दिलीप कुमार यांचा ‘चाणक्य’ डबाबंद झाला आणि धर्मेंद्रचं स्वप्न अपूर्णच राहिलं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
वर्षानुवर्ष पाहिलेलं एखादं स्वप्न नजरेच्या टप्प्यात येतं, अखेर आपली इच्छा पूर्ण होणार, असंख्य प्रयत्नांनंतर आपली स्वप्नपूर्ती होणार या विचारांनी आपण निर्धास्त होतो आणि शेवटच्या क्षणी एखाद्या आघातामुळे आपलं स्वप्न भंगतं, त्यावेळी होणारं दुःख, वेदना यांची कल्पना करणंही कठीण! तुम्हालाही कधीतरी हा अनुभव आलाच असेल.
नेमकी हीच परिस्थिती बॉलिवूडच्या ‘ही मॅन’ ला अनुभवावी लागली. चित्रपटात अनेकांशी लढत हिरोला काहीही कठीण नाही असं दाखवणा-या अभिनेता धर्मेंदचं स्वप्न मात्र ख-या आयुष्यात भंगलं आणि यावेळी हतबलतेमुळे तो काहीही करू शकला नाही.
दोन दिवसांपुर्वी बॉलिवूडचे सुपरस्टार दिलीप कुमार यांचं निधन झालं आणि केंव्हातरी आपलं एक स्वप्न पूर्ण होईल अशी बाळगणा-या धर्मेंद्रच्या अश्रुंचा बांध फुटला.
नेमकं कोणतं स्वप्न होतं? दिलीप कुमार आणि धर्मेंद्रंचं ते स्वप्न यांचा नेमका संबंध काय? जाणून घेऊया…
तो काळ होता १९८० चा! हिंदी चित्रपटसृष्टीत सातत्याने नव्या भुमिकांचे प्रयोग करणारे दिलीप कुमार यांच्याकडे एक नवंकोरी स्क्रीप्ट आली त्यातील खुद्द दिलीप कुमार त्यातील भुमिकेच्या प्रेमात पडले.
प्रसिद्ध दिग्दर्शक बी आर चोप्रा यांची संकल्पना असलेली ती स्क्रीप्ट दिलीप कुमारांना प्रचंड आवडली. चाणाक्यांवर चित्रपट करावा अशी चोप्रा यांची अनेक वर्षांची इच्छा होती. मात्र हा रोल दिलीप कुमार यांनीच करावा हा त्यांचा आग्रह होता. योगायोगाने दिलीप कुमार यांनीही तात्काळ चित्रपटाला होकार दिला.
या चित्रपटाचा नाव ठरलं ‘चाणाक्य चंद्रगुप्त’! याचाच अर्थ चित्रपटात चाणाक्यांइतकीच महत्वाची भुमिका होती ती चंद्रगुप्ताची. त्यामुळे हा रोलसाठी चर्चा सुरु झाली आणि चोप्रांनी अभिनेता धर्मेंद्र यांच्या नवाला हिरवा कंदिल दिला.
धर्मेंद्रला ही बातमी समजली आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अर्थात याचं कारणही तसंच होतं.
मला दिलीप कुमार व्हायचंय
काही वर्षांपुर्वी मुंबईत नशिब आजमावण्यासाठी आलेल्या धर्मेंद्रला बॉलिवूड खुणावत होते. चंदेरी दुनियेत प्रसिद्ध होणं ही इच्छा होतीच मात्र त्यापेक्षाही जास्त एक स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. ते म्हणजे दिलीप कुमार बनण्याचं.
धर्मेंद्रने जेंव्हा या क्षेत्रात यायचा विचार केला तेंव्हापासून दिलीप कुमार हे त्यांचे आदर्श होते. ”मला दिलीप कुमार व्हायचंय, त्यांच्यासारखा उत्तम नट व्हायचंय, चांगल्या भुमिका करायच्यात” याच विचारांनी धर्मेंद्र त्याकाळी झपाटले होते.
या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची पहिली पायरी म्हणजे खुद्द दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी म्हणजे धर्मेंद्रंना स्वर्ग ठेंगणा झाला होता.
–
हे ही वाचा – युसूफ खान ते दिलीप कुमार हा प्रवास उलगडणारे हे ९ दुर्मिळ फोटो पहाच
–
लंडनहून वीग आला पण…
‘चाणाक्य चंद्रगुप्त’ या सिनेमासाठी या दोघांची तयारी सुरु झाली.
चाणाक्य यांचा रोल खराखुरा वाटावा यासाठी चोप्रांनी शक्कल लढवली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पंडारी जूकर यांच्याशी तातडीने संपर्क साधला.
दिलीप कुमार यांच्या मेकअपची जबाबादारी पंडारींवर सोपवण्यात आली, मात्र यातील सर्वात मोठे आव्हान होते ते दिलीप कुमार यांच्या केसांचे. चाणाक्याच्या भुमिकेसाठी दिलीप यांचे टक्कल करणे आवश्यक होते, मात्र खुद्द दिलीप यांनी या प्रस्तावाला नकार दिला. ा
हा तिढा सोडवण्यासाठी पंडारींनी थेट लंडन गाठलं, लंडनमधील प्रसिद्ध मेकअप आर्टिस स्पियर्सच्या मदतीने त्यांनी एक वीग तयार केला. बोल्ड कॅप अर्थात व्यक्तीचे टक्कल दाखवणारा हा वीग घेऊन ते पुन्हा भारतात परतले.
हा वीग लावण्यासाठी दिलीप कुमार यांना तब्बल तीन तास लागले, मात्र त्यानंतर या वीगने जी किमया घडवली ते पाहून खुद्द दिलीप कुमारही थक्क झाले.
डाव अर्ध्यावर मो़डला
चित्रपटाच्या लुक टेस्टमध्ये चाणाक्यांचा मेकअपही फायनल झाला. याचवेळी धर्मेंद्र आपली सगळी ताकद पणाला लावून भुमिकेचा अभ्यास करत होते.
चित्रपटाचं शुटिंग सुरु झालं. सारं काही अलबेल होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम चालणार अशा चर्चाही सुरु झाल्या. मात्र त्यानंतर एक अशी घटना घडली ज्यानं सारंकाही विस्कटलं.
चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याचवेळी मोठ्या आर्थिक नुकसानाला तोंड द्यावं लागलं. परिणामी चित्रपटाचं शुटिंग थांबलं ते कायमचंच!
प्रचंड मेहनत करूनही अखेर हा चित्रपट कधीही पुर्ण झाला नाही. यामुळे निर्माते, तंत्रज्ञान यांचं नुकसान झालंच मात्र यापेक्षाही जास्त धर्मेंद्र यांचं दिलीप कुमार यांच्यासह काम करण्याचं स्वप्न भंगलं.
मोठ्या पडद्यावर चाणाक्यांची कथा आलीच नाही मात्र त्याचकाळात टिव्हीवर महाभारताला मिळालेली प्रसिद्धी लक्षात घेता चाणाक्यांवर आधारित मालिका प्रकाशित करण्यात आली आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर धर्मेंद्र आणि दिलीप कुमार यांच्यातील निखळ मैत्री कायम राहिली ती अगदी शेवटपर्यंत…
बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नशिब उजळेल हे सांगणं कठीण, मात्र याच चंदेरी दुनियेत कोणती घटना नेमकी कोणाची इच्छा अपूर्ण राहण्यासाठी कारणीभूत ठरेल हे देखील सांगता येणार नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.