' नान, कोल्ड्रिंक… हे १० पदार्थ ‘शाकाहारी’ असतीलच असं नाही; खात्री करून मगंच खा – InMarathi

नान, कोल्ड्रिंक… हे १० पदार्थ ‘शाकाहारी’ असतीलच असं नाही; खात्री करून मगंच खा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

ग्लोबलायजेशनमुळे संस्कृतीच्या देवाणघेवाणी बरोबर व्यवसाय, राहणीमान आणि खाण्या – पिण्याच्या पदार्थांचं सुद्धा आदान प्रदान झालं. आपल्याकडे मुळात जे अन्न आपण आधीपासून खात आलो आहोत, त्याबद्दल आपल्याला इत्यंभूत माहिती असते.

जे पदार्थ परदेशांतून आपल्याकडे आले आणि आपल्याच अन्नाचा एक अनन्य साधारण भाग बनून गेले, ते कसे बनतात, याबद्दल आपल्याला काहीच माहित नसतं. कधी कधी असंही होतं, की मुळात शाकाहारी असणारा पदार्थ हॉटेलमध्ये बनवताना, तो चांगला चविष्ट बनावा, म्हणून त्यात मांसाहारी घटक मिसळले जातात.

खायला जरी ते पदार्थ चांगले लागत असले, तरी ते शाकाहारी आहेत की त्यात मांसाहाराचा काही संबंध येतो हे सुद्धा आपल्याला माहित नसतं.

 

cakes inmarathi

 

असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांना आपण शाकाहारी समजून आवडीने खातो पण ते पदार्थ चक्क मांसाहारी पदार्थांच्या कॅटेगरीमध्ये मोडले जातात. हे आपल्याला ठाऊक आहे का?

शाकाहारालाच आपलं जीवन मानणाऱ्या लोकांसाठी हा लेख अत्यंत महत्वाचा आहे, कारण आजचा लेखात आपण आपल्या आवडत्या पदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत . त्यामुळे नक्की वाचा.

हे पदार्थ नक्की शाकाहारीच आहेत, ना त्याची खातरजमा करायलाच हवी…

१. नान

ही आवडती पंजाबी ‘पोळी’, आपण छानपैकी मस्का मारून, मोठ्या चवीने खातो. पण नान बनवताना, ते कडक होऊ नयेत म्हणून पीठ भिजवतानाच त्यात अंडी मिसळली जातात.

 

naan inmarathi

 

अंड्याने नान बराचवेळ मऊ राहू शकते. ही पद्धत सगळ्या हॉटेल्समध्ये वापरण्यात येत नसेलही, पण तुम्ही जर अंडी खात नसाल, तर एकदा नानमध्ये अंडी आहेत की नाही, याची पुष्टी करून घ्या.

२. चीज

पिझ्झ्यामुळे चीज आज घराघरात पोचलंय. सगळ्यांनाच चीज प्रचंड आवडतं. पण सगळ्याच शाकाहारी चीज प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. चीजच्या काही प्रकारांमध्ये, ते घट्ट ठेवण्यासाठी, त्याला व्यवस्थित बाईंडिंग येण्यासाठी गाय किंवा म्हशीच्या बछड्यांच्या आतड्यांमधला एक घटक त्यात मिसळला जातो.

या घटकाला “रेनेट (Rennet)” म्हणतात. त्यामुळे चीज विकत घेताना, आपल्या चीजच्या पॅकवर दिलेले घटक नक्की तपासून घ्या.

 

cheese inmarathi

 

३. सॅलड ड्रेसिंग्स

हेल्थ कॉन्शस लोक, आपल्या बोरिंग सॅलडला चविष्ट बनवण्यासाठी त्यात वेगवेगळ्या प्रकारचे इतर घटक मिसळून खातात. पण, काही सॅलड ड्रेसिंग्समध्ये अंडी असतात.

 

salad dressings inmarathi

 

त्यामुळे, कोणत्याही प्रकारचं सॅलड ड्रेसिंग घेताना त्यात कोणते कोणते घटक आहेत याचा नीट अभ्यास करून घ्या.

===

हे ही वाचा – बारीक होण्यासाठी मांसाहार सोडताय, पण तरीही वजन वाढू शकतं! म्हणून या चुका टाळा

===

४. व्हाईट शुगर अर्थात साखर…

‘गोड’ हे आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा अतिशय महत्वाचा भाग असतो. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगांवर आपण गोडानेच तो आपण साजरा करतो, सणावारांना सुद्धा गोडाचा नैवेद्य असतो.

