Site icon InMarathi

OTT प्लॅटफॉर्मवर या वर्षी येणाऱ्या १० उत्कंठावर्धक, बहुचर्चित वेब सिरीज…

ott webseries inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अक्षय कुमारने त्याचा बेल बॉटम हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित केला खरा पण महाराष्ट्रात अजूनही थिएटर बंद असल्याने सिनेमाच्या कमाईवर चांगलाच परिणाम झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे.

सिनेमागृह सुरू करूनसुद्धा आधीसारखी गर्दी तिथे आपल्याला बघायला मिळत नाहीये, लोकांच्या मनातली भीती आणि बॉलीवूडबद्दल निर्माण झालेली चीड ही दोन्ही कारणं याला कारणीभूत आहेत.

 

 

शिवाय कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट झाल्याने सिनेमगृहात जाऊन हजार रुपये खर्च करण्यापेक्षा तेच पैसे डिजिटल प्लॅटफॉर्मवर देऊन देशविदेशातला कंटेंट चवीने बघणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म जेव्हा आले तेव्हा मोजकीच लोकं त्यांच्या वाटेला जात होती, पण गेल्या २ ते ३ वर्षांपासून हे चित्र बदलताना आपण बघत आहोत. घरात डेली सोप बघणारे वयस्कर लोकंसुद्धा आजकाल सर्रास वेबसिरीज बघायला लागले आहेत.

भारतातही गेल्या काही वर्षात एकाहून एक सरस अशा वेबसिरीज आल्या, लोकांनी त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला. मिर्झापुर पासून ते अगदी मराठीतल्या समांतरपर्यंत वेगवेगळ्या वेबसिरीजला लोकांनी पसंती दर्शवली.

 

 

काही वेब सिरिज त्यातल्या अनावश्यक बोल्ड कंटेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या खऱ्या, पण वेबसिरीज मधला हा बोल्ड कंटेंटही लोकांनी फार कमी वेळात लोकांनी स्वीकारला आणि त्या गोष्टीचेही अप्रूप वाटणे कमी होऊ लागले.

२०२१ मध्ये अशाच काही नवीन वेबसिरीज आणि त्यांचे पुढचे सीझन येणार आहेत ज्यांची लोकं बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट बघत आहेत. त्या १० वेब सिरिज नेमक्या आहेत तरी कोणत्या जाणून घेऊयात!

१. रुद्र – द एज ऑफ डार्कनेस :

 

 

अजय देवगण म्हणजे हमखास व्यावसायिक यश हे समीकरणच सध्या झालेलं आहे. तान्हाजी असो किंवा नुकताच आलेला भुज, अजय देवगण हे नाव सिनेमाला जोडलं गेल्यावर सिनेमा सुपरहीट होणारच.

हाच अजय देवगण आता पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एंट्री घेणार आहे. रुद्र या वेबसिरीजमधून अजय देवगण डिजिटल मध्यमावर पदार्पण करणार असून ही सिरिज ब्रिटिश वेबसिरीज लुथरचा रिमेक आहे.

अजय देवगण एका वेगळ्याच भूमिकेत यात दिसणार असून याचं पोस्टर रिलीज केल्यापासूनच लोकांची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. सैफ अली खान नंतर अजय देवगण हा दूसरा मोठा स्टार आहे जो डिजीटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे.

याची रिलीज डेट अजून जाहीर केली नसली तरी २०२१ मध्ये ही सिरिज लोकांच्या भेटीला येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

२. फाइंडिंग अनामिका :

 

 

अजय देवगण पाठोपाठ धकधक गर्ल माधुरी दीक्षितही तिचा कमबॅक डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या नव्या फाइंडिंग अनामिका या वेब सिरिजमधून माधुरी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटीच्या बेपत्ता होण्यावर ही सिरिज आधारित असून माधुरीसोबत यात संजय कपूर मानव कौल असे नावाजलेले अभिनेतेसुद्धा दिसणार आहेत.

ही सिरिजही या वर्षी रिलीज व्हायची शक्यता आहे.

३. अरण्यक :

 

 

आपल्या मोहक आणि मादक अदांनी कित्येकांना घायाळ करणारी रविना टंडनसुद्धा नेटफ्लिक्सच्या अरण्यक या वेबसिरीजमधून पदार्पण करणार आहे. हिमाचल प्रदेशमधलं सिरियल किलिंग आणि थोडंसं हॉरर असं या कथानकाचं स्वरूप असल्याचं स्पष्ट झालं आहे.

ही सिरिजही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रविनासोबत यात आशुतोष राणासारख्या कलाकाराच्या अभिनयाचासुद्धा आस्वाद घेता येणार आहे.

४. असुर सीझन २ :

 

 

अर्शद वारसी, वरुण सोबती अमेय वाघ, शरीब हाशमीसारखे कलाकार असणाऱ्या असुर या वेबसिरीजची खूपच चर्चा झाली होती. वेगवेगळे पुरस्कार आणि लोकांचं प्रेम असं दोन्ही या सिरिजला मिळालं.

