पहिल्या प्रेयसीला जळवण्यासाठी ‘काकाने’ आपल्या लग्नाची वरात तिच्या घराजवळून नेली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारताचा पहिला सुपरस्टार असणाऱ्या राजेश खन्ना आणि त्यांचे बॉलीवूडचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. बॉलीवूड सोबतच त्यांच्या वैयक्तिक जीवनातही अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. त्यांच्या फॅन्स असणाऱ्या अनेक मुलींनी त्यांच्या फोटोशीच लग्न केले होते, अनेकींनी आपल्या हातावर त्यांचे नाव कोरले होते.
तसेच त्या राजेश खन्नांना स्वतःच्या रक्ताने लिहिलेले प्रेम पत्र पाठवत असत. स्ट्रगलिंगच्या काळात राजेश खन्ना प्रोड्युसरकडे जाताना स्वतःच्या आलिशान गाडीतून जात असत ज्या गाड्या त्या काळच्या बॉलीवूड मधल्या हिरोंकडेही नसत. तसेच त्यांच्या मैत्रिणी आणि गर्लफ्रेंड्सचेही अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
राजेश खन्ना यांचा २९ डिसेंबर १९४२ सालचा अमृतसरचा जन्म. त्यांचं खरं नाव जतीन खन्ना, इंडस्ट्रीमध्ये आल्यावर त्यांनी ते बदललं. २४ व्या वर्षी ‘आखरी खत’ या चित्रपटामधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली परंतु तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.
१९७१ मध्ये आलेला ‘हाथी मेरे साथीने’ त्यांना यश मिळवून दिलं व या चित्रपटामुळे संपूर्ण भारतात त्यांची ओळख निर्माण झाली. आजही २ वर्षात १५ हिट चित्रपट देण्याचा रेकॉर्ड त्यांच्याच नावावर आहे.
त्यांचं डिम्पल कपाडियाशी लग्न होण्याआधी इंडस्ट्रीमधील अनेक नटींसोबत नाव जोडले गेले होते. ते इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा त्यांची पहिली गर्लफ्रेंड होती अंजु महेंद्रूू. डेहराडून मध्ये ११ जानेवारी १९४६ मध्ये जन्म झालेल्या अंजु आजही हिंदी टीव्ही सिरीयल मध्ये सासू किंवा आईचा रोल करतात.
ज्यावेळी अंजु इंडस्ट्रीमध्ये आल्या त्यावेळी त्या ऍक्टिंग आणि फॅशन डिझायनरचं काम करत असे. त्या जेव्हा स्ट्रगल करत होत्या तेव्हा राजेश खन्ना सुपरस्टार बनले होते परंतु या गोष्टीचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला नाही.
ते दोघ एकमेकांवर खूप प्रेम करत होते. १९६६ ते १९७२ या काळात ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.
पण बॉलीवूडच्या बाबतीत जी गोष्ट म्हंटली जाते तीच झाली कि इथे जसे पटकन रिलेशन बनतात तसेच ते लवकर तुटतातही. राजेश खन्ना आणि अंजु महेंद्रूू यांच्यात काही वर्षानंतर खटके उडण्यास सुरुवात झाली. जे एकेकाळी एकमेकांवर खूप प्रेम करत होते त्यांचेच एकमेकांवर आरोप करणे सुरु झाले.
एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण झाला. १९७१ मध्ये वेस्ट इंडियन क्रिकेटर गॅरी सोबर्स सोबत अंजु यांचे नाव जोडण्यात आले. त्याच वेळी अंजुच्या आईला तिने आणि राजेश यांनी लग्न करावे असे वाटत होते. राजेश यांनाही तसेच वाटत होते व ते अंजुला यासाठी अनेकदा विचारात होते. परंतु अंजु कायम नाही असेच उत्तर देत असत.
यातूनच राजेश यांनी १९७२ साली अंजु यांच्याशी नातं तोडलं. एका मुलाखतीत अंजु म्हणाल्या की राजेश त्यांच्या निर्णयांना कायम बदलत असत, त्यांनी कधी स्कर्ट घातला तर राजेश त्यांना म्हणत की तू साडी का नेसत नाहीस आणि कधी साडी नेसली तर तू कायम भारतीय नारी बनण्याचा का प्रयत्न करतेस?
अजून एका मुलाखतीत त्या असे म्हणाल्या कि राजेश यांच्या काही फ्लॉप्स चित्रपटांमुळे ते मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले होते. सततची चिडचिड, स्वभावात बदल होत असत. याच उलट राजेश खन्नांनी दिलेल्या मुलाखतीत ते असे म्हणाले की, ‘मी तिला वेळ देण्याचा प्रयत्न करत असे पण ती कायमच पार्ट्यांमध्ये व्यस्त असायची’.
–
हे ही वाचा – …म्हणून तेव्हाच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाने ‘सुपरस्टार काकाच्या’ कानाखाली लगावली!
–
ते असेही म्हणाले की मी जेव्हा चित्रपटांच्या शूटिंगनंतर दमून यायचो तेव्हा तिने लिहिलेली एक चिठी मिळायची, ज्यात लिहिलेलं असे की मी पार्टीसाठी गेली आहे. राजेश यांची इच्छा असे की ते जेव्हा दमून घरी येत आहेत तेव्हा त्यांना अंजु यांनी घरी असावे कारण त्यांना अंजु सोबत वेळ घालवावा असे वाटत असे.
अंजु यांनी एका मुलाखतीत म्हंटले होते कि मला आत्ताचा सुपरस्टार राजेश आवडत नाही पूर्वीचा जतीनच मला खूप आवडतो. तरीही मी त्याला खुश करण्यासाठी प्रयत्न करते.
मला मॉडेलिंग करणे खूप आवडते , त्यात मला खूप पैसेही मिळतात, पण राजेशला ते आवडत नाही आणि मी ते सोडावे अशी त्याची इच्छा होती मी त्याच्यासाठी तेही केले. नंतर त्याचे म्हणणे होते कि तू ऍक्टिंग करणं पण सोडलं पाहिजेस.
१९७३ मध्ये अंजु सोबत ब्रेक अप केल्यावर राजेश यांनी डिम्पल कपाडिया यांच्या बॉबी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्यांच्याशी लग्न केले. असे म्हंटले जाते की त्यांनी लग्नाची वरात जाणून बुजुन अंजु यांच्या घराजवळून नेली होती.
अंजु आणि राजेश १७ वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा अंजु त्यांच्या जवळ होत्या.
अंजु महेंद्र या त्यांच्या ऍक्टिंग, राजेश खन्नांसोबतच अफेअर या सोबतच त्यांच्या स्मोकिंग साठीही प्रसिद्ध आहेत. त्या वयाच्या ७२ व्या वर्षीही दिवसाला ४० कप चहा आणि ४० सिगरेट्स ओढतात आणि त्या दिवसभरात फक्त ४ तास झोपतात.
हा त्यांचा दिनक्रम अनेक वर्षांपासून चालू आहे. जेव्हा त्यांना विचारलं जात कि तुम्हाला त्रास होत नाही का तर त्यावर अंजु म्हणतात की त्या अनेक वर्षांपासून करत असल्यामुळे त्यांना त्रास होत नाही व याच कारणामुळे त्या फिट आहेत असे त्या म्हणतात.
यासोबतच त्या असेही म्हणाल्या होत्या की या सिगरेट ओढण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना काम करताना खूप ताकद मिळते, व खूप फ्रेश वाटते. त्यांच्यामते त्यांच्या फिट राहण्याच्या मागचं कारणही सिगरेट ओढणंच आहे.
सिगरेट ओढणे हे शरीरासाठी धोकादायक आहे पण हीच गोष्ट अंजु यांच्यासाठी फिट राहण्याचा मार्ग आहे हे ऐकून अनेकांना नवल वाटेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.