‘हातात लशीचा कंटेनर पाठीवर मूल’, वाचा लढाई आधुनिक झाशीच्या राणीची!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“नॉट ऑल सुपरहिरोज वेअर केप” ही एक इंग्रजीतली म्हण सध्या सत्यात उतरताना दिसतेय. “सुपर हिरो” म्हणजे एक अशी व्यक्ती जिच्यासमोर सगळी आव्हानं, संकटं तोकडी पडतात. जी कधीच निराश होऊन आपल्या कर्तव्यापासून लांब पळत नाही.
जी गोवर्धन पर्वतासारखी स्वतः सगळा वारा वादळ पाऊस झेलून, आपल्या आश्रयाला आलेल्या लोकांची रक्षा करते. अशी व्यक्ती जी कधीच खचून जात नासल्याने तिचाच नेहमी विजय होतो. असे हे “सुपर हिरोज” आपल्याला सध्या जगभरात दिसतायत. कुठे?
आपले डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, अंगणवाडीच्या आशा ताई, हे सगळे सध्या आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोना विरुद्धच्या युद्धात आपलं तन, मन अर्पण करून काम करतायत, कोरोनाशी झगडून आपल्या प्रियाजनांना जीवदान देतायत.
–
हे ही वाचा – आव्हान ‘व्हॅक्सिन हेजिटन्सी’चं! लसीकरणाची मोहीम फत्ते करण्यासाठी हे आहे गरजेचं!
–
संपूर्ण जगातून नेहमीच वेगवेगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची उदाहरणं, गोष्टी त्यांच्या योगदानाच्या कथा आपल्या समोर येताना आपण पहिल्या आहेत. अशीच एक महिला आरोग्य कर्मचारी सध्या सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकून, त्यांचा सन्मान मिळवतेय. कोण आहे ही धाडसी महिला आणि तीचं इतकं कौतुक का होतंय चला पाहूया.
एएनएम मानती कुमारी ह्या पुन्हा पृथ्वीवर झाशीच्या राणीनेच जन्म घेतलाय की काय, असा भास आपल्याला करवून देतात. झारखंड येथील लातेहार जिल्ह्याच्या महुआडांड़ प्रांतातील हि सेविका आपल्या कर्तबगरीमुळे सगळ्यांची मनं जिंकतिये.
मानती कुमारी ह्यांची नियुक्ती “अक्सी” नामक एका खेडे विभागात झाली आहे. हे गाव इतकं आत आहे, की त्याला बाह्य जगाशी जोडण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही. जो मार्ग आहे, तो इतका खडतर आहे की कोणतेही डॉक्टर आणि सरकारी अधिकारी तिथपर्यंत जाण्याचा विचारही करू शकत नाही, पण मानती कुमारी नित्य नियमाने, वेळेवर गावात पोहचून आपलं कर्तव्य बजावते आहे.
गावात जायला एक नदी ओलांडून जावे लागते. वारा, वादळ पाऊस असला की नदीच्या पाण्याला पूर येतो. पाण्याचा वेग वाढतो. पण मानती कुमारी ह्या सगळ्या आव्हानांना पार करून गावात जाऊन कोरोना लसीकरण व इतर रुग्णांची मदत करण्याची आपली ड्युटी अचूक पणे पार पाडते आहे.
हे सगळं करताना तिला आपल्या दीड वर्षाच्या मुलीला सुद्धा आपल्या बरोबर न्यावे लागते, कारण मुलगी अत्यंत लहान असल्याने आईला सोडून ती कुटुंबातील कोणाजवळच राहत नाही.
मानतीला, आपल्या लहानश्या मुलीला पाठीवर घेऊन, बरोबर लसीचे कंटेनर घेऊन नदी ओलांडून जावे लागते, जे फार जोखमीचे काम आहे. थोडाही तोल गेला तर मानती आणि तिची मुलगी, ह्या दोघींच्याहि जीवावर बेतू शकते, म्हणून मानती पती तिच्या सोबत नदी पार करून तिला सोडायला व घ्यायला जातात. आपण आपली नोकरी आणि कर्तव्यनिर्वाहान आपल्या पतीच्या मदतीने चोख बजावू शकतो हे मानतीचे म्हणणे आहे.
मानती कुमारीला आपल्या जबाबदारी ची जाणीव आहे म्हणून रोज न चुकता हा सगळा प्रपंच ती चालवते. गावकाऱ्यांपर्यंत औषधे, लसी, पोहचवण्याचे एकमेव साधन सध्या मानती बनलेली आहे. तिने ही जबाबदारी घेतली नसती तर गावकऱ्यांचे हाल झाले असते, त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला असता.
गावात एकही हेल्थ सेंटर नाही, त्यामुळे त्यांना साधा ताप जरी आला जरी मोठ्या शहरात धाव घेण्या व्यतिरिक्त कोणता पर्याय नसतो. अशात बाहेर कोरोना महामारी. गावकऱ्यांनी आस लावायची तरी कुणाकडे. हे सगळे प्रश्न, ह्या सगळ्या समस्या
मानती कुमारीने जाणल्या व आज ती आपल्या अथक प्रयत्नांनी गावकऱ्यांची नित्याने सेवा करते आहे.
रोज सकाळी महुआडांड़ मध्ये हजेरी लावून, सगळं आवश्यक सामान जसे औषधे, लसी इत्यादी घेऊन, आपल्याला तान्हुलीला पाठीवर बांधून, मानती अक्सी पंचायतीत जाण्यास निघते. हे ती अनेक वर्षांपासून अथक पणे करत आली आहे.
कोरोना महामारी पूर्वी मानतीवर पोलिओ, बी.सी.जि, क्षयरोग, इत्यादी ह्या लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींची जबाबदारी होती.
सगळ्या बाळांना वेळेवर लस उपलब्ध करून, टोचून देणे, त्यांच्या प्रकृतीची नियमित तपासणी करणे, इतर रुग्णांना औषधे उपलब्ध करु देणे, ह्या व्यतिरिक्त गरोदर मातांना योग्य शिक्षप्रदान करून आपली काळजी कशी घ्यावी हे समजावणे हे सगळे मानती करायची.
कोरोना आल्यावर आता त्या संदर्भातील प्रचार, अफवांचे निर्मूलन, लसीकरण, ही जबाबदारी सुद्धा तिच्यावर सोपवण्यात आली आहे.
नेटकऱ्यांबरोबर महुआडांड़चे चिकित्सा पदाधिकारी डॉ. अमित कुमार ह्यांनी सुद्धा मानतीच्या कामाची प्रशंसा केली आहे. तिचं काम, कामाप्रतिची आवड, शिस्त, जिद्द हे वाखाडण्याजोगे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
इतक्या आव्हानांचा सामना करून, त्यांना यशस्वी पणे मात देऊन मानती आपले कर्तव्य बजावते ह्याचा आपल्या सगळ्यांनाच सार्थ अभिमान वाटायला हवा.
कुठे मानती आणि कुठे आपण! कधी विचार केला आहे का की लढण्या ऐवजी लहानग्या संकटांसमोर हात टेकून आपण हार मानून घेतो. पण मानती कडून आपण सगळ्यांनीच प्रेरणा घ्यायला हवी. इतक्या संकटातून, आपल्याला लहानश्या मुलीला पाठीवर घेऊन ती इतरांची सेवा करायला सरसावते ह्यातून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. अशी माणसं, जी तीही कोणीच लागत नाही, त्यांची सेवा करायला इतकी जोखीम ती नित्याने उचलते आहे.
इतकं विशाल हृदय सगळ्यांचंच असलं तर ह्या पुरथ्वीवरून माणुसकी कधीही संपणार नाही. आपल्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ही पृथ्वी एक उत्कृष्ट कुटुंब असेल हे म्हणायला हरकत नाही. मानती सारखे अनेक आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून इतरांची सेवा करतायत.
त्यांना सहकार्य करून आता आपण आपली सामाजिक जबाबदारी किती व्यवस्थितपणे पार पाडतो, हे आपल्यावर अवलंबून आहे. मानती ही आधुनिक काळातील झाशीची राणीच. तिच्या कर्तबगरीला सलाम!
===
हे ही वाचा – कोवॅक्सिन लशीच्या निर्मितीत गाईच्या वासराचे रक्त वापरतात का? नेमकं तथ्य जाणून घ्या
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.