' भर सभेत अजान ऐकू येताच बाळासाहेब म्हणाले “तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?” – InMarathi

भर सभेत अजान ऐकू येताच बाळासाहेब म्हणाले “तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

सध्या लाऊडस्पीकरवरुन महाराष्ट्रभरात चांगलाच वाद चिघळला आहे. कालच्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेतल्या भाषणादरम्यान अजान सुरू झाल्याने एक वेगळंच वळण सभेला मिळालं.

एकंदरच हनुमान चालीसा आणि अजान यावरून समाजिक  वातावरण गढूळ झालं असून काही लोकं याला राजकीय आणि धार्मिक वळण देत आहेत.

 

raj thackrey IM

 

मध्यंतरी राणा दांपत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले तेव्हा मुंबईत कशी परिस्थिति निर्माण झाली होती हे आपण पहिलंच. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण तुम्हाला ठाऊक आहे का राज ठाकरे यांच्या सभेदरम्यानच नव्हे तर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणादरम्यान एकदा लाऊडस्पीकरवर अजान सुरू झाली होती. तीही औरंगाबादच्या संभाजीनगर येथेच.

तेंव्हा नेमकं काय झालं, त्यावेळेस नेमकी राजकीय परिस्थिति काय होती,  बाळासाहेबांनी तेव्हा नेमकं काय केलं याविषयीच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

balasaheb thackrey inmarathi

 

विषय प्रतिष्ठेचा होता

ही घटना आहे २००५ मधली, ज्यावेळी काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे २००४ साली महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार अस्तित्वात आलं होतं. औरंगाबाद महापालिका मात्र अजूनही शिवसेनेच्या अखत्यारीत होती. थोडीथोडकी नाही, तर सलग १५ वर्ष औरंगाबाद महापालिकेत त्यांचंच सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आलं होतं.

या पार्श्वभूमीवर आघाडीने औरंगाबादेत मोठा जोर लावला होता आणि म्हणूनच ही निवडणूक राज्यभरात मोठ्या प्रतिष्ठेचा विषय ठरली होती.  प्रत्येक पक्षाची, राज्यातील आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काहीही करून इथे सत्तापालट घडवायचा असा आघाडीचा प्रयत्न होता, तर सत्ता टिकवण्यासाठी युतीच्या नेत्यांनीही जोर लावला होता.

 

congress ncp inmarathi

बाळासाहेबांचं भाषण सुरु असतानाच…

युतीला सत्ता टिकवता येणार का? हा एकच सवाल जनतेच्या आणि नेत्यांच्या मनातही होता. खरंतर याचीच मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. असं म्हटलं जातं की सत्ता टिकवता येईल का, याविषयी युतीमधील नेत्यांच्या मनातही शंका आणि धाकधूक होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेकडे!

 

balasaheb sabha inmarathi

 

ही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.

बाळासाहेबांच्या भाषणाविषयी सगळ्यांनाच नेहमीच कुतुहूल असायचं. तसंच याही भाषणाचं होतं. याशिवाय त्यांच्या भाषणात ते नेमका कुठला नवा मुद्दा मांडणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र जे घडलं ते भलतंच होतं.

बाळासाहेबांचा हजारजबाबीपणा

बाळासाहेबांचं भाषण ऐन रंगात आलेलं असतानाच अचानक अजान सुरु झालं. अवघा जनसमुदाय शांत झाला. खुद्द बाळासाहेबांनी सुद्धा त्यांचं भाषण काही क्षणांसाठी थांबवलं.

त्यांनी एक पॉझ घेतला; त्यांच्या खास शैलीत एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताचं बोट हवेत आकाशाकडे निर्देश करणारं, आणि ते म्हणाले “याचसाठी मी विचारतोय, तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?”

 

balasaheb thackarey inmarathi

 

अपेक्षेप्रमाणेच टाळ्यांचा कडकडाट झाला. बाळासाहेबांच्या हजरजबाबी स्वभावाचं आणखी एक उदाहरण अनुभवण्याची संधी मिळाली. सलग चौथ्यांदा शिवसेना आणि भाजप युतीची औरंगाबाद महापालिकेत सत्ता आली. याला काहींनी बाळासाहेबांच्या त्या वाक्याचा करिष्मा म्हटलं, तर काहींनी आणखीही काही… मात्र अजान सुरु झाल्यावर त्यांनी काही क्षण थांबून अवघा माहोल बदलून टाकला हे मात्र खरं…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?