' मला आरक्षण मिळालं असतं, तर मी ‘ऑफिस मधला पोऱ्या’ झालो असतो… – InMarathi

मला आरक्षण मिळालं असतं, तर मी ‘ऑफिस मधला पोऱ्या’ झालो असतो…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘राजकारणात असूनही कधीही गलिच्छ राजकारण न करणारा नेता कोण?’ असा प्रश्न विचारला, तर आज कदाचित अनेकजण नितीन गडकरी असंच उत्तर देतील.  आपली रोकठोक मतं स्पष्टपणे मांडणारे, वेळप्रसंगी आपल्याच पक्षातील नेत्यांना सुद्धा खडे बोल सुनावणारे आणि सगळ्याच पक्षांमध्ये ज्यांचे स्नेही आहेत, असे नेते म्हणजे नितीन गडकरी!

त्यांचा हा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव अनेकदा फायद्याचा ठरतो, तर अनेकदा विरोधकांना मिळालेली आयती संधीदेखील ठरतो. पण त्यांच्या स्पष्टवक्तेपणामध्ये फरक पडलेला नाही, अशीच स्थिती पाहायला मिळते.

 

nitin gadkari inmarathi

 

सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा महाराष्ट्रातील राजकारण पेटलेलं पाहायला मिळालं. रद्द झालेलं आरक्षण, त्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रंगलेला कलगीतुरा, राज्यसभेचा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेणं, महाराष्ट्र दौरा अशा अनेक गोष्टी घडल्या, घडत आहेत. अर्थात, हा मुद्दा अजूनही गरम आहेच.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागला असला, तरी आरक्षणाचा मुद्दा मात्र पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा मुद्दा आता आणखी किती काळ चर्चेत राहील, याबद्दल कुणीही काही भाकीत करू शकणार नाही, हे मात्र नक्की!!!

या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात भाषण करत असताना आरक्षणाविषयी मांडलेली मतं, फारच महत्त्वाची ठरतात. स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध असलेले, नितीन गडकरी यांनी आरक्षणाबद्दल मांडलेले हे विचार माहित असायलाच हवेत.

 

nitin-gadkari-marathipizza

 

===

हे ही वाचा – ‘नाटक मत कर, रख फोन नीचे’ नितीन गडकरींनी अमिताभला झापलं…

===

काय म्हणाले नितीन गडकरी?

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त, माळी समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी त्यांचे रोखठोक विचार मांडले होते.

यावेळी बोलत असताना त्यांनी हे स्पष्ट केलं होतं, की गरजूंना आरक्षण जरूर देण्यात यावं, मात्र केवळ आरक्षण मिळालं म्हणजे प्रगती होते, असा समज कुणीही बाळगू नये. एवढंच नाही, तर ज्या समाजाला सर्वाधिक आरक्षण लाभलं, त्या समाजाची योग्य प्रगती झाली, असा समज सुद्धा चुकीचा आहे.

 मुद्दा पटवून देण्यासाठी बड्या नेत्यांची उदाहरणं

नितीन गडकरी कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलले आहेत, असं कधी फारसं घडून आलेलं दिसत नाही. त्यांच्या या वक्तव्याला दुजोरा देता येईल, अशी काही उदाहरणं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे या सभेत मांडली.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, या मंडळींनी कुठलंही आरक्षण घेतलेलं असल्याचं तुम्ही पाहिलं आहे का, असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला होता. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सुषमा स्वराज अशा यशस्वी स्त्रियांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला.

 

Indira Gandhi

 

थोडक्यात काय, तर या मंडळींनी केलेली कामं आणि त्यांचं कर्तृत्व यावरच त्यांना राजकारणात सुद्धा यश संपादन करता आलं. यासाठी कुठल्याही आरक्षणाची आवश्यकता नव्हती.

यश मिळवण्यासाठी, आपलं लक्ष्य कसं गाठावं, त्यासाठी काय मेहनत घ्यावी याच गोष्टींचा विचार करणं योग्य ठरतं.

अनेक जगप्रसिद्ध नेते, सुप्रसिद्ध लोक या जगात आहेत, ज्यांनी मोठं यश संपादन केलं आहे, मात्र त्यांच्या जातीविषयी कुठलीही चर्चा होतं असल्याचं पाहायला मिळत नाही. कारण यश मिळवण्यासाठी कुठल्याही जातीधर्माची कधीही आवश्यकता नसते.

===

हे ही वाचा – “माझे वडील माझे ‘मेन्टॉर’ नव्हते, मला हवं तेच मी करते” : इंदिरा गांधी

===

याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही नितीन गडकरी यांनी आदरपूर्वक उल्लेख केला. ते कधीही त्यांच्या जातीचा उल्लेख करत नाहीत, त्याचा वापर करून राजकारण करत नाहीत, ही चांगली गोष्ट असल्याचं मतही त्यांनी मांडलं.

‘मी मागासवर्गीय समाजातील आहे, असं नरेंद्र मोदी यांनी कधीही म्हटलेलं आठवत नाही.’ असंही त्यांनी यापुढे सांगितलं.

ऑफिसमधला पोऱ्या झालो असतो…

नितीन गडकरी यांनी कधीही जातीपातीचा विषय महत्त्वाचा मानला नाही. या मुद्द्यावरून कधी त्यांनी राजकारण सुद्धा केलेलं नाही. म्हणजेच, राजकारणात असूनही या विषयापासून गडकरी अलिप्त आहेत असंच म्हणायला हवं.

नितीन गडकरी जातीभेद मानत नाहीत. त्यांना विशिष्ट समाजाची व्यक्ती म्हणून कधीही आरक्षण मिळालेलं नाही. अर्थात, अशा आरक्षणाची त्यांनी कधी अपेक्षा सुद्धा केलेली नाही. लहानपणी त्यांनी त्यांची आई आणि बहीण यांना मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं होतं, की त्यांना ‘नोकरी देणारा’ बनायचं आहे, ‘नोकरी मागणारा’ नाही.

त्यांच्या या विचारांमुळे त्यांची मस्करी करण्यात आली. असं केलंस, तर कुणी लग्नासाठी मुलगी सुद्धा देणार नाही, असं त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्या आई आणि बहिणीने केला. मात्र, ते त्यांच्या विचारांवर ठाम होते. त्यांनी आज प्राप्त केलेलं यश आज आपण पाहत आहोत.

 

nitin-gadkari-inmarathi

 

शिक्षकीपेशा आणि शिपाई म्हणू काम करणं याच पेशाचा स्वीकार त्यांच्या समाजातील लोक त्याकाळात करत असत, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळेच, ‘कुठलंही आरक्षण मिळालं नाही, याचा मला फायदा झाला’ असं गडकरी म्हणतात. असं कुठलंही आरक्षण मिळालं असतं, तर पिढीजात चालत आलेला पेशा त्यांनी स्वीकरला असता, असं त्यांचं मत आहे.

त्यामुळे एखादी ऑफिसमधील बाबूची नोकरी पदरात पाडून त्यात त्यांनी सुख मानलं असतं. या आरक्षणाचा त्यांच्यावर असा परिणाम झाला असता, असं सांगायला ते विसरत नाहीत.

 

===

हे ही वाचा – अंबानींचं महागडं कंत्राट नाकारून गडकरींनी कमी खर्चात एक्सप्रेसवे बांधून दाखवला

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?