हे सगळे पदार्थ गुळापासून बनवणार असाल तर काहीच हरकत नाही, पण जर त्यात आपली रिफाइंड व्हाइट शुगर, म्हणजे साखर वापरणार असाल तर खबरदार!!

ही साखर आणखी पांढरी होण्यासाठी तिला प्राण्यांच्या हाडांपासून बनवण्यात येणाऱ्या, बोन चार (bone char) ने कोटिंग आणि पॉलिश करून पांढरी बनवतात.

 

sugar featured

 

५. सॉफ्ट ड्रिंक्स

सॉफ्ट ड्रिंक्स ना थोडं घट्ट बनवण्यासाठी, त्यांना टेक्श्चर देण्यासाठी त्यात जिलेटीन मिसळलं जातं. जिलेटीन प्राण्यांची हाडं, मांस, लिगामेंट्स, टेंडोंस यांना पाण्यात उकळून बनवलं जातं.

हेच जिलेटीन आपल्या सॉफ्टड्रिंक्समध्ये वापरतात त्यामुळे शुद्ध शाकाहारी असाल, तर सॉफ्ट ड्रिंक्स प्यावीत की नाही हे तुम्हीच ठरवा.

 

soft drinks inmarathi

 

६. ऑरेंज ज्यूस

पाकिटात मिळणारा, कृत्रिम संत्र्याचा ज्यूस; ज्यामध्ये ओमेगा ३ साठी, कॉर्ड लिव्हर ऑइलचा वापर केला जातो.

सगळ्या पाकिटातून मिळणाऱ्या ऑरेंज ज्यूसमध्ये हे घटक असतीलच असं नाही, मात्र आपण नेहमीच सजग राहून पाकिटावरील घटक पाहून वस्तू विकत घ्यायला हवी.

 

cord lever oil inmarathi

 

७. चॉकलेट

डार्क आणि मिल्क चॉकलेट हे दोन प्रकार सगळ्यांचेच अत्यंत प्रिय असतात. मिठाईची उणीव भरून काढणारं चॉकलेट डिप्रेशन घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरतं. पण काही चॉकलेट कंपन्या त्यांचं चॉकलेट घट्ट ठेवण्यासाठी त्यात रेनेट मिसळतात.

 

dark chocolate inmarathi

 

८. चुईंग गम (chewing gum)

आपल्या सगळ्यांनाच हे ठाऊक आहे, की चुईंग गम्समध्ये जिलेटीन असते, जे प्राण्यांच्या अनेक अवयवांना पाण्यात उकळून बनवले जाते. काही चुईंग गममध्ये वापरले जाणारे जिलेटीन, हे गाय आणि डुकराच्या अवायवांपासून बनवलेले असते.

 

chewing gum inmarathi

 

९. रेडी मेड केक मिक्स

आपण सगळेच कधी ना कधी घरी केक बनवतो. हल्ली पाकिटात मिळणाऱ्या रेडी केक मिक्समुळे आपलं काम अगदी सोप्प होतं. आपण शाकाहारी असलो, तर आपण एग लेस (eggless) केक मिक्स विकत घेतो. पण केकमध्ये फक्त अंडी हाच एकमेव मांसाहारी पदार्थ नसतो.

अनेक केक मिक्समध्ये, डुकरांचे फॅट्स असतात त्यामुळे ते बॅटर मऊ होतं, आणि केक छान फ्लफी आणि स्पॉंजी होतो.

 

cake baking inmarathi1

===

हे ही वाचा – उपवासाला खाल्ला जाणारा साबुदाणा शाकाहारी आहे का? जाणून घ्या!

===

१०. व्हॅनिला आईसक्रीम

आईसक्रीममधला व्हॅनिला हा फ्लेवर खूप लोकांचा अतिशय आवडीचा असतो. हा प्लेन फ्लेवर असून, त्यावर आपण आपल्या आवडीच्या फ्लेवरचं सिरप घेऊन नवा फ्लेवर बनवू शकतो.

 

vanilla ice cream inmarathi

 

या व्हॅनिला आईसक्रीमचा बेस, म्हणजे व्हॅनिला फ्लेवर हा ऊदबिलाव या प्राण्याच्या बॉडी पार्ट्सपासून बनवला जातो. या घटकाला “कॅस्‍टोरम” म्हणतात. हे कॅस्‍टोरम शरीरासाठी घातक नसल्याने, त्याला कोणत्याही पाकिटावरील कंटेंट लिस्टमध्ये नमूद करण्याची काही गरज नाही असं FDA चं म्हणणं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?