आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
आपल्या भारतीय संस्कृतीत एक शिष्टाचार आहे जो सगळेच पाळतात, तो म्हणजे दिवंगत व्यक्तींबद्दल शक्यतो वाईट किंवा चुकीचं बोलू नये. पण ‘ज्येष्ठ’ अभिनेते नसिरुद्दीन शाह त्याला अपवाद आहेत.
नुकतंच त्यांनी दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्याविषयी एक विचित्र टिप्पणी केलेली आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली, प्रत्येकजण सोशल मीडियावर व्यक्त झाला, तसंच नसिर यांनीसुद्ध त्यांचे विचार एका आर्टिकलच्या माध्यमातून मांडले ते लोकांना न पटणारेच आहेत.
या आर्टिकलमध्ये नासिर यांनी दिलीप कुमार यांच्या अभिनय क्षमतेवर सवाल केला असून त्यांचा अभिनय हा कॉपी करण्यालायक होता का इथवर नासिर यांची मजल गेली आहे.
यामध्ये ते असं म्हणतात, की दिलीप कुमार यांची नक्कल बऱ्याच लोकांनी केली, पण त्यांनी कधीच स्वतःला त्या साच्यात बसवलं नाही, दिलीप साहेब यांची तारीफ करून ते पुढे म्हणाले की, अभिनय आणि काही समाजिक कार्य वगळता त्यांचं इतर कोणत्याच बाबतीत योगदान नव्हतं!
यावर पुढे प्रकाश टाकत त्यांनी दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत काही गोष्टी स्पष्ट केल्या. नासिर म्हणतात की “दिलीप कुमार यांनी कधीच त्यांचे अनुभव इतरांशी शेअर केले नाही, ७० च्या दशकापर्यंत त्यांनी कोणत्याही नवोदित अभिनेत्यासाठी मोलाचे धडे दिले नाहीत.”
पुढे नासिर असंही म्हणतात की “दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयाचं गणित किंवा इतर तांत्रिक गोष्टींची इतरांशी चर्चा कधीच केली नाही, त्यामुळे खरंतर खूप अभिनेत्यांना त्याचा फायदा झाला असता पण दिलीप साब यांनी तसं काहीच नाही केलं”!
खरंतर या सगळ्या टिप्पणीमुळे सिनेप्रेमी आणि दिलीप कुमार यांचे चाहते निराश झाले आहेत, सोशल मीडियावर पुन्हा एकदा नासिर यांची वेडसर वक्तव्य शेअर केली जात आहेत.
मला वैयक्तिकदृष्ट्या नसिरुद्दीन शहा हे एक उत्कृष्ट अभिनेता म्हणूनच आवडतात, बाकी नसिर यांना कुठे काय बोलायचं भान नाही हे मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण ते जगजाहीर आहेच.
याच नसिर साहेबांनी एकदा खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांची आलोचना करताना दिलीप कुमार कसे ग्रेट अभिनेते आहेत याची उदाहरणं दिली होती. नासिर साब यांनी एकेकाळी उधळलेली मुक्ताफळं बघूयात तरी काय आहेत, ते म्हणतात की –
“दिलीप कुमार हे सदैव लोकांच्या स्मरणात राहतील ते फक्त त्यांच्या अभिनय क्षेत्रातल्या योगदानामुळे, अमिताभ बच्चन नव्हे! अमिताभ बच्चन मोठे झाले कारण त्यांनी योग्य सिनेमे निवडले, मी आजही शोले या सिनेमाला ग्रेट म्हणणार नाही!”
इतक्या मोठ्या कलाकृतीबद्दल आणि या शतकातल्या एका महानायकाबद्दल टिप्पणी करताना नसिर यांनी दिलीप कुमार यांच्या अभिनयाच्या कुबड्या घेतल्या होत्या पण आता ते याच दिलीप कुमारच्या तक्रारी आपल्या लेखातून मांडताना दिसून येतात!
यावरून समजतं की हा माणूस स्वतःच कीती गोंधळलेला आहे ते!
असो, नसिरुद्दीन यांची ही मुक्ताफळं उधळायची ही काही पहिली वेळ नव्हे, स्वतःचे समकालीन अभिनेते अनुपम खेर यांच्यावरही त्यांनी अत्यंत वाईट शब्दांत टीका केलेली आपण ऐकलीच असेल.
