Site icon InMarathi

शहीद भावासाठी बनवलेल्या सुपरहिट “बॉर्डर”ला खुद्द PMनी दिला होता ग्रीन सिग्नल; आज २५ वर्षे पूर्ण!

border im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजही पंधरा ऑगस्ट असो की २६ जानेवारी बॉर्डरमधलं गाणं आपल्याला ऐकू येतंच. आजही जेव्हा जेव्हा हा चित्रपट टिव्हीवर लागतो तेव्हा तेव्हा तो तितक्याच उत्सुकतेनं बघितला जातो.

चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक जे पी दत्तांनी हा चित्रपट १९७१ सालीच लिहिला होता. देशभक्तीपर सिनेमा ही जेपींची खासियत आहे. त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट, ‘सरहद’ हा देखिल एक देशभक्तीपरच होता.

 

 

या चित्रपटात तेव्हाची तगडी मल्टीकास्ट काम करत होती. विनोद खन्ना, बिंदिया गोस्वामी, नासिरूद्दीन शाह, मिथून चक्रवर्ती, ओम पुरी असे जानेमाने कलाकार यात भूमिका साकारत होते.

हे ही वाचा ठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव

मात्र आर्थिक अडचणी आल्या आणि हा चित्रपट अर्धवटच राहिला. पुढे जाऊन जेपींकडे शुटींग पूर्ण करण्याइतके पैसे आल्यानंतर त्यांनी पुन्हा जोर धरला.

मात्र आता अडचण अशी झालेली होती की, बिंदिया मिसेस दत्ता बनून संसारात रमली होती, विनोद खन्नानं ओशोंची दीक्षा घेतली होती, बाकी इतर कलाकारही त्यांच्या इतर कामात व्यस्त होते. आता हाताशी पैसा असूनही सरहद पूर्ण होणार नव्हता. जेपींच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. त्याही नंतर सतत त्यांना आपण असा एखादा सिनेमा करायला हवा हे येत असे.

ही संधी त्यांना १९९६-९७ मधे मिळाली. एका नव्या चित्रपटाची जुळवाजुळव त्यांनी चालू केली. या चित्रपटाचं नाव होतं,’बॉर्डर’ सरहदचं इंग्रजी नाव. मात्र या चित्रपटाचं कथानक सरहदहून निराळं होतं. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारीत होता.

 

 

सरहद अपूर्ण राहिल्याची सगळी कसर जेपींनी बॉर्डरच्यावेळेस भरून काढली आणि सर्वतोपरी मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला. या चित्रपटानं केवळ बॉक्सऑफिस हिट पाहिला असं नाही तर जेपींचं करियर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आणि तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिले.

बॉर्डरचं कथानक जेपींना १९७१ सालीच सुचलं होतं. या चित्रपटाच्या कथानकाचं बीज त्यांना त्यांच्या भावाकडून म्हणजे दीपक दत्ता यांच्या कडून मिळालं होतं.

दीपक दत्ता भारतीय हवाईदलात होते आणि १९७१ च्या युध्दात त्यांनी भाग घेतला होता. लोंगोवाल युध्दाचे साक्षिदार असणारे दीपक ज्यांनी ते युध्द समोर पाहिलं होतं ते जेंव्हा युध्दावरून घरी परतले तेंव्हा त्यांनी या युध्दाचे किस्से जेपींना ऐकवले.

जेपींनी या आठवणी आपल्या डायरीत नोंदवून ठेवल्या. कालांतरनं म्हणजे १९८७ साली दीपक यांचा मिग २१ दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेचा जेपींच्या मनावर खोलवर परिणाम झाला. ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पोहोचल्यावर त्यांनी या कथानकाचा स्क्रिनप्ले लिहून काढला.

त्यांना खात्री होती की एक ना एक दिवस ते चित्रपट दिग्दर्शक बनतील आणि या स्क्रीनप्लेवर ते चित्रपट बनवतील. ही संधी त्यांना १९९७ साली मिळाली.

बॉर्डरच्या निमितानं. बॉर्डरमधील विंग कमांडर ॲण्डी बाजवा हे जॅकी श्रॉफनं साकारलेलं पात्र दीपक दत्तांवरूनच प्रेरित होतं.

 

 

बॉर्डर मल्टीस्टारर सिनेमा होता आणि मल्टीस्टारर कास्टींग करणं ही खूप कठीण गोष्ट असते. जॅकीनं साकारलेल्या पात्रासाठीही आधी संजय दत्तचा विचार करण्यात आला होता. मात्र संजयच्या मागे एके ४७ चं शुक्लकाष्ठ लागलं आणि तो जेलमधे गेला. तो जेलमध गेल्यावर जॅकीची या भूमिकेसाठी वर्णी लागली.

जॅकीच नाही तर नव्वदीतल्या सर्व आघाडीच्या कलाकारांनी यात काम केलं होतं. सुनिल शेट्टी, पुजा भट्ट, तब्बू, सनी देओल अशी सगळी नावं यात होती.

मात्र गंमतीचा भाग हा की यांच्याआधी जेपींनी सलमान खान, अजय देवगण, अमिर खान यांनाही या चित्रपटासाठी संपर्क केला होता. यातल्या सेकंड लेफ्टनंट धर्मवीर भानच्या भूमिकेसाठी जेपींना मोठा कोणीतरी स्टार हवा होता.

त्यांनी सलमानला गाठलं आणि भूमिका, चित्रपटाचं कथानक ऐकवलं. मात्र सलमाननं, आता मी करियरमधे ज्या टप्प्यावर आहे तिथे अशाप्रकारच्या युध्दपटात काम करण्यासाठी तयार नाही असं सरळ तोंडावर सांगत नकार दिला.

हे ही वाचा बॉलिवूडचे ‘शो मॅन’ ठरलेले सुभाष घई रातोरात कुठे गायब झाले… ते आता करतात काय?

 

जेपी अमिर खानकडे गेले मात्र अमिर त्यावेळेस इश्क नावाच्या चित्रपटांसाठी तारखा देऊन बसला असल्यानं त्याच्याकडे या सिनेमासाठी तारखाच उरल्या नव्हत्या. अजय देवगणनं सांगितलं की त्याला मल्टीस्टारर सिनेमात काम करण्यात स्वारस्य नाही.

त्यानंतर अक्षय कुमारकडे ही भुमिका गेली त्यानंही काही कारणांमुळे यात भूमिका साकारायला नकार दिला.

या भूमिकेसाठी प्रस्थापित आणि सुपरस्टार नाव शोधत असणार्‍या जेपींसमोर अखेर नाव आलं, अक्षय खन्ना याचं. अक्षयची एकमेव पदार्पणाची फिल्म आली होती. विनोद खन्नाचा मुलगा म्हणून त्याचं प्रेमानं स्वागत झालं असलं तरीही सिनेमा सपशेल आपटला होता.

 

 

खरंतर काहीच पर्यायही उरला नव्हता आणि या कास्टिंगसाठी चित्रपट रेंगाळत होता म्हणून अक्षयची निवड करण्यात आली. या भूमिकेचं पुढे त्यानं काय सोनं केलं हे आपण चित्रपटात पाहिलंच आहे. अक्षय खन्नाला पहिला हिट बॉर्डरनं मिळवून दिला.

जेपींना हा चित्रपट भव्य स्वरूपात आणि पूर्णपणे वास्तववादी बनवायचा होता. यातलं युध्दाचं वातावरण, सैनिकी पार्श्वभूमी त्यांना खरी भासेल अशी दाखवायची होती. बांधीव सेटवर आणि खोट्या खोट्या फिल्मी शस्त्रांचा वापर त्यांना करायचा नव्हता.

त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांची भेट घेऊन त्यांना बॉर्डरची कल्पना सांगितली. पीव्ही या कथानकानं भारावून गेले आणि त्यांनी जेपींना सांगितलं की हा चित्रपट कोणतीही अडचण न येता बनलाच पाहिजे. यासाठी जे जे सहकार्य हवं आहे ते करण्याची त्यांनी तयारिही दर्शविली.

जेपींसाठी हे म्हणजे सोने पे सुहागा झालं. त्यांनी खर्‍या ठिकाणांवर आणि खर्‍या शस्त्रांसहित चित्रीकरण करण्याची परवानगी मागितली. पंतप्रधानांनी ही परवानगी दिली आणि बॉर्डरचे सोल्जर्स सेटवर पोहोचले.

 

 

या चित्रपटात मुख्य कलाकारांव्यतिरिक्त जे सैनिक दिसतात ते ज्युनिअर ॲक्टर नसून खरे खुरे सैनिक आहेत. अर्थात या सगळ्यासाठी जेपींनी पैसाही तितकाच खर्च केला.

हे सगळं वापरण्यासाठी परवानगी मिळालेली असली तरी ही त्याची भली मोठी किंमतही त्यांनी दिली. अर्थात हे पैसा ओतणं व्यर्थ गेलं नाही आणि भारतीय सिनेमाला एक क्लासिक युध्दपट लाभला.

गुंतवलेला सगळा पैसा चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.

===

हे ही वाचा “सामग्री तैयार है, तुम आगे बढ सकते हो” : नरसिंह रावांच्या एका वाक्याने भारत बदलला तो कायमचाच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version