एकंदरच एक वेगळी मर्डर मिस्ट्री आणि त्यामागचा थरार लोकांनी पसंत केला, शिवाय या सिरिजच्या ओपन एंडिंगमुळे लोकांची उत्सुकता खूपच ताणली गेली होती.

नुकतंच अर्शद वारसीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून असुरच्या दुसऱ्या सीझनची हिंट दिली असून लवकरच याचा दूसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो!

५. स्पेशल ऑप्स १.५ :

 

 

कुठलाही बोल्ड आणि बीभत्स कंटेंट न दाखवताही एक खिळवून ठेवणारी सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज मांडता येऊ शकते हे नीरज पांडेने त्याच्या स्पेशल ऑप्स या सिरिजमधून दाखवून दिलं.

संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची पार्श्वभूमी घेऊन एक वेगळंच कथानक या सिरिजमधून सादर करण्यात आलं, के के मेननसारख्या कसलेल्या अभिनेत्याने या सिरिजमध्ये केलेल्या कामाची खूपच तारीफ केली.

या सिरिजचा पुढचा सीझनही याच वर्षी येण्याची शक्यता आहे.

६. दिल्ली क्राईम सीझन २ :

 

 

निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित भारतातील सर्वोत्कृष्ट वेबसिरीज म्हणून दिल्ली क्राईमला बरेच पुरस्कार मिळाले, मोठ्या गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यावर फार प्रभावीपणे यातून भाष्य केलं गेलं.

शिवाय इतका गंभीर विषय असून तो हाताळताना कुठेही चूक होऊ दिली नाही. त्यामुळेच लोकांनी ही सिरिज डोक्यावर घेतली. शेफाली शहा, राजेश तेलंग यांचा उत्तम अभिनय आपण यात पाहिला.

याच सिरिजचा दुसरा भागही लवकरच येणार असून तो भाग कोणत्या घटनेवर आधारीत असणार आहे याची उत्सुकता लोकांना लागली आहे.

७. कोटा फॅक्टरी सीझन २ :

 

 

टिव्हीएफने युट्यूबवर कोटा फॅक्टरीचा पहिला सीझन मोफत रिलीज केला आणि लोकांनी त्या सिरिजला दमदार प्रतिसाद दिला. त्याच जोरावर आता टीव्हीएफने नेटफ्लिक्सबरोबर एकत्र येऊन या सिरिजचा दुसरा सीझन करायचं ठरवलं.

आता कोटा फॅक्टरीचा दुसरा सीझनचीही लोकं आतुरतेने वाट बघतायत. एकंदरच एक वेगळा विषय आणि खासकरून तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने लोकांना ही सिरिज खूप आवडली.

८. लिटिल थिंग्ज सीझन ४ :

 

 

रिलेशनशीपबद्दल हलक्या फुलक्या पण प्रभावी शैलीत भाष्य करणाऱ्या या सिरिजचा फॅनबेसही बराच मोठा आहे.

आपल्या रोजच्या जीवनातले प्रॉब्लेम्स आणि सध्याच्या तरुण पिढीच्या लाईफस्टाइलचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या सिरिजमध्ये मिथीला पालकर, ध्रुव सहगल, अभिषेक भालेराव असे फ्रेश चेहेरे बघायला मिळतात.

या सिरिजचे ३ सीझन रिलीज झालेले असून चौथा सीझन लवकरच नेटफ्लिक्सवर येणार आहे.

९. Hush Hush :

 

 

महिलांना केंद्रस्थानी ठेवून अमेझॉन प्राइम एक नवी कोरी वेबसिरीज घेऊन येत आहे. सोहा अली खान, आयेशा झुलका, जुही चावला, करिश्मा तन्ना या मुख्य अभिनेत्री म्हणून तुम्हाला या सिरिजमध्ये दिसणार आहेत.

ही सिरिजही याच वर्षी येण्याची शक्यता आहे.

१०. कोड एम सीझन २ :

 

 

अल्ट बालाजी हा प्लॅटफॉर्म फक्त बोल्ड आणि न्यूड कंटेंटसाठी ओळखला जात असला तरी यावरही काही चांगल्या वेबसिरीज रिलीज होऊन गेल्या आहेत त्यातलीच एक कोड एम!

ही सिरिज आणि यातलं भारतीय आर्मीचं चित्रण आणि यातल्या मुख्य नायिकेची गोष्ट लोकांना फार आवडली आणि लोकांनी ती पसंतही केली. या सिरिजच्या पहिल्या सीझननंतरच लोकांना वाटलं होतं की याचा दुसरा सीझन नक्की येणार आणि यावर्षी याचा दुसरा सीझन येऊ शकतो.

यापैकी कोणत्या सिरिज तुमच्या आवडत्या आहेत? किंवा याव्यतिरिक्त तुमच्या आवडत्या आणखीन कोणत्या सिरिज यावर्षी येणार आहेत? हे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version