' अब्दुल कलामांचे हे १५ विचार म्हणजे मनाला उमेद देणारं प्रभावी औषध! नक्की वाचा… – InMarathi

अब्दुल कलामांचे हे १५ विचार म्हणजे मनाला उमेद देणारं प्रभावी औषध! नक्की वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नैराश्य, हे वाळवी सारखे असते. एकदा का नैराश्याची वाळवी माणसाच्या मनाला लागली, की त्याला आतून कसे आणि कधी पोखरून टाकते हे आपल्याला कळतही नाही.

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात नैराश्य तर आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहे. स्वतःला हवा तसा वेळ न देऊ शकणे, परिस्थितीमुळे मनाला आवडत नसलेले काम करावे लागणे, वाढलेली महागाई, जगात होत असलेली उलथापालथ या सगळ्यामुळे सगळीकडे नकारात्मकता पसरली आहे.

 

frustrated women inmarathi

 

अशात आपल्याला उठून उभे राहणे गरजेचेच असते, कारण आपल्यावर जबाबदाऱ्याच तितक्या असतात. आणि हेच जाणून आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय योजना करू लागतो. त्यातीलच एक उपाय आहे वाचन. तुम्हीही जर वाचकांच्या रांगेत बसत असाल तर तुम्ही ए. पी. जे अब्दुल कलाम नक्कीच वाचले असतील!

आपल्या देशाचे “मिसाईल मॅन”, सर्वोत्कृष्ट आणि सगळ्यात लोकप्रिय राष्ट्रपती असलेली व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात किती कठोर परिश्रम करून, हालाखीचे जीवन जागून त्यातून मार्ग काढून तिथपर्यंत पोहोचली आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी, जे वाचक नसतील त्यांनी सुद्धा कलाम वाचायला हवेत.

 

abdul kalam 3 InMarathi

 

जीवनाचा खरा अर्थ, आजकाल ज्याचे फॅड आले आहे ते “मिनीमॅलिझम” खऱ्या अर्थाने काय असते, हार ना मानता परत उठून कसे उभे राहावे हे सगळे कलाम आपल्याला शिकवू शकतात.

एखाद्या माणसाच्या डोळ्यावरील झापडं काढून त्याला खडबडून जागे करण्याची ताकद त्यांच्यात आहे. कलाम जग सोडून गेले असले, तरी त्यांचे विचार हे अजरामर झाले असून ते सतत आपल्याला प्रेरित करतीलच. आजचा हा लेख, तुमच्या पर्यंत कलामांचे विचार पोहचवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.

 

apj abdul kalam-inmarathi
abdulkalam.com

 

१. आपल्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या युद्धात जर तुम्ही पराभूत झालात तर “पहिला विजय हा केवळ एक योगायोग होता” अनेक लोक हेच म्हणण्याच्या तयारीत असतात.

२. कोणतेही ध्येय यशस्वीपणे गाठायचे असेल तर त्या ध्येयाशी तुमची कमालीची एकनिष्ठता असावी लागते, सगळे प्रयत्न त्या एकाच दिशेने वळवावे लागतात.

 

target inmarathi
grin.co

हे ही वाचा – पाणी सुद्धा विकलं जाऊ शकतं, हे या माणसाने ‘भन्नाट मार्केटिंग’मधून दाखवून दिलं…

३. आयुष्यात कधीही तुम्ही अपयशी म्हणजे FAIL झालात तर हार मानू नका, कारण FAIL या शब्दाचा अर्थ “FIRST ATTEMPT IN LEARNING” असा होतो.

४. आपल्या सगळ्यांकडे सारखेच टॅलेंट नसते आणि ते असणे आवश्यकही नसते, पण आपल्या सगळ्यांकडे ते टॅलेंट जोपासून, त्याला वाढवण्याच्या संधी मात्र सारख्याच असतात.

 

talent inmarathi
cio.com

 

५. तत्परता बाळगा! जबाबदाऱ्या स्वीकारा! कारण तुम्ही जर हे सगळे डावलत असाल तर याचाच अर्थ तुम्ही आपल्या नशिबाचा घास स्वतःहून दुसऱ्याच्या ताटात टाकता आहात असा होतो.

६. आपण आपले भविष्य तर बदलू शकत नाही, पण वर्तमान काळातील आपल्या सवयी नक्कीच बदलू शकतो. आणि पुढे याच सवयी आपले भविष्य बदलण्याची ताकद बाळगतात. त्यामुळे आजच आपल्या सवयी बदला.

७. दुसऱ्याला पराभूत करणे तर फार सोपे आहे. कठीण तर दुसऱ्याचे मन जिंकणे आहे.

 

friends inmarathi

 

८. “तुम्हाला सुर्यासारखं तेजस्वी होऊन लख्ख चमकायचे असेल तर आधी त्यासारखे जळावेही लागेल.” त्यामुळे कधीच आपल्या परिश्रमांना डावलू नका.

९. तुमची शेवटची चूक ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु असते.

 

learn from your mistakes inmarathi
thriveglobal.com

 

१०. आपल्या पुढच्या पिढ्यांचे जीवन सुखकर बनवण्यासाठी आपल्याला आज अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल, त्यासाठी झिजावे लागेल.

११. आकाशाकडे बघा, आपण एकटे नाही आहोत. आपल्यासोबत पूर्ण निसर्ग आणि ब्रह्मांड आहे. जी व्यक्ती कष्ट करून, खऱ्या आणि निर्मळ मनाने निसर्गाला काही मागेल तिच्या परिश्रमाचे फळ निसर्ग तिला नक्की देतं.

१२. तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला आधी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघून त्यावर काम करावे लागेल.

 

dreams inmarathi
gamesradar.com

 

१३. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही हार मानून तिला आपल्याला हरवू द्यायचे नाही, सतत लढून तिच्यावर विजय मिळवायचाच.

१४. नेहमीच मोठे स्वप्न बघावे, कारण लहान स्वप्न बघणे हे संकुचित मनोवृत्तीचे प्रतीक असून तो माझ्या दृष्टीने एक गुन्हा आहे.

१५. अध्यापन हे अत्यंत थोर आणि उदात्त क्षेत्र आहे. कारण एक शिक्षक फक्त पोटासाठी नोकरी करत नसून एक राष्ट्र चालवणारी पिढी निर्माण करत असतो.

 

virus 3 idiots inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?