' आधी अळी, आता बीफ?… कॅडबरी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! जाणून घ्या – InMarathi

आधी अळी, आता बीफ?… कॅडबरी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘कुछ मिठा हो जाये’, असं म्हंटल्यावर आपल्याला डोळ्यासमोर येते ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी कॅडबरी. अगदी सण उत्सव असो किंवा आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला खुश करणारी गोष्ट म्हणजे कॅडबरी!

मूळची युकेची मोंडेलेझ नावाची ही कंपनी गेली अनेक वर्ष आपल्या सगळ्यांचे तोंड गोड करत आहे. आज कॅडबरीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आढळून येत आहे. चॉकलेट खाणं हे केवळ श्रीमंताच लक्षण असं पूर्वी म्हंटल जायचं मात्र कॅडबरीने या सगळ्याला छेद देत अवघा ५ रुपयापासून ते १००,२०० पर्यंत  कॅडबरी मिळते.

 

cadbury inmarathi

 

कॅडबरी जितकी फेमस आहे तितकीच ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे असेही दिसून आले आहे. मॅगी मध्ये जशी शिसे आढळून आली होती त्याच पद्धतीने आता कॅडबरीमध्ये चक्क बीफ आढळून आले आहे. नक्की काय आहे भानगड चला तर मग जाणून घेऊयात…

 

hot maggi

 

नेमकी भानगड काय?

आज कोणतीही घटना असो त्याची चर्चा लगेच सोशल मिडीयावर होत असते. आज अनेक कंपन्यांना देखील आपली ब्रँड इमेज बनवण्यासाठी तसेच ग्राहकांच्या आवडानिवडी जाणून घेण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय रहावेच लागते.

 

cadbury 1 inmarathi

 

गेल्या काही दिवसात ट्विटरवर एक स्क्रीनशॉट फिरत होता ज्यात असा उल्लेख होता की कॅडबरी मध्ये जिलेटीन हा घटक वापरला जातो जो गोमांसामधून काढला आहे.

 

cadbury inmarathi

 

गोमांसावरून आधीच देशात अनेक घटना घडल्या आहेत, अनेक राज्यात गोमांसावर बंदी आहे. तरी सुद्धा अवैधरित्या गोमांसाची तस्करी केली जात आहेच. गायीला हिंदू धर्मात महत्वाचे मानले जाते, तिच्या पोटात ३३ कोटी देव असतात अशी समजूत असल्याने साहजिकच हिंदू लोक या कॅडबरी बहिष्कार तर घालणारच.

 

कंपनीचं काय म्हणणं? 

जेव्हा सोशल मीडियावर लगेच या स्क्रीनशॉटवरून उलट सुलट चर्चात होऊ लागली, boy cut cadbury असे नवे हॅशटॅग ट्रेंड सुद्धा सुरु झाले. कंपनी पर्यंत हे प्रकरण पोहचल्यानंतर लगेच कंपनीने आपले स्पष्टीकरण आपल्या अधिकृत ट्विटरवर अकाउंटवरून दिले.

 

cadbury 2 inmarathi

 

ज्यात कंपनीचं म्हणणं आहे की, सोशल मीडियावर फिरणारा स्क्रीनशॉट हा आमच्या कंपनीशी संबंधित नाही, कंपनी ज्या वस्तू उत्पादित करते त्या संपूर्णपणे (१००%) शाकाहारी आहेत. कॅडबरीच्या रॅपरवर असणारा ग्रीन डॉट हेच दर्शवतो.

कंपनीने पुढे असेही नमूद केले की कोणत्याही नकारात्मक बातम्यांनी ग्राहकांचा त्या वस्तूवरचा विश्वास निघून जातो त्यामुले यापुढे वास्तूच्या बाबती येणाऱ्या कोणत्याur बातम्या आधी तपासून पहा आणि मगच त्या शेअर करा.

काही वर्षांपूर्वी कॅडबरीमध्ये अळ्या आढळून आल्या होत्या ऐन दिवाळीच्या तोंडावर हे प्रकरण घडल्याने कंपनीला त्याचा जबरदस्त फटका बसला होता. कंपनी तेव्हा देखील लगेच त्यावर स्पष्टीकरण दिले होते की रिटेलरच्या खराब स्टोरेजमुळे त्यात अळ्या निघाल्या. 

 

brand rivalary inmarathi

हे ही वाचा – जेव्हा खुद्द जेम्स बॉण्ड ‘कॅडबरी इंडियावर’ चोरीची केस ठोकतो…!

आज कॉर्पोरेट जगात रोजच चढाओढीची स्पर्धा असतेच, आपले उत्पादन इतरांपेक्षा कसे वेगळे आहे हे दाखवण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. आकर्षक जाहिराती, प्रसिद्ध नामंकित चेहरे ब्रँड अम्बसेडर म्हणू घेणे, याने वस्तूची बाजारात हवा होते.

आज कॅबडबरी सारख्या कंपनीची मार्केट मध्ये ७०% पर्यंत शेअर आहेत, त्यामुळे खाद्यउत्पादन क्षेत्रात आज त्यांचा दबदबा आहेच. तो दबदबा बहुदा कमी करण्यासाठी स्पर्धक देखील काही कुरघोडी करत असतील अशी शक्यता सुद्धा दर्शवते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?