आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कॉंग्रेस पक्षाचा एकेकाळचा अत्यंत महत्वाचा चेहरा म्हणजे विलासराव देशमुख. महाराष्ट्रात विलासरावांनी कॉँग्रेससाठी जेवढं काम केलं तेवढं क्वचितच कोणा इतर नेत्याने केलं असेल.
कोंग्रेससारख्या मोठ्या पक्षाचा उपयोग त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रासाठीसुद्धा करून घेतला. ग्रामीण भागातल्या विकांसाचं बरचसं श्रेय हे विलारावांनाच जातं.
कॉँग्रेसमध्ये राहून आणि मुख्यमंत्री पदावर असूनसुद्धा त्यांनी कधीच त्यांची प्रतिमा मलिन होऊ दिली नाही. केवळ सचोटीने काम करणारा आणि गरजू लोकांसाठी झटणारा नेता म्हणून विलासराव यांची आजही लोकं आठवण काढतात.
विलासराव देशमुख हे जितके चांगले नेते/राजकारणी होते तितकेच चांगले वक्तेसुद्धा होते. त्यांची कित्येक भाषणं गाजलेली आहेत!
–
हे ही वाचा – काँग्रेस आघाडीचे मुख्यमंत्री जेव्हा बाळासाहेबांना ‘थेट मातोश्रीवर’ जाऊन भेटतात…
–
राजकीय वर्तुळात विलासराव देशमुखांच्या भाषणाआधी लोकं भाषण करायला घाबरायचे, कारण आपलं भाषण झाल्यावर विलासराव त्यांच्या खास शैलीत आपल्याला काय टोमणा मारतील याचं बऱ्याच लोकांना दडपण असायचं!
आज आपण विलासराव देशमुखांच्या अशाच ३ भन्नाट हजरजबाबीपणाचे किस्से जाणून घेणार आहोत!
जेव्हा विलासराव गोपीनाथ मुंडे यांना टोला लगावतात :
विलासराव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाची ही गोष्ट, सभागृहात आर्थिक संकल्प सादर केला जात होता आणि विरोधीपक्षाकडून गोपीनाथ मुंडे भाषण करत होते. मुंडे साहेबांचं भाषण बराच वेळ चाललं.
मुंडे जेव्हा आपलं भाषण संपवून खाली बसले त्यांनंतर विलासराव भाषणासाठी उभे राहिले आणि मुंडे साहेबांच्या भाषणाचं त्यांनी खूप कौतुक केलं, त्यांना ते भाषण फार आवडलं.
कौतुक करतानाच विलासराव कोटी करत म्हणाले “मुंडे साहेबांचं भाषण इतकं सुंदर होतं की त्यांनी कायम तिथे (म्हणजे विरोधीपक्षात) बसून भाषण द्यावे आणि मी इथे मुख्यमंत्री म्हणून ते ऐकत राहावं”
हे ऐकून काही सेकंदांसाठी मुंडेसुद्धा चक्रावले पण नंतर लगेच त्यांनी विलासरावांच्या या उत्तराला हसत दाद दिली आणि सभागृहात हशा पिकला!
शैक्षणिक धोरणावरून जेव्हा विलासराव एका आमदाराला कोपरखळी मारतात :
दूसरा किस्सासुद्धा सभागृहातलाच आहे. त्या वेळच्या राज्यातल्या शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र सुरू असताना एक आमदार भाषण करायला उभे राहिले, पण बराच वेळ चालणारं त्यांचं भाषण कधी संपेल याचीच वाट सगळे पाहत होते.
सभागृहातून त्यांना भाषण आटोपतं घ्यायची विनंतीसुद्धा करण्यात आली पण ते बोलायचे थांबतच नव्हते आणि अखेरीस काही वेळाने त्यांनी त्यांचं भाषण संपवलं आणि त्यांच्यानंतर भाषण द्यायला उभे राहिले विलासराव देशमुख.
विलासराव यांनी भाषणची सुरुवात करतानाच त्या आमदाराचा उल्लेख करत म्हणाले “या सन्माननीय सदस्यांनी शैक्षणिक क्षेत्रातल्या घसरणीविषयी मत मांडलं, यांचं भाषण ऐकून मलाही त्याची जाणीव झाली की आपला शैक्षणिक दर्जा कीती घसरला आहे याची!”
विलासरावांच्या या गुगलीचा त्या आमदाराला काहीच अंदाज नव्हता, आधी त्यांना हे कळलंच नाही की ते नेमकं काय बोलले पण नंतर जेव्हा त्यांना समजलं तेव्हा तेसुद्धा हसू थांबवू शकले नाहीत!
राजकारणातले ‘सख्खेशेजारी’
विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातलं सौख्य आपल्याला नवीन नाही. अगदी सुरुवातीच्या काळापासून राजकीय प्रवासातसुद्धा हे दोघे सदैव एकमेकांसोबत कायम होते.
दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये शेजारी रहात असल्याने राजकारणात त्यांना शेजारी म्हणून चिडवलं जायचं, अगदी कॉलेजकाळापासूनच राजकीय नेत्यापर्यंतच्या प्रवासात दोघेही सदैव एकत्रच होते.
–
हे ही वाचा – ….अन तो शेवटचा ‘नमस्कार’ ठरला !
–
यावरून कुणी पत्रकाराने विलासराव यांना सवाल केला, त्यावर विलासराव म्हणाले की आम्ही “आत्ताचे शेजारी नसून आमच्या मतदारसंघापासूनचे शेजारी आहोत!” गोपीनाथ मुंडे यांचा मतदार संघ रेणापुर आणि विलासराव यांचा लातूर.
जेव्हा हे दोघेही पहिली निवडणूक जिंकले ते एकमेकाच्या शेजारच्या तालुक्यातूनच. तेव्हापासून या दोघांनी त्यांचा शेजारधर्म पाळला तो कायमचा!
तर हे होते महाराष्ट्राचे नावाजलेले नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हजरजवाबीपणाचे किस्से. आज विलासराव देशमुख यांची जयंती, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.