दोघांमध्ये राजकीय मतभेद आणि विचारधारेमधला फरक असल्याने एका मुद्द्यावरून या दोघांत झालेली शाब्दिक बाचाबाची आपण पाहिली असेलच, त्यातही नसिर यांनी नियंत्रण हरवून अनुपम खेर यांना “जोकर आणि सायकोपॅथ” असं संबोधून त्यांची हेटाळणी केली होती.
यावर खरंतर नसिर यांच्या वयाचा मान राखत अनुपम यांनी काहीच टिप्पणी केली नाही, पण नसिर यांची ही टिप्पणी पाहून त्यांचा तोंडावर ताबा नाहीये हे दिसून आलं होतं!
या देशाच्या पहिल्या सुपरस्टारलाही नसिर यांनी सोडलेलं नाही, “राजेश खन्ना हे लिमिटेड अॅक्टर आहे, लिमिटेड पेक्षाही एक टुकार अभिनेता आहे!” असंही नसिर यांनी एकेकाळी स्टेटमेंट केलं होतं.
यावरून नसिरुद्दीन हे किती कोत्या मनोवृत्तीचे आहेत याचा अंदाज येतो, समोरच्याचं यश स्वीकारणारा आणि त्याची खुल्या मनाने प्रशंसा करणाराच खरा अभिनेता असतो, या कॅटेगरीमध्ये नसिरसाहेब कुठे बसतात हे देवच जाणे!
बरं निदान आपल्या क्षेत्राविषयी बोललो तर इतर लोकं वाईट वाटून घेत नाहीत, पण ज्या विषयातली आपल्याला काडीची माहिती नाही त्या क्षेत्रातल्या लोकांवर तरी आपण टिप्पणी करू नये.
क्रिकेटर विराट कोहली आणि त्याचा तापट स्वभाव तर आपल्याला माहीतच आहे पण त्याच्याविषयीही नसिर महाशयांनी काही टिप्पणी केली आहे ती अशी की “विराट हा एक उत्तम बॅट्समन आहेच पण तो अत्यंत चुकीचं वर्तन करणार माणूस आहे!”
अरे भले विराट कितीही तापट असो, तो येतो का तुम्हाला अभिनयाचे धडे द्यायला मग तुम्हाला काय गरज आहे नको तिथे नाक खुपसायची?
बरं एवढं सगळं होऊन नसिर साहेब आपल्या पंतप्रधानांवरही टिप्पणी करणारच, आणि ती टिप्पणी केल्यावर बेंबीच्या देठापासून ओरडणार की “आमचा आवाज या देशात दडपला जातोय हो….”
नसिर साहेब अहो आपल्या देशातल्या एवढ्या मोठ्या लोकांवर तुम्ही इतकी ‘स्तुतिसुमनं’ उधळता आणि मग तरीही अभिव्यक्तीच्या नावाखाली का गळे काढता हो? मान्य आहे सध्या तुम्हाला कुणी विचारत नाहीये, पण निदान ही असली वक्तव्यं तुम्हाला शोभत नाहीत हो!
राजेश खन्ना किंवा अमिताभ बच्चन हे चांगले अभिनेते नसले तरी तुम्ही आहात ना? मग तुमची असं वागायला लागलात तर मग लोकांनी कोणाकडे बघायचं?
असो, हे एवढं बोलूनही तुमच्यावर अजूनही कुणी माफी मागायला दबाव आणलेला नाही की तुमच्यावर कोणता हिंसक हल्ला झालेला नाही!
त्यामुळे जर तुम्हाला दुसऱ्यांचा ग्रेटनेस नसेल मान्य करायचा तर नका करू पण या काही ग्रेट लोकांच्या बद्दल हे असलं उलट सुलट बोलून तुम्ही तुमचाच मान कमी करून घेताय हे ध्यानात ठेवा आणि जरा शुद्धित राहून बोला, एवढीच माफक अपेक्षा.
बघा येणाऱ्या काळात जमल्यास कोणत्या सिनेमात काम मिळाल्यास ते करा पण हे असलं काहीतरी बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नका!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.