दलितांनी मुस्लिमांसोबत राहावं, हे सांगणाऱ्याला ३ वर्षांत पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार तर दिलेच आहेत त्याचबरोबरीने कर्तव्य देखील दिली आहेत. अधिकार गाजवण्यासाठी किंवा अधिकारावर गदा आली, की आपण लगेचच आवाज उठवायला लागतो मात्र आपली कर्तव्य बजावयाला आपण मागे पडत असतो.
मध्यंतरी देश राहण्यासाठी सुरक्षित नाही, अशी ओरड सिनेसृष्टीतील कलाकारांकडून होतं होती, मात्र अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या घटनांवर हीच कलाकार मंडळी मूग गिळून बसली आहेत.
आज राज्यघटनेने प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे की, कोणीही व्यक्ती देशातील कोणत्याही प्रदेशात जाऊन तिकडे वास्तव्य करू शकतो. देशाच्या फाळणीनंतर फार मोठ्या प्रमाणावर लोकांनी स्थलांतर केली आहेत. आताच्या पाकिस्तानमधील बहूसंख्य शीख समुदाय भारतात येऊन स्थायिक झाला.
भारतातील काही मुस्लिम समाज हा पाकिस्तानात निघून गेला तेव्हा दलित समाजाने सुद्धा तिकडे जावं यासाठी एक व्यक्ती आग्रही होता. कोण आहे तो माणूस चला तर मग जाणून घेऊयात…
भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठीची सुरवात खरं तर १८५७ नंतर सुरु झाली, मात्र त्याची प्रखरता १९०० हे शतकात दिसून आली. अनेक क्रांतिवीर, देशभक्त, विचारी लोकं याच काळात उदयास आली त्यातीलच हे जोगिनाथ मंडल.
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांच्या हक्कांसाठी लढायला सुरवात केली होती तर बंगालमध्ये जोगिनाथ यांनी अनुसूचित जातीजमातींसाठी लढत होते.
कोण होते जोगिनाथ मंडल :
सध्याच्या बांगलादेश म्हणून ओळख असेल्या राष्ट्रात एका दलित कुटुंबात जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना जातीसाठी संघर्ष करावा लागला होता.
राजकीय कारकीर्द :
आयुष्याच्या सुरवातीपासूनच संघर्ष माथी लिहिल्याने त्यांनी आपली वाट थेट राजकारणाकडे वळवली. अनुसूचित जातीजमातीचे नेते म्हणून त्यांनी काम करायला सुरवात केली.
मंडल यांनी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपद भूषवले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, मंडल हे आंबेडकरांचे कट्टर अनुयायी म्हणून ओळखले जात होते.
१९४६ साली तेव्हाच्या बॉम्बे विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरु होती. असं म्हंटल जातं की काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी असं ठरवले होते की आंबेडकरांना या निवडणुकीत विजयी होऊन द्यायचे नाही. म्हणून मंडल यांनी आंबेडकरांना बंगालमधून निवडूणुक लढवायचा सल्ला दिला.
डॉ. आंबेडकर बंगालच्या विधानसभेतून निवडून आले मात्र तेव्हा तिथे मुस्लिम लीगचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. मुस्लिम लीगच्या मदतीने ते जिंकून आले. याच दरम्यान मंडल यांचा मुस्लिम लीगशी जवळचा संबंध आला.
पाकिस्तानात कायदे मंत्री :
१९४७ साली भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. मुस्लिम लीगचा प्रभाव त्यांच्यावर प्रचंड असल्याने आंबेडकरांचा विरोध पत्करून मंडल यांनी थेट पाकिस्तानचा पर्याय निवडला. त्यांचं असं मत होतं, की दलित समाज हा नेहरू गांधींच्या देशापेक्षा जीनांच्या पाकिस्तानात जास्त सुरक्षित आहे.
दलित आणि मुस्लिम हे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती एक सारखे असल्याने दोन्ही समाजची परिस्थिती सुधारता येईल असा दृढ विश्वास त्यांना होता.
–
हे ही वाचा – पाकिस्तानचं संविधान लिहिणाऱ्याचा गूढ अंत ठरला पाकिस्तानच्या भविष्याचा कर्दनकाळ!
–
पाकिस्तानात गेल्यावर मात्र मंडळ यांच्या विश्वासाला चांगलंच तडा गेला. असं झालं, की पाकिस्तानात गेल्यावर तिकडचे ते कायदामंत्री बनले जे देशाचं सर्वोच पद म्हणून ओळखलं जात होत. अशा पदावर एक हिंदू बसला आहे जो खालच्या जातीतला आहे ही बाब अनेकांना खटकत होती.
कायदेमंत्री पदाची सूत्र हाती घेताच त्यांनी पाकिस्तानचे संविधान लिहले तसेच पाकिस्तानसाठी काही तत्वे मांडली, जसे की लोकशाही, स्वातंत्र्य, इस्लाम धर्मानुसार सर्व समानता मात्र या सर्व बाबी फक्त कागदोपत्रीच राहिल्या कारण त्यांच्याबद्दलचा तिरस्कार आणि दलित असल्याने साहजिकच मिळणारी वेगळी वागणूक यामुळे ते त्रस्त झाले होते.
एवढंच नव्हे आधीच फाळणीमध्ये मोठ्या प्रमाणवर हिंसाचार वाढला होता त्यातच पाकिस्तान हे वेगळे राष्ट्र झाल्यानंतर देखील तिथे हिंसाचार थांबला नव्हता. तिकडच्या मुस्लिमांनी अनेक दलितांना बाटवून मुस्लिम धर्मात आणले काहींच्या कत्तली देखील केल्या. याच भीतीने ते ३ वर्षांनंतर म्हणजे १९५० साली भारतात परतले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध का होता?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं असं म्हणणं होतं, की जरी मुस्लिम आणि दलित यांना भेदभावाचा, दुःखाचा, संकुचित वृत्तीचा सामना करावा लागला असला तरी हे दोघे एकत्र येऊ शकत नाहीत. मुळात इस्लाम हा भारताबाहेरच धर्म आहे ज्यात त्यांच्या अनुयायांची कट्टरता हे त्याचे प्रमुख कारण आहे.
बाबासाहेबांचा दृढ विश्वास इतका होता की ते पुढे म्हणाले होते की उद्याचा भारत हा पाकिस्तानपेक्षा सुरक्षित, चांगला आणि महत्वाचे म्हणजे तो पुरोगामी असेल, बाबासाहेबांची त्याकाळची भविष्यवाणी खरी ठरली.
आज बाबासाहेबांचे करोडो अनुयायी त्यांच्याच विचारसरणीवर पुढे जात आहेत, मात्र बाबासाहेबांच्या या अनुयाने तेव्हाच ऐकायला हवे होते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.