आणि मांसाहारींमध्ये नेहेमी मतभेद होत असतात.
एक वर्ग म्हणतो की अंडी ही शाकाहारी आहेत तर दूसरा म्हणतो ती मांसाहारी आहेत. जे लोक अंडी मांसाहारी मानतात त्यांच्या समज आहे की, कोंबडी ही मांसाहारी असते म्हणून तिने दिलेलं अंडही मांसाहारी असतं.
तर काहींच्या मते अंडीमधून कोंबडीच पिल्लू बाहेर येतं म्हणून ती मांसाहारी आहे. तर हिला शाकाहारी समजणाऱ्या लोकांच्या मते, जर गाईने दिलेलं दुध शाकाहारी आहे तर कोंबडीने दिलेलं अंड मांसाहारी का?
म्हणून आता ह्यावर वैज्ञानिकांनी आपले तर्क-वितर्क लावून अखेर एक उत्तर शोधून काढलं आहे.
आधी ज्या लोकांना असं वाटत की अंड्यातून पिल्लू बाहेर येते म्हणून ते मांसाहारात मोडल्या जावे, त्या लोकांनी सर्वात आधी हे जाणून घेणे गरजेचं आहे की, कोंबडी अंडी कश्या प्रकारे देते.
तर कोंबडी दर एक ते दीड दिवसांत अंडी देते. पण ह्यासाठी तिला कोंबड्याच्या संपर्कात यायची काहीही गरज नसते. कोंबड्याच्या संपर्कात न येतादेखील ती अंडी देऊ शकते.
–
- टीव्हीवरील ‘ताजं मांस!’च्या जाहिरातीमागील स्टार्टअपचा प्रवास हा ‘असा’ झालाय!
- असा संबंध आहे ‘चिकन 65’ मधील 65 क्रमांकाचा डिशच्या नावाशी!
–
कोंबड्याच्या संपर्कात न येता कोंबडी जी अंडी देते त्यातून पिल्लू नाही येत. शास्त्रीय भाषेत ह्याला अनफर्टिलाइज्ड एग असे म्हणतात. आणि ही अंडी शाकाहारी असतात.
तर कोंबडी जी अंडी कोंबड्याच्या संपर्कात येऊन देते त्याला मांसाहारी मानले जाते. ह्या अंडींमध्ये गॅमीट सेल असतात, ज्यातून पिलांची उत्पत्ती होते आणि हे मांसाहारी असतात.
बाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्या अंडींमधून पिलं यायची शक्यता असते ती अंडी शेतकरी विकत नाहीत, जेणेकरून कोंबड्यांची संख्या वाढून त्यांच्या व्यवसायात भर पडेल.
त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, अंडी ही मांसाहारी नाही तर शाकाहारी असतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.