' चोरीची कथा असलेले हे सर्वोत्तम १० चित्रपट अजिबात चुकवू नका – InMarathi

चोरीची कथा असलेले हे सर्वोत्तम १० चित्रपट अजिबात चुकवू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

दहा माणसं एकत्र केली तर त्यातली किमान ८ माणसं तरी सिनेमाप्रेमी आढळतातच. सिनेमाचं वेड हे जवळपास प्रत्येकालाच असतं. रहस्य कथा, ऍडव्हेंचर, भयपट, प्रेमकथा असे अनेक प्रकार या सिनेमाचे आहेत.

या सगळ्या प्रकारांसोबत अजून एक प्रकार सिranनेमा प्रेमींना प्रचंड आवडतो तो म्हणजे चौर्यकथा अर्थात चोरीची कथा असलेला सिनेमा.

हँडसम नायक, मादक चाळे करणारी नायिका, हायटेक गॅजेट्स आणि प्रचंड वेगात घडणारी कथा हे सगळं प्रत्येकालाच आवडतं.

अशाच वेगवान चौर्यकथा आवडणाऱ्या सिने चाहत्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत काही खास सिनेमे जे पाहून तुम्ही म्हणाल क्या बात है बॉस…

==

हे ही वाचा : चक्क हॉलिवूडने केला आहे ह्या ७ भारतीय चित्रपटांचा रिमेक… वाचा!

==

१. RESERVOIR DOGS

एकमेकांना अनोळखी असलेल्या सहा अट्टल गुन्हेगारांना एक माणूस एकत्र आणतो आणि त्यांची टोळी बनवतो.

टोळीचा उद्देश असतो एक हिऱ्याची चोरी. ही चोरी नीट व्हावी म्हणून प्रत्येकाची नावं सुद्धा खोटी ठरवली जातात. प्रत्येकाची खरी ओळख एकमेकांपासून लपवली जाते.

 

 

प्रत्येक जण ही चोरी यशस्वी व्हावी म्हणून झटत असतो. पण चोरीच्या वेळी नेमके पोलीस येतात. पुढे काय होतं? चोरी यशस्वी होते? त्यासाठी सिनेमा पाहिलेला उत्तम. हॉलिवूडचा प्रतिथयश असा दिग्दर्शक क्वान्टिन टेरेन्टीनोने ही फिल्म बनवली आहे.

गुन्हेगारी पद्धतीच्या सिनेमावर क्वान्टिनचा असलेला हातखंडा इथेही ठळकपणे आढळतो. चित्रपटाची वेगवान पटकथा आणि त्याला उत्तम साथ देणारं संगीत या सिनेमाच्या उजव्या बाजू आहेत.

हार्वे कीथ, टीम रॉथ आणि मायकल मॅडिसन सारख्या उत्तम कलाकारांचा अभिनय आणि क्वान्टिनची कथा यासाठी हा सिनेमा नक्की बघावा.

२. HEAT

१९९५ साली आलेला हा सिनेमा म्हणजे सिनेप्रेमींसाठी एक मेजवानी म्हणता येईल. एक तर सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक मायकेल मन हा आहे आणि दुसरं म्हणजे सिनेमाची स्टारकास्ट.

 

Heat-inmarathi

 

अल पचिनो आणि रॉबर्ट दि नेरो सारख्या प्रचंड प्रतिभावान कलाकारांचा अभिनय या सिनेमाला चार चांद लावतोच.

व्यावसायिक चोरी करणाऱ्या टोळीचा पाठलाग पोलीस करू लागतात. इतकी साधी कथा असलेला हा सिनेमा मात्र प्रचंड उत्कंठा वाढवतो.

 

३. OCEAN’S ELEVEN

२००१ साली स्टीवन सोडरबर्ग एक खतरनाक कथा घेऊन आला. ब्रॅड पिट, ज्युलिया रॉबर्ट्स सारखे कसलेले कलाकार आणि तितकीच अप्रतिम कथा आणि उत्तम संगीत याचा मिलाफ म्हणजे ही फिल्म.

 

oceans-11-inmarathi

 

जॉर्ज क्लुनीने साकारलेला डॅनी ओशन त्याच्या अकरा साथीदारांना घेऊन एक धाडसी योजना बनवतो. एका रात्रीत १५० मिलिअन्स कमावून प्रचंड श्रीमंत होण्याची ही योजना असते. लास वेगास मधले तीन मोठे कॅसिनो चोरायची ही योजना असते.

पण ते या योजनेत सहभागी होतात का? हे सिनेमातच पाहिलेलं उत्तम.

४. NOW YOU SEE ME

चोरीवर बेतलेल्या सिनेमांची गोष्ट चालू आहे आणि या सिनेमाचा उल्लेख आला नाही तर मग काय फायदा? खरंतर २ भागांची ही शृंखला चोरीच्या कथेवरच बेतलेली आहे. पण त्यातला पहिला सिनेमा दुसऱ्यापेक्षा थोडा अधिक चांगला आहे.

 

now-you-see-me-inmarathi

 

मॉर्गन फ्रीमन, ईस्ला फिशर, वूडी हरसन सारखे मातब्बर कलाकार आणि वेगवान कथा यामुळे हा सिनेमा लक्षात राहतो. आवडतो.

जादू आणि चोरी असा दोन उत्कंठा वाढवणाऱ्या गोष्टींचा मिलाफ बघायचा असेल तर मात्र ही फिल्म तुमच्याचसाठी आहे.

 

५. FAST AND FURIOUS SERIES

प्रचंड वेग असणाऱ्या गाड्या आणि तितक्याच वेगानं घडणारी कथा असं डेडली मिश्रण म्हणजे ही सिरीज होय. या सिरीजचे जगभरात लाखो चाहते आहेत. विन डिझेल, पॉल वॉकर सारखे उत्तम कलाकार ही सिरीज वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवतात.

 

faf-inmarathi

 

यात सुद्धा अनेक भागात चोरी हाच मुख्य धागा आहे. विशेषत: पाचवा भाग. ही सिरीज बघितली नसेल तर जरूर बघा.

 

६. THE ITALIAN JOB

कित्येक सिनेमा चाहत्यांनी हा सिनेमा बघूनच अशा प्रकारचे सिनेमे पाहण्याची सुरुवात केली असेल यात शंका नाही.

 

the-italian-job-inmarathi

 

व्हेनिसमधून जवळपास ३५ मिलियन इतक्या किमतीच्या सोन्याची चोरी करण्याची योजना सिनेमाचा नायक डोनाल्ड सदरलँड आणि त्याची टीम बनवते. या चोरीत ते यशस्वी होतात का नाही हा प्रवास हा सिनेमा घडवतो.

आतापर्यंत चोरीवर तयार झालेल्या सर्वोत्तम सिनेमांपैकी हा सिनेमा एक आहे हे मात्र नक्की. अभिषेक बच्चन-सोनम कपूरचा ‘प्लेयर्स ‘ हा सिनेमा याच फिल्मचा अधिकृत रिमेक होता हे बऱ्याच जणांना ठाऊक नसेल.

==

हे ही वाचा : “परफेक्शन” ची व्याख्या ठरवू शकणारे हे १५ इंग्रजी चित्रपट बघायलाच हवेत…!

==

७. THE SCORE

फ्रॅंक ओज आज आपण ज्याला स्टार वॉर्सचा अभिनेता म्हणून ओळखतो त्याने २००१ साली मार्लन ब्रँडो, रॉबर्ट दि’नेरो आणि एडवर्ड नॉर्टन सारखे कसलेले कलाकारा घेऊन एक सिनेमा आणला ‘द स्कोर’.

 

The_Score-inmarathi

 

एक म्हातारा झालेला चोर, ज्याने आयुष्यात अनेक चोऱ्या करून बरीच माया जमवली आहे. तो आता निवृत्त होऊन शांतपणे आयुष्य जगायचे प्लानिंग करतोय. त्यात त्याला एक तरुण येऊन आयुष्यातली शेवटची चोरी करायला उद्युक्त करतो.

सिनेमाची कथा-पटकथा यासाठी तर हा सिनेमा पहावाच पण यात अभिनयातल्या तीन पिढ्यांनी काम केलय ते काम बघण्यासाठी नक्की बघावा.

 

८. ENTRAPMENT

१९९९ साली आलेल्या उत्तम सिनेमांमधला एक म्हणून या सिनेमाची गणती होते. उत्तमोत्तम चित्र किंवा कलाकृती चोरणा-यावर लक्ष ठेवण्याची एका इन्शुरन्स एजन्टची नियुक्ती होते. कथा काही अर्थी साधी काही अर्थी प्रचंड गुंतागुंतीची आहे.

 

entrapment-inmarathi

 

जेम्स बॉण्ड म्हणून ओळखला जाणारा शॉन कॉनरी, कॅथरीन झेटा आणि विलिअम पॅटन सारख्या स्टार्स कास्टला घेऊन जॉन एमिलने बनवलेला हा सिनेमा आपल्या पसंतीस मात्र नक्की उतरतो.

 

९. TAKERS

जॉन लुसेनहॉप हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्यानं पॉल वॉकर, ख्रिस ब्राउन आणि मॅट डिलों असे तगडे कलाकार घेऊन एक उत्तम रॉबरी फिल्म बनवली आहे.

पाच चोरांचा समूह आपली लेटेस्ट चोरी यशस्वी करून आरामात दिवस काढत असतो. त्यांचा एक साथीदार २० मिलियन घेऊन जाणारी गाडी लुटायचा प्लॅन करतो आणि सिनेमाची सुरुवात होते. त्यात हा ग्रुप यशस्वी होतो का? त्यासाठी सिनेमा बघायला हवा.

 

takers-inmarathi

 

आतापर्यंत आलेल्या या सदरातल्या उत्तम सिनेमांपैकी हा एक आहे यात शंका नाहीच.

 

१०. स्पेशल २६

इतकं सगळं सांगितलं आणि त्यात एकही देसी फिल्म नाही सांगितली तर मात्र चाहते आम्हाला सोडणार नाहीत. खरंतर भारतात अनेक फिल्म या विषयावर झाल्या आहेत.

 

special-26-inmarathi

==

हे ही वाचा : राजकारणाचा क्रॅश कोर्स आणि बाराखडी… सगळं काही आहे या १२ चित्रपटांमध्ये!

==

देवानंदच्या काळापासून ते धर्मेंद्रच्या शालिमार कडून अभिषेकच्या प्लेयर्स पर्यंत अनेक सिनेमे येऊन गेले. पण त्यात बाजी मारतो तो अक्षय कुमारचा स्पेशल २६. या सिनेमाची कथा आम्ही सांगणार नाही. इतकं सांगितल्यावर तुम्ही पण काहीतरी शोधाच की.

पण हा सिनेमा तुमचा वेळ वाया घालवत नाही हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. तगडे स्टारकास्ट, उत्तम संगीत आणि तितक्याच ताकदीची कथा ही या सिनेमाची बलस्थानं आहेत.

तर मग लिस्ट तर आम्ही दिली आहेच. तुम्ही ती बघा आणि चित्रपटांबाबतचे रिव्ह्यू आम्हाला कळवाच. शिवाय यात कोणते सिनेमे राहिलेत ते ही सांगा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?