' तालिबानची तुलना हिंदुत्वाशी : वाचा नेमकं काय बरळली ड्रामा क्वीन स्वरा भास्कर. – InMarathi

तालिबानची तुलना हिंदुत्वाशी : वाचा नेमकं काय बरळली ड्रामा क्वीन स्वरा भास्कर.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तालिबानी लोकांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे सोशल मीडियावर सगळ्याच स्तरातले लोकं व्यक्त व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीची चित्र बघून बऱ्याच लोकांनी हळहळ व्यक्त केली, पण नंतर सोशल मीडिया ट्रेंडप्रमाणे यावरही बरेच विनोद फिरू लागले.

आपल्या देशाला असाहिष्णु म्हणणाऱ्या लोकांनी देश सोडून अफगाणिस्तानात जावे, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबद्दल गळे काढणाऱ्या लोकांनी अफगाणिस्तानात निघून जावे असे छोटे फतवेसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

 

aamir khan inmarathi

 

तालिबानी लोकांचे ऑफिसमधले जीममधले फोटोज व्हायरल होऊन त्यावर मीम्स शेअर केली जाऊ लागली. इस्राइल आणि पॅलेस्टीन मुद्द्यावर बोलणारी काही लोकं मात्र अफगाणिस्तानच्या या मुद्द्यावर मूग गिळून गप्प होती, आणि यात सहभागी होते ते सिनेमात काम करणारे सेलिब्रिटीज!

आपल्या सोयीनुसार हव्या त्या मुद्द्यावर व्यक्त होणाऱ्या बऱ्याच सेलिब्रिटीजनी या मुद्द्यावर भाष्य करायचं टाळलं. पण बॉलीवूडची सो कॉल्ड फेमीनिस्ट अभिनेत्री स्वरा भास्कर हिने पुन्हा एकदा तिच्या अकलेचे तारे तोडले आहेत.

 

swara bhaskar inmarathi

 

खरंतर अफगाणिस्तानच्या वादानंतर स्वराने व्यक्त व्हायला सुरुवात केली खरी पण नुकतंच तिने केलेल्या एका ट्विटवरुन #ArrestSwaraBhaskar हा ट्रेंड ट्विटरवर दिसू लागला.

या ट्विटमध्ये तिने तालिबानींची तुलना थेट हिंदुत्व आतंकवाद यांच्याशी केली असून. या ट्विटमध्ये तिने म्हंटलं आहे की “जसं तालिबानी टेरर हा भयावह आहे तसंच हिंदुत्व आतंकवाद ही गोष्टसुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. आपली मानवतावादी आणि नैतिक मूल्ये ही दडपशाहीच्या जोरावर अवलंबून नसावीत”

 

swara tweet inmarathi

 

स्वराच्या या ट्विटमुळे कित्येक लोकांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं असून तिला अटक व्हावी अशी मागणी होताना दिसत आहे, काहींनी तिला थेट अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी लोकांसोबत एन्जॉय कर असेही भोचक सल्ले दिले.

स्वराची वादग्रस्त ट्विट करायची ही काही पहिली वेळ नाही. CAA विरोधात प्रोटेस्ट करताना तिने देशाचे पंतप्रधान तसेच गृहमंत्री यांच्यावर बरंच तोंडसुख घेतलं होतं.  अनुराग कश्यपच्या कंपूमधली ही ड्रामा क्वीन देशातल्या प्रत्येक मुद्द्यावर व्यक्त होत असते आणि फार उलट सुलट प्रतिक्रिया देऊन चर्चेत राहते.

स्त्री-सशक्तीकरण असो किंवा एखादा राजकीय सामाजिक मुद्दा, स्वरा नेहमीच तिच्या खास शैलीत भडक वक्तव्य करते आणि यामुळेच तिची इमेज एक अॅक्टीव्हीस्ट म्हणून निर्माण झाली असून, ती अभिनयापेक्षा स्वतःच्या वादग्रस्त स्टेटमेंटसाठीच ओळखली जाते.

 

swara 2 inmarathi

 

एकंदरच फिल्म इंडस्ट्रीची ईको-सिस्टिमच अशा रीतीने काम करते हे आपल्याला काही नवीन नाही. हिंदुत्वावर कुणी कितीही उलट सुलट भाष्य केलं तरी काही लोक शांतपणे ते ऐकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात.

कदाचित म्हणूनच जगातल्या इतक्या सुरक्षित देशात बसूनही, नाव पैसे कमवून त्याच देशातल्या बहुतांश लोकांच्या धर्मावर हे सेलिब्रिटीज उघडपणे भाष्य करतात. बॉलीवूडचे कित्येक सेलिब्रिटीज याच पद्धतीने व्यक्त होतात.

स्वरा भास्कर, फरहान अख्तरपासून अनुराग कश्यप तापसी पन्नूपर्यन्त मोठमोठे सेलिब्रिटीजही या विषयावर भाष्य करतात आणि वादाच्या भोवऱ्यात अडकतात. बॉलीवूडचा हा दुटप्पी, पाखंडी चेहेरा आपल्याला नवा नाही. पण एखाद्या धर्माविषयी इतका तिरस्कार योग्य नाही.

 

swara bhaskar 2 inmarathi

 

ज्या धर्माचा आतंकवादाशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही, ज्या धर्माने साऱ्या जगाला शांतीचा संदेश दिला त्याच धर्माला काही मूठभर लोकं आतंकवादाशी जोडू पाहत असतील आणि ते देखील याच देशातले कलाकार असतील